circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- मत्तय २४:३८सुमारे इ.स. ३३
जलप्रलय येण्यापूर्वी, नोआह प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते.
- मत्तय २४:३९सुमारे इ.स. ३३
आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल.
- मत्तय २४:४०सुमारे इ.स. ३३
शेतात काम करीत असलेल्या दोन मनुष्यांपैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.
- मत्तय २४:४१सुमारे इ.स. ३३
जात्यावर दळीत बसलेल्या दोन स्त्रियांपैकी एकीला घेतले जाईल व दुसरीला ठेवले जाईल.
- मत्तय २४:४२सुमारे इ.स. ३३
“यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही.
- मत्तय २४:४३सुमारे इ.स. ३३
पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते.
- मत्तय २४:४४सुमारे इ.स. ३३
म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.
- मत्तय २४:४५सुमारे इ.स. ३३
“तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबीयांची देखभाल करण्याचे व अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो.
- मत्तय २४:४६सुमारे इ.स. ३३
धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय.
- मत्तय २४:४७सुमारे इ.स. ३३
मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल.
- मत्तय २४:४८सुमारे इ.स. ३३
परंतु समजा तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’
- मत्तय २४:४९सुमारे इ.स. ३३
आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.
- मत्तय २४:५०सुमारे इ.स. ३३
तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल.
- मत्तय २४:५१सुमारे इ.स. ३३
त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.
- मत्तय २५:१सुमारे इ.स. ३३
“त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाणार्या दहा कुमारींसारखे होईल.
- मत्तय २५:२सुमारे इ.स. ३३
त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.
- मत्तय २५:३सुमारे इ.स. ३३
मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.
- मत्तय २५:४सुमारे इ.स. ३३
शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले.
- मत्तय २५:५सुमारे इ.स. ३३
वराला येण्यास उशीर लागला म्हणून सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.
- मत्तय २५:६सुमारे इ.स. ३३
“मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली.
- मत्तय २५:७सुमारे इ.स. ३३
“मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले.
- मत्तय २५:८सुमारे इ.स. ३३
मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’
- मत्तय २५:९सुमारे इ.स. ३३
“त्यांनी उत्तर दिले, ‘नाही, ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्यांकडे जा आणि स्वतःसाठी विकत आणा.’
- मत्तय २५:१०सुमारे इ.स. ३३
“त्या तेल विकत आणावयास गेल्या. वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला.
- मत्तय २५:११सुमारे इ.स. ३३
“काही वेळाने त्या दुसर्याही कुमारी आल्या व म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आम्हासाठी दार उघडा!’