circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय २३:२७सुमारे इ.स. ३३
“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो; कारण तुम्ही चुन्याचा लेप लावलेल्या कबरांप्रमाणे आहात. ज्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आत मृतांच्या हाडांनी व सर्वप्रकारच्या अशुद्धतेने व दुष्कृत्याने भरलेल्या असतात.
- मत्तय २३:२८सुमारे इ.स. ३३
त्याचप्रमाणे तुम्ही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, पण आतून कबरांसारखे आहात, ढोंगाने आणि दुष्कृत्याने भरलेले.
- मत्तय २३:२९सुमारे इ.स. ३३
“अहो परूश्यांनो आणि नियमशास्त्र शिक्षकांनो, अहो ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमानांच्या कबरा सजविता
- मत्तय २३:३०सुमारे इ.स. ३३
तुम्ही म्हणता, ‘आम्ही आमच्या वाडवडीलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांचे रक्त सांडण्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर कधीही भाग घेतला नसता.’
- मत्तय २३:३१सुमारे इ.स. ३३
पण असे बोलताना, तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता की तुम्ही संदेष्ट्यांचे खून करणार्या वाडवडीलांची संताने आहात.
- मत्तय २३:३२सुमारे इ.स. ३३
मग जा आणि ज्याचा तुमच्या पूर्वजांनी आरंभ केला होता ते पूर्ण करा.
- मत्तय २३:३३सुमारे इ.स. ३३
“अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल?
- मत्तय २३:३४सुमारे इ.स. ३३
यास्तव मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी आणि शिक्षक पाठवित आहे. काहींचा तुम्ही वध कराल आणि क्रूसावर द्याल; काहींना सभागृहात फटके माराल आणि नगरोनगरी त्यांच्या पाठीस लागाल.
- मत्तय २३:३५सुमारे इ.स. ३३
नीतिमान हाबेलाच्या रक्तापासून मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये ज्याचा वध तुम्ही केला तो बरख्याचा पुत्र जखर्याहच्या रक्तापर्यंत, जे सर्व नीतिमान रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले त्याचा दोष तुम्हावर येईल.
- मत्तय २३:३६सुमारे इ.स. ३३
मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल.
- मत्तय २३:३७सुमारे इ.स. ३३
“हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.
- मत्तय २३:३८सुमारे इ.स. ३३
आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे.
- मत्तय २३:३९सुमारे इ.स. ३३
मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो, असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.’ ”
- मत्तय २४:१सुमारे इ.स. ३३
येशू मंदिरातून बाहेर पडले व चालत असता त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांचे लक्ष मंदिराच्या इमारतींकडे वेधले.
- मत्तय २४:२सुमारे इ.स. ३३
येशू त्यांना म्हणाले, “हे सर्व तुम्ही आता पाहत आहात ना? मी तुम्हाला खचित सांगतो की, एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पडेल.”
- मत्तय २४:३सुमारे इ.स. ३३
येशू मंदिराच्या समोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, शिष्य त्यांच्याकडे एकांतात आले आणि विचारले, “या घटना केव्हा घडतील आणि तुमच्या येण्याचे आणि या युगाच्या समाप्तीची चिन्हे काय असतील हे आम्हाला सांगा.”
- मत्तय २४:४सुमारे इ.स. ३३
येशूंनी त्यांना म्हटले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा.
- मत्तय २४:५सुमारे इ.स. ३३
कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मी ख्रिस्त आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील.
- मत्तय २४:६सुमारे इ.स. ३३
तुम्ही लढायासंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, पण त्यामुळे घाबरू नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट अजूनही यावयाचा आहे.
- मत्तय २४:७सुमारे इ.स. ३३
कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळही पडतील.
- मत्तय २४:८सुमारे इ.स. ३३
या घटना तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.
- मत्तय २४:९सुमारे इ.स. ३३
“छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्याकरिता तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.
- मत्तय २४:१०सुमारे इ.स. ३३
त्यावेळी पुष्कळजण विश्वासापासून दूर जातील व एकमेकांचा द्वेष करतील.
- मत्तय २४:११सुमारे इ.स. ३३
अनेक खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील.
- मत्तय २४:१२सुमारे इ.स. ३३
दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.