मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय २२:२३सुमारे इ.स. ३३

    त्याच दिवशी, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी त्यांच्याकडे आले व प्रश्न करू लागले.

  2. मत्तय २२:२४सुमारे इ.स. ३३

    “गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.

  3. मत्तय २२:२५सुमारे इ.स. ३३

    आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली.

  4. मत्तय २२:२६सुमारे इ.स. ३३

    पण हीच गोष्ट दुसर्‍या व तिसर्‍या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली.

  5. मत्तय २२:२७सुमारे इ.स. ३३

    सर्वात शेवटी ती स्त्री मरण पावली.

  6. मत्तय २२:२८सुमारे इ.स. ३३

    जेव्हा, पुनरुत्थान होईल तेव्हा ती कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”

  7. मत्तय २२:२९सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता.

  8. मत्तय २२:३०सुमारे इ.स. ३३

    पुनरुत्थानामध्ये लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील.

  9. मत्तय २२:३१सुमारे इ.स. ३३

    पण आता मृतांच्या पुनरुत्थाना संदर्भात परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही वाचले नाही काय?

  10. मत्तय २२:३२सुमारे इ.स. ३३

    ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे,’ तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंतांचा आहे.”

  11. मत्तय २२:३३सुमारे इ.स. ३३

    सभोवार जमलेली गर्दी येशूंच्या उत्तरांनी विलक्षण प्रभावित झाली.

  12. मत्तय २२:३४सुमारे इ.स. ३३

    येशूंनी सदूकींना निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले, तेव्हा ते एकत्र जमले.

  13. मत्तय २२:३५सुमारे इ.स. ३३

    कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला:

  14. मत्तय २२:३६सुमारे इ.स. ३३

    “गुरुजी, मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे?”

  15. मत्तय २२:३७सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’

  16. मत्तय २२:३८सुमारे इ.स. ३३

    हीच सर्वात पहिली आणि महान आज्ञा आहे.

  17. मत्तय २२:३९सुमारे इ.स. ३३

    यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’

  18. मत्तय २२:४०सुमारे इ.स. ३३

    सर्व नियम आणि संदेष्ट्यांची शिकवण या दोन आज्ञांवरच आधारित आहे.”

  19. मत्तय २२:४१सुमारे इ.स. ३३

    एकदा परूशी लोक एकत्र गोळा झाले असताना, येशूंनी त्यांना विचारले,

  20. मत्तय २२:४२सुमारे इ.स. ३३

    “ख्रिस्ताबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” “तो दावीदाचा पुत्र आहे,” त्यांनी उत्तर दिले.

  21. मत्तय २२:४३सुमारे इ.स. ३३

    येशूंनी विचारले, “मग दावीद त्याला आत्म्याद्वारे ‘प्रभू,’ असे कसे म्हणतो?

  22. मत्तय २२:४४सुमारे इ.स. ३३

    “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’

  23. मत्तय २२:४५सुमारे इ.स. ३३

    जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?”

  24. मत्तय २२:४६सुमारे इ.स. ३३

    यावर त्यांना काही उत्तर देता येईना आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.

  25. मत्तय २३:१सुमारे इ.स. ३३

    मग येशू लोकसमुदायाला आणि आपल्या शिष्यांना म्हणाले: