circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय २५:१२सुमारे इ.स. ३३
“पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खरेच सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’
- मत्तय २५:१३सुमारे इ.स. ३३
“म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही.
- मत्तय २५:१४सुमारे इ.स. ३३
“पुन्हा, ते प्रवासाला निघालेल्या एका मनुष्यासारखे आहे. त्याने त्याच्या दासांना एकत्र बोलाविले आणि प्रत्येकाला त्याने ठराविक रक्कम दिली.
- मत्तय २५:१५सुमारे इ.स. ३३
त्याने एकाला सोन्याचे पाच तालांत, दुसर्याला दोन आणि तिसर्याला एक, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि मग तो आपल्या प्रवासाला निघून गेला.
- मत्तय २५:१६सुमारे इ.स. ३३
नंतर, ज्या सेवकाला पाच सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने ताबडतोब कामधंदा सुरू केला आणि लवकरच त्याने पाच थैल्या अधिक मिळविल्या.
- मत्तय २५:१७सुमारे इ.स. ३३
त्याचप्रमाणे ज्याला दोन सोन्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्यानेही आणखी दोन थैल्या मिळविल्या.
- मत्तय २५:१८सुमारे इ.स. ३३
पण ज्याला एक थैली मिळाली, तो गेला व त्याने जमिनीत एक खोल खड्डा केला आणि सुरक्षित राहावी म्हणून त्याच्या मालकाची थैली दडवून ठेवली.
- मत्तय २५:१९सुमारे इ.स. ३३
“बर्याच काळानंतर त्यांचा धनी परतला आणि त्याने आपल्या सेवकांना पैशाचा हिशोब देण्यासाठी बोलाविले.
- मत्तय २५:२०सुमारे इ.स. ३३
ज्याला पाच थैल्या मिळाल्या होत्या, त्याने धन्याला दहा आणून दिल्या. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला पाच थैल्या दिल्या होत्या; पाहा, मी त्यावर आणखी पाच मिळविल्या आहेत.’
- मत्तय २५:२१सुमारे इ.स. ३३
“त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’
- मत्तय २५:२२सुमारे इ.स. ३३
“यानंतर ज्याला दोन थैल्या दिल्या होत्या, तो सेवक सुद्धा पुढे आला; तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही मला दोन थैल्या दिल्या होत्या, त्या मी दुप्पट केल्या आहेत.’
- मत्तय २५:२३सुमारे इ.स. ३३
“त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या व विश्वासू दासा! तू लहान गोष्टीत विश्वासू राहिलास; मी तुझी पुष्कळ गोष्टींवर नेमणूक करेन; ये आणि तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो!’
- मत्तय २५:२४सुमारे इ.स. ३३
“नंतर ज्याला एक थैली दिली होती, तो सेवक पुढे आला. तो म्हणाला, ‘महाराज, तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, हे मला माहीत होते. जिथे तुम्ही पेरले नाही, तिथे कापणी करता आणि जिथे तुम्ही विखुरले नाही तिथे गोळा करता.
- मत्तय २५:२५सुमारे इ.स. ३३
मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेली एक थैली भूमीत दडवून ठेवली. पाहा, ती आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणली आहे.’
- मत्तय २५:२६सुमारे इ.स. ३३
“यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे, दुष्ट आणि आळशी दासा, जिथे मी पेरले नाही तिथे मी कापणी करतो आणि जिथे मी विखुरले नाही तिथे गोळा करतो, तुला एवढे तुला माहीत होते.
- मत्तय २५:२७सुमारे इ.स. ३३
तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते.
- मत्तय २५:२८सुमारे इ.स. ३३
“ ‘तर त्या सोन्याची थैली त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा थैल्या आहेत त्याला द्या.
- मत्तय २५:२९सुमारे इ.स. ३३
कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांना विपुलतेने मिळेल. ज्यांच्याकडे नाही, त्यांच्याजवळ जे काही असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.
- मत्तय २५:३०सुमारे इ.स. ३३
आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’
- मत्तय २५:३१सुमारे इ.स. ३३
“जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल.
- मत्तय २५:३२सुमारे इ.स. ३३
मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र होतील आणि मेंढपाळ मेंढरे व शेरडे वेगळे करतो तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळे करेल.
- मत्तय २५:३३सुमारे इ.स. ३३
मेंढरांना तो त्याच्या उजवीकडे आणि शेरड्यांना त्याच्या डावीकडे करेल.
- मत्तय २५:३४सुमारे इ.स. ३३
“मग राजा त्याच्या उजवीकडे असलेल्या लोकांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याने दिलेल्या आशीर्वादांनी धन्य झालेले लोकहो, या आणि जगाच्या उत्पत्तीपासून जे राज्य तुम्हाकरिता तयार करून ठेवले आहे ते वतन करून घ्या.
- मत्तय २५:३५सुमारे इ.स. ३३
मी भुकेला होतो आणि तुम्ही मला काही खावयास दिले; मी तान्हेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास दिले; मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले;
- मत्तय २५:३६सुमारे इ.स. ३३
मला वस्त्रांची गरज होती, तेव्हा तुम्ही मला वस्त्रे दिली; मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली.’