मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क २:१०सुमारे इ.स. ३१

    तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.”

  2. मार्क २:११सुमारे इ.स. ३१

    ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”

  3. मार्क २:१२सुमारे इ.स. ३१

    तो मनुष्य उठला आणि लगेच अंथरूण उचलून त्या सर्वांसमोर चालत गेला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले व सर्वांनी परमेश्वराची स्तुती केली. ते म्हणाले, “आम्ही असे काही कधीही पाहिले नाही!”

  4. मार्क २:१३सुमारे इ.स. ३१

    नंतर येशू पुन्हा सरोवरावर चालत गेले आणि तिथे त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय जमा झाला व ते त्यांना शिकवू लागले.

  5. मार्क २:१४सुमारे इ.स. ३१

    येशू चालत असताना जकात नाक्यावर बसलेला अल्फीचा पुत्र लेवी त्यांच्या दृष्टीस पडला. येशू त्याला म्हणाले, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि त्यांना अनुसरला.

  6. मार्क २:१५सुमारे इ.स. ३१

    येशू आणि त्यांचे शिष्य लेवीच्या घरी भोजन करत असताना, त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार व पापी लोक भोजन करत होते. कारण येशूंच्या मागे आलेले पुष्कळजण तिथे होते.

  7. मार्क २:१६सुमारे इ.स. ३१

    जेव्हा नियमशास्त्र शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूंना जकातदार व पापी लोकांबरोबर जेवत असताना पाहिले, तेव्हा त्यांनी शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतात?”

  8. मार्क २:१७सुमारे इ.स. ३१

    हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”

  9. मार्क २:१८सुमारे इ.स. ३१

    आता योहानाचे शिष्य आणि परूशी उपवास करीत होते. काही लोक येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले, “योहानाचे शिष्य आणि परूशी उपवास करतात, परंतु तुमचे शिष्य का करत नाही?”

  10. मार्क २:१९सुमारे इ.स. ३१

    येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना उपवास कसे करू शकतात? जोपर्यंत वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत ते उपवास करू शकत नाहीत.

  11. मार्क २:२०सुमारे इ.स. ३१

    परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपवास करतील.

  12. मार्क २:२१सुमारे इ.स. ३१

    “नवीन कापडाचा तुकडा जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. नाहीतर ते नवीन ठिगळ वस्त्राला फाडेल आणि छिद्र अधिक मोठे होईल.

  13. मार्क २:२२सुमारे इ.स. ३१

    आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जाईल, द्राक्षारस वाहून जाईल आणि द्राक्षारस व बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात.”

  14. मार्क २:२३सुमारे इ.स. ३१

    एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून जात होते आणि त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर चालत असताना, ते गव्हाची काही कणसे तोडू लागले.

  15. मार्क २:२४सुमारे इ.स. ३१

    ते पाहून परूशी त्यांना म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे असे ते का करतात?”

  16. मार्क २:२५सुमारे इ.स. ३१

    येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता व त्यांना गरज असताना त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही का?

  17. मार्क २:२६सुमारे इ.स. ३१

    महायाजक अबीयाथार यांच्या दिवसात तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या, ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.”

  18. मार्क २:२७सुमारे इ.स. ३१

    मग येशूंनी त्यांना म्हटले, “शब्बाथ मनुष्यासाठी निर्माण केला आहे, मनुष्य शब्बाथासाठी नाही.

  19. मार्क २:२८सुमारे इ.स. ३१

    म्हणून मानवपुत्र हा शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”

  20. मार्क ३:१सुमारे इ.स. ३१

    आणखी एका वेळेला येशू सभागृहामध्ये गेले आणि तिथे हात वाळलेला एक मनुष्य होता.

  21. मार्क ३:२सुमारे इ.स. ३१

    काही लोक त्यांच्यावर आरोप ठेवण्यास कारण पाहत होते, शब्बाथ दिवशी येशू त्याला बरे करतात काय हे पाहण्यासाठी बारकाईने नजर ठेवून होते.

  22. मार्क ३:३सुमारे इ.स. ३१

    येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाले, “असा सर्वांसमोर उभा राहा.”

  23. मार्क ३:४सुमारे इ.स. ३१

    नंतर येशू त्यांना म्हणाले, “शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, जीव वाचविणे किंवा जीव घेणे?” परंतु ते शांत बसले.

  24. मार्क ३:५सुमारे इ.स. ३१

    त्यांनी सभोवार जमलेल्यांकडे रागाने आपली नजर फिरविली आणि त्यांची कठीण हृदये पाहून ते अत्यंत अस्वस्थ झाले व त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि त्याचा हात पहिल्यासारखा बरा झाला.

  25. मार्क ३:६सुमारे इ.स. ३१

    यानंतर परूश्यांनी जाऊन येशूंना कसे जिवे मारता येईल याविषयी हेरोदियांबरोबर योजना केली.