circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय २४:१३सुमारे इ.स. ३३
परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल.
- मत्तय २४:१४सुमारे इ.स. ३३
सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल.
- मत्तय २४:१५सुमारे इ.स. ३३
“संदेष्टा दानीएलाने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—
- मत्तय २४:१६सुमारे इ.स. ३३
त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.
- मत्तय २४:१७सुमारे इ.स. ३३
जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता खाली उतरू नये.
- मत्तय २४:१८सुमारे इ.स. ३३
जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये.
- मत्तय २४:१९सुमारे इ.स. ३३
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल!
- मत्तय २४:२०सुमारे इ.स. ३३
तुमच्या पलायनाचा काळ हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी येऊ नये म्हणून प्रार्थना करा.
- मत्तय २४:२१सुमारे इ.स. ३३
कारण ते दिवस इतके भयानक असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत.
- मत्तय २४:२२सुमारे इ.स. ३३
“ते दिवस जर कमी केले गेले नसते, तर कोणी वाचले नसते. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.
- मत्तय २४:२३सुमारे इ.स. ३३
त्या काळात ‘येथे ख्रिस्त आहे,’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका.
- मत्तय २४:२४सुमारे इ.स. ३३
कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील.
- मत्तय २४:२५सुमारे इ.स. ३३
पाहा मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलेले आहे.
- मत्तय २४:२६सुमारे इ.स. ३३
“जर कोणी तुम्हाला सांगेल, ‘तो तिथे रानात आहे,’ तर तिकडे जाऊ नका किंवा तो तिथे ‘आतील खोलीत आहे,’ तर विश्वास ठेवू नका.
- मत्तय २४:२७सुमारे इ.स. ३३
कारण जशी वीज पूर्वेकडून निघते आणि पश्चिमेकडे प्रकाशतांना दिसते, तसाच प्रकारे मानवपुत्राचे आगमन होईल.
- मत्तय २४:२८सुमारे इ.स. ३३
जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील.
- मत्तय २४:२९सुमारे इ.स. ३३
“क्लेशांच्या काळाची समाप्ती झाल्यावर “ ‘त्या दिवसात, सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही; आकाशातून तारे गळून पडतील, आणि आकाशमंडळ डळमळेल.’
- मत्तय २४:३०सुमारे इ.स. ३३
“मानवपुत्राच्या आगमनाचे चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे मोठा आक्रोश करतील. ते मानवपुत्राला आकाशात मेघारूढ होऊन पराक्रमाने परत येत असलेले पाहतील.
- मत्तय २४:३१सुमारे इ.स. ३३
तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल.
- मत्तय २४:३२सुमारे इ.स. ३३
“आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका. त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता.
- मत्तय २४:३३सुमारे इ.स. ३३
या सर्व घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते अगदी जवळ, दारातच आहे हे समजून घ्या.
- मत्तय २४:३४सुमारे इ.स. ३३
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.
- मत्तय २४:३५सुमारे इ.स. ३३
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
- मत्तय २४:३६सुमारे इ.स. ३३
“तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे.
- मत्तय २४:३७सुमारे इ.स. ३३
जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल.