मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय २०:३सुमारे इ.स. ३३

    “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले.

  2. मत्तय २०:४सुमारे इ.स. ३३

    त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’

  3. मत्तय २०:५सुमारे इ.स. ३३

    म्हणून ते गेले. “तो पुन्हा दुपारच्या सुमारास बाहेर गेला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासही त्याने असेच केले.

  4. मत्तय २०:६सुमारे इ.स. ३३

    पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’

  5. मत्तय २०:७सुमारे इ.स. ३३

    “ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले. “तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’

  6. मत्तय २०:८सुमारे इ.स. ३३

    “संध्याकाळी धन्याने आपल्या मुकादमाला सांगितले, ‘द्राक्षमळ्यामध्ये आलेल्या मजुरांना बोलवा आणि जे शेवटी आले होते त्यांच्यापासून आरंभ करून जे प्रथम आले होते त्या सर्वांना मजुरी द्या.’

  7. मत्तय २०:९सुमारे इ.स. ३३

    “तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली.

  8. मत्तय २०:१०सुमारे इ.स. ३३

    त्यावरून आधी आलेल्या मजुरांना, आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले; परंतु त्यांनाही एका दिवसाचीच मजुरी मिळाली.

  9. मत्तय २०:११सुमारे इ.स. ३३

    जेव्हा त्यांना ती मिळाली, तेव्हा त्यांनी धन्याविरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात केली.

  10. मत्तय २०:१२सुमारे इ.स. ३३

    ‘त्या माणसांनी फक्त एकच तास काम केले, तरी त्यांना तुम्ही दिवसभराची मजुरी दिली आणि आम्ही येथे सकाळपासून उन्हात दिवसभर राबलो, तरी आम्हाला तुम्ही त्यांच्यासारखेच केले.’

  11. मत्तय २०:१३सुमारे इ.स. ३३

    “त्याने त्यांच्यापैकी एकाला म्हटले, ‘मित्रा, तुझ्यावर मी कोणताही अन्याय केलेला नाही; याच मजुरीत दिवसभर काम करण्याचे तू कबूल केले होतेस की नाही?

  12. मत्तय २०:१४सुमारे इ.स. ३३

    मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते.

  13. मत्तय २०:१५सुमारे इ.स. ३३

    माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’

  14. मत्तय २०:१६सुमारे इ.स. ३३

    “याप्रमाणे जे शेवटचे ते पहिले, आणि जे पहिले ते शेवटचे होतील.”

  15. मत्तय २०:१७सुमारे इ.स. ३३

    येशू यरुशलेमला जात होते. वाटेत त्यांनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला घेतले आणि त्यांना म्हटले,

  16. मत्तय २०:१८सुमारे इ.स. ३३

    “आपण यरुशलेमात जात आहोत आणि तिथे मानवपुत्राला महायाजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि नंतर त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल.

  17. मत्तय २०:१९सुमारे इ.स. ३३

    ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील व क्रूसावर खिळतील; परंतु तीन दिवसानंतर तो मरणातून पुन्हा उठेल.”

  18. मत्तय २०:२०सुमारे इ.स. ३३

    मग जब्दीच्या पुत्रांची आई तिच्या मुलांना घेऊन येशूंकडे आली. तिने त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि त्यांच्याजवळ एक कृपादान मागितले.

  19. मत्तय २०:२१सुमारे इ.स. ३३

    येशूंनी तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “तुमच्या राज्यामध्ये माझा या दोन पुत्रातील एकाला आपल्या उजवीकडे व दुसर्‍याला डावीकडे बसू द्यावे.”

  20. मत्तय २०:२२सुमारे इ.स. ३३

    यावर येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे, तो तुम्ही पिऊ शकाल काय?” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तो पिऊ शकू!”

  21. मत्तय २०:२३सुमारे इ.स. ३३

    “त्या प्याल्यातून तुम्ही प्याल यात शंका नाही,” येशूंनी त्यांना म्हटले, “परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तयार केल्या आहेत, त्यांनाच मिळतील.”

  22. मत्तय २०:२४सुमारे इ.स. ३३

    हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना त्या दोन्ही भावांचा खूप राग आला.

  23. मत्तय २०:२५सुमारे इ.स. ३३

    हे पाहून येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदी लोकांचे शासक त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे.

  24. मत्तय २०:२६सुमारे इ.स. ३३

    पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.

  25. मत्तय २०:२७सुमारे इ.स. ३३

    आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने तुमचा गुलाम व्हावे.