मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मत्तय २७:६६सुमारे इ.स. ३३

    याप्रमाणे ते गेले आणि कबरेवरील शिला शिक्कामोर्तब करून त्यांनी ती सुरक्षित केली व पहारेकरीही ठेवले.

  2. मत्तय २८:१सुमारे इ.स. ३३

    शब्बाथ संपल्यानंतर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया कबर पाहावयला गेल्या.

  3. मत्तय २८:२सुमारे इ.स. ३३

    तेवढ्यात एकाएकी तीव्र भूकंप झाला, कारण स्वर्गातून प्रभूचा एक दूत खाली आला, कबरेजवळ जाऊन त्याने कबरेवरील धोंड बाजूला लोटली आणि तो तिच्यावर बसला.

  4. मत्तय २८:३सुमारे इ.स. ३३

    त्याचे मुख विजेसारखे तेजस्वी आणि त्याचे वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती.

  5. मत्तय २८:४सुमारे इ.स. ३३

    पहारेकर्‍यांनी त्याला पाहिले व ते भयभीत झाले, थरथर कापले आणि मृतवत झाले.

  6. मत्तय २८:५सुमारे इ.स. ३३

    देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे.

  7. मत्तय २८:६सुमारे इ.स. ३३

    ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा.

  8. मत्तय २८:७सुमारे इ.स. ३३

    आता लवकर जा आणि त्यांच्या शिष्यांना सांगा: ‘येशू मेलेल्यामधून पुन्हा उठले आहेत आणि ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. ते तिथे तुम्हाला भेटतील.’ जसे मी तुम्हाला सांगितले.”

  9. मत्तय २८:८सुमारे इ.स. ३३

    भयभीत पण अतिशय आनंदित होऊन त्या स्त्रिया कबरेपासून दूर गेल्या, शिष्यांना देवदूताचा निरोप सांगण्यासाठी त्या धावतच निघाल्या.

  10. मत्तय २८:९सुमारे इ.स. ३३

    अकस्मात येशू त्यांना भेटले व “अभिवादन” असे म्हणाले. त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी त्यांचे चरण धरले आणि त्यांची उपासना केली.

  11. मत्तय २८:१०सुमारे इ.स. ३३

    मग येशू त्यांना म्हणाले, “भिऊ नका. माझ्या भावांकडे जा, त्यांना सांगा आणि मला भेटण्यासाठी ताबडतोब गालीलात या. तिथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”

  12. मत्तय २८:११सुमारे इ.स. ३३

    त्या स्त्रिया वाटेवर असताना, काही शिपाई महायाजकाकडे गेले आणि काय घडले यासंबंधीचा सर्व वृतांत त्यांनी महायाजकांना सांगितला.

  13. मत्तय २८:१२सुमारे इ.स. ३३

    यहूदी पुढार्‍यांची सभा बोलाविण्यात आली. त्या सभेत शिपायांना लाच देऊन,

  14. मत्तय २८:१३सुमारे इ.स. ३३

    त्यांना असे सांगावयास लावले, “रात्री आम्ही झोपेत असताना त्यांच्या शिष्यांनी येऊन त्यांचे शरीर पळवून नेले.

  15. मत्तय २८:१४सुमारे इ.स. ३३

    राज्यपालांना हे समजले तर भिण्याचे काही कारण नाही. आम्ही तुमच्यावतीने बोलू. सर्वकाही ठीक होईल.”

  16. मत्तय २८:१५सुमारे इ.स. ३३

    या आश्वासनानंतर शिपायांनी लाच घेतली आणि त्यांना शिकविल्याप्रमाणे त्यांनी सांगितले आणि ही गोष्ट यहूदी लोकांमध्ये पसरली आणि ती आजही प्रचलित आहे.

  17. मत्तय २८:१६सुमारे इ.स. ३३

    यानंतर येशूंचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूंनी त्यांना जमावयास सांगितले होते, त्या डोंगरावर गेले.

  18. मत्तय २८:१७सुमारे इ.स. ३३

    त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांची उपासना केली. परंतु काहींनी संशय धरला.

  19. मत्तय २८:१८सुमारे इ.स. ३३

    मग येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाले, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे.

  20. मत्तय २८:१९सुमारे इ.स. ३३

    यास्तव सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन शिष्य बनवा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;

  21. मत्तय २८:२०सुमारे इ.स. ३३

    आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”

  22. परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ.

  23. यशायाह संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन, तो तुझा मार्ग तयार करेल,”

  24. “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”

  25. आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला.