मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय २०:२८सुमारे इ.स. ३३

    मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”

  2. मत्तय २०:२९सुमारे इ.स. ३३

    येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती.

  3. मत्तय २०:३०सुमारे इ.स. ३३

    दोन आंधळी माणसे रस्त्याच्या कडेला बसली होती. येशू आपल्या बाजूने येत आहेत, हे त्यांनी ऐकले, तेव्हा ते मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दावीदाचे पुत्र! आम्हावर दया करा!”

  4. मत्तय २०:३१सुमारे इ.स. ३३

    गर्दीतील लोकांनी त्यांना धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, तर ते अधिक मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अहो प्रभू, दावीदाचे, पुत्र, आम्हावर दया करा!”

  5. मत्तय २०:३२सुमारे इ.स. ३३

    येशू थांबले आणि त्यांनी आंधळ्यांना बोलाविले व ते म्हणाले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

  6. मत्तय २०:३३सुमारे इ.स. ३३

    “प्रभूजी,” त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला आमची दृष्टी यावी.”

  7. मत्तय २०:३४सुमारे इ.स. ३३

    येशूंना त्यांचा कळवळा आला; त्यांनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; ताबडतोब त्यांना दिसू लागले आणि ते त्यांच्यामागे चालू लागले.

  8. मत्तय २१:१सुमारे इ.स. ३३

    ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले,

  9. मत्तय २१:२सुमारे इ.स. ३३

    त्यांना म्हणाले, “समोरच्या गावात जा, तिथे पोहोचताच, तुम्हाला एक गाढवी दिसेल, तिच्याजवळ शिंगरू बांधून ठेवलेले असेल; त्यांना सोडून माझ्याकडे आणा.

  10. मत्तय २१:३सुमारे इ.स. ३३

    कोणी तुम्हाला विचारले, तर त्यांना एवढेच सांगा, प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लागलीच पाठवून देतील.”

  11. मत्तय २१:४सुमारे इ.स. ३३

    संदेष्ट्याने केलेले भविष्यकथन पूर्ण व्हावे म्हणून असे झाले:

  12. मत्तय २१:५सुमारे इ.स. ३३

    “सीयोनकन्येला सांगा की, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.”

  13. मत्तय २१:६सुमारे इ.स. ३३

    शिष्य गेले आणि येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केले.

  14. मत्तय २१:७सुमारे इ.स. ३३

    त्यांनी गाढवी व शिंगरू आणली आणि त्यांचे वस्त्रे गाढवी व शिंगरूच्या पाठीवर टाकले मग येशू त्यावर बसले.

  15. मत्तय २१:८सुमारे इ.स. ३३

    गर्दीतील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून रस्त्यावर पसरल्या.

  16. मत्तय २१:९सुमारे इ.स. ३३

    मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”

  17. मत्तय २१:१०सुमारे इ.स. ३३

    येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?”

  18. मत्तय २१:११सुमारे इ.स. ३३

    “हे येशू आहेत!” गर्दीतील लोकांनी उत्तर दिले, “गालीलाच्या नासरेथहून आलेले संदेष्टा आहेत.”

  19. मत्तय २१:१२सुमारे इ.स. ३३

    येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्‍या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणार्‍यांची आसने त्यांनी उधळून लावली.

  20. मत्तय २१:१३सुमारे इ.स. ३३

    ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.”

  21. मत्तय २१:१४सुमारे इ.स. ३३

    मग मंदिरात त्यांच्याकडे आंधळे व अपंग लोक आले आणि त्यांनी त्यांना बरे केले.

  22. मत्तय २१:१५सुमारे इ.स. ३३

    तरी जेव्हा मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षकांनी ही अद्भुत कामे पाहिली आणि लहान मुलांना मंदिराच्या परिसरात, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” असे ओरडतांना ऐकले, तेव्हा ते संतापले.

  23. मत्तय २१:१६सुमारे इ.स. ३३

    त्यांनी येशूंना विचारले, “ही मुले काय म्हणत आहेत, हे तुम्ही ऐकत आहात ना?” येशूंनी उत्तर दिले, “हो, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? “ ‘लेकरे आणि तान्ही बालके यांच्याद्वारे हे प्रभू तू आपली स्तुती प्रकट केली आहे,’ ”

  24. मत्तय २१:१७सुमारे इ.स. ३३

    मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तिथेच केला.

  25. मत्तय २१:१८सुमारे इ.स. ३३

    अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली.