मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय २१:४४सुमारे इ.स. ३३

    या खडकावर जे आदळतील त्यांचे तुकडे होतील, परंतु ज्यांच्यावर हा खडक आदळेल त्यांचा चुराडा होईल.”

  2. मत्तय २१:४५सुमारे इ.स. ३३

    आपल्याविषयीच या गोष्टीमधून येशू बोलत आहेत हे महायाजक आणि परूशी यांच्या ध्यानात आले,

  3. मत्तय २१:४६सुमारे इ.स. ३३

    तेव्हा येशूंना अटक करण्याचा ते काहीतरी मार्ग शोधू लागले. पण त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण सर्व लोक येशूंना संदेष्टा मानीत होते.

  4. मत्तय २२:१सुमारे इ.स. ३३

    येशूंनी परत त्यांना दाखला सांगितला:

  5. मत्तय २२:२सुमारे इ.स. ३३

    ते म्हणाले, “स्वर्गाचे राज्य, एका राजासारखे आहे ज्याने आपल्या मुलाच्या विवाह निमित्ताने मेजवानी तयार केली.

  6. मत्तय २२:३सुमारे इ.स. ३३

    ज्यांना आमंत्रित केले होते त्या सर्वांस मेजवानीसाठी यावे म्हणून राजाने दासांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्यांनी मेजवानीस येण्याचे नाकारले.

  7. मत्तय २२:४सुमारे इ.स. ३३

    “तेव्हा त्याने आणखी काही दास पाठविले, ‘ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांना सांगा की मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरे कापली आहेत आणि सर्वकाही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.’

  8. मत्तय २२:५सुमारे इ.स. ३३

    “परंतु त्यांनी मुळीच लक्ष दिले नाही आणि एकजण आपल्या शेतावर, तर दुसरा आपल्या व्यापारासाठी निघून गेला.

  9. मत्तय २२:६सुमारे इ.स. ३३

    बाकीच्या आमंत्रितांनी तर राजाच्या दासांना पकडले, अपमानित वागणूक दिली आणि ठारही मारले.

  10. मत्तय २२:७सुमारे इ.स. ३३

    राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून दासांना ठार करणार्‍यांचा नाश केला. त्यांची शहरे जाळून टाकली.

  11. मत्तय २२:८सुमारे इ.स. ३३

    “यानंतर राजा आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तयार आहे, पण ज्यांना मी आमंत्रण दिले ते लोक या बहुमानास पात्र नाहीत.

  12. मत्तय २२:९सुमारे इ.स. ३३

    तेव्हा तुम्ही रस्त्यांच्या चौकामध्ये जा आणि तिथे जे दिसतील, त्यांना मेजवानीस घेऊन या.’

  13. मत्तय २२:१०सुमारे इ.स. ३३

    राजाच्या आज्ञेप्रमाणे दास बाहेर गेले आणि चांगले वाईट, असे जे कोणी त्यांना रस्त्यांत सापडले, त्या सर्वांना ते मेजवानीस घेऊन आले आणि मेजवानीचा कक्ष आमंत्रितांनी भरून गेला.

  14. मत्तय २२:११सुमारे इ.स. ३३

    “राजा पाहुणे मंडळीस भेटावयास आला, त्यावेळी एक मनुष्य विवाहोत्सवाचा पोशाख न घालताच आलेला दिसला.

  15. मत्तय २२:१२सुमारे इ.स. ३३

    राजाने त्या मनुष्याला विचारले, ‘मित्रा, लग्नाच्या पोषाखाशिवाय तू आत कसा आलास?’ तो मनुष्य स्तब्ध झाला.

  16. मत्तय २२:१३सुमारे इ.स. ३३

    “मग राजा आपल्या नोकरास म्हणाला, ‘या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्याला बाहेरच्या अंधारात फेकून द्या. त्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

  17. मत्तय २२:१४सुमारे इ.स. ३३

    “कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”

  18. मत्तय २२:१५सुमारे इ.स. ३३

    मग परूशी लोक बाहेर गेले आणि येशूंना त्यांच्या बोलण्यात कसे पकडावे यासंबंधी चर्चा केली.

  19. मत्तय २२:१६सुमारे इ.स. ३३

    त्यानुसार परूश्यांनी आपल्या काही शिष्यांना हेरोदी गटाच्या लोकांबरोबर येशूंकडे पाठविले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता आणि भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाहीत.

  20. मत्तय २२:१७सुमारे इ.स. ३३

    तर आता आम्हाला हे सांगा की, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”

  21. मत्तय २२:१८सुमारे इ.स. ३३

    पण त्यांचा हेतू काय आहे हे येशूंनी ओळखले. “अहो, ढोंग्यांनो,” येशू म्हणाले, “मला सापळ्यात पाडू पाहता काय?

  22. मत्तय २२:१९सुमारे इ.स. ३३

    कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा.” आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले.

  23. मत्तय २२:२०सुमारे इ.स. ३३

    येशूंनी त्यांना विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?”

  24. मत्तय २२:२१सुमारे इ.स. ३३

    “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले. “मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”

  25. मत्तय २२:२२सुमारे इ.स. ३३

    त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि मग ते त्यांना सोडून निघून गेले.