circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय २५:३७सुमारे इ.स. ३३
“त्यावेळी नीतिमान लोक त्याला म्हणतील, ‘प्रभूजी, तुम्ही भुकेले असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि अन्न दिले आणि तहानलेले असताना तुम्हाला प्यावयाला दिले?
- मत्तय २५:३८सुमारे इ.स. ३३
तुम्ही परके असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि घरात घेतले किंवा तुम्ही वस्त्रहीन असताना तुम्हाला वस्त्रे दिली?
- मत्तय २५:३९सुमारे इ.स. ३३
तुम्ही आजारी असताना किंवा तुरुंगात असताना, आम्ही केव्हा तुमच्या भेटीला आलो?’
- मत्तय २५:४०सुमारे इ.स. ३३
“मग राजा उत्तर देऊन म्हणेल, ‘मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे काही या लहानातील माझ्या एकाही भावा-बहिणीसाठी तुम्ही केले ते तुम्ही माझ्यासाठी केले.’
- मत्तय २५:४१सुमारे इ.स. ३३
“नंतर तो त्याच्या डावीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो शापग्रस्त लोकांनो, तुम्ही माझ्यापुढून निघून जा. सैतान आणि त्याच्या दूतांसाठी जो सार्वकालिक अग्नी तयार ठेवला आहे त्यात जा.
- मत्तय २५:४२सुमारे इ.स. ३३
कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही खावयास दिले नाही; तान्हेला होतो, तेव्हा तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही.
- मत्तय २५:४३सुमारे इ.स. ३३
परका होतो, तेव्हा तुम्ही मला घरात घेतले नाही; वस्त्रहीन होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही; आजारी होतो, तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
- मत्तय २५:४४सुमारे इ.स. ३३
“ते सुद्धा असे उत्तर देतील, ‘प्रभूजी तुम्ही भुकेले, तहानलेले, परके, उघडे, आजारी किंवा तुरुंगात असताना आम्ही तुम्हाला केव्हा पाहिले आणि तुमची मदत केली नाही?’
- मत्तय २५:४५सुमारे इ.स. ३३
“तो त्यांना उत्तर देईल, ‘खरोखर, या कनिष्ठांना करण्याचे तुम्ही नाकारले, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी करण्याचे नाकारले.’
- मत्तय २५:४६सुमारे इ.स. ३३
“मग त्यांना सार्वकालिक मृत्यूची शिक्षा मिळेल, पण जे नीतिमान आहेत ते सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील.”
- मत्तय २६:१सुमारे इ.स. ३३
आपले हे सर्व बोलणे संपविल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाले,
- मत्तय २६:२सुमारे इ.स. ३३
“जसे तुम्हाला माहीत आहे की, वल्हांडण आणि बेखमीर भाकरीच्या सणाला दोनच दिवसांचा अवधी आहे आणि मानवपुत्र क्रूसावर खिळण्यासाठी धरून दिला जाईल.”
- मत्तय २६:३सुमारे इ.स. ३३
नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले.
- मत्तय २६:४सुमारे इ.स. ३३
आणि येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधीत होते.
- मत्तय २६:५सुमारे इ.स. ३३
पण ते म्हणाले, “आपण हे सणात करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”
- मत्तय २६:६सुमारे इ.स. ३३
येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते.
- मत्तय २६:७सुमारे इ.स. ३३
तिथे ते जेवायला बसले असताना, एक स्त्री अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ते बसले असताना येशूंच्या मस्तकावर तेल ओतले.
- मत्तय २६:८सुमारे इ.स. ३३
जेव्हा शिष्यांनी हे पाहिले त्यावेळी ते संतापले. ते म्हणाले, “ही नासाडी कशाला?
- मत्तय २६:९सुमारे इ.स. ३३
हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.”
- मत्तय २६:१०सुमारे इ.स. ३३
हे जाणून येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही या स्त्रीला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.
- मत्तय २६:११सुमारे इ.स. ३३
गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.
- मत्तय २६:१२सुमारे इ.स. ३३
माझ्या अंत्यविधीची तयारी म्हणून तिने हे तेल माझ्या शरीरावर ओतले आहे.
- मत्तय २६:१३सुमारे इ.स. ३३
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे ही शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”
- मत्तय २६:१४सुमारे इ.स. ३३
यानंतर बारा शिष्यांपैकी एक जो यहूदाह इस्कर्योत; महायाजकांकडे गेला.
- मत्तय २६:१५सुमारे इ.स. ३३
आणि त्याने त्यांना विचारले, “येशूंना मी तुमच्या स्वाधीन केले, तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी मोजून दिली.