मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मार्क ३:७सुमारे इ.स. ३१

    इकडे येशू आणि त्यांचे शिष्य सरोवराकडे निघून गेले. त्यांच्यामागे गालील प्रांतातून मोठा समुदाय आला होता.

  2. मार्क ३:८सुमारे इ.स. ३१

    येशूंनी जे सर्वकाही केले होते ते ऐकून, पुष्कळ लोक त्यांच्याकडे यहूदीया, यरुशलेम, इदूमिया, यार्देन नदीपलीकडील प्रदेश, सोर व सीदोन येथून आले होते.

  3. मार्क ३:९सुमारे इ.स. ३१

    तिथे गर्दी असल्यामुळे व येशूंच्या भोवती लोकांची गर्दी थांबविण्यासाठी त्यांनी शिष्यांना एक लहान होडी तयार ठेवावी असे सांगितले.

  4. मार्क ३:१०सुमारे इ.स. ३१

    कारण त्यांनी पुष्कळांना बरे केले होते, त्यामुळे जे लोक आजारी होते ते येशूंना स्पर्श करावा म्हणून पुढे रेटत होते.

  5. मार्क ३:११सुमारे इ.स. ३१

    जेव्हा अशुद्ध आत्म्यांनी पछाडलेले त्यांना पाहत असत, तेव्हा ते त्यांच्यापुढे खाली पडत आणि मोठ्याने ओरडून म्हणत, “तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात!”

  6. मार्क ३:१२सुमारे इ.स. ३१

    परंतु त्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली की त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका.

  7. मार्क ३:१३सुमारे इ.स. ३१

    येशू डोंगरावर गेले आणि त्यांना ज्यांची गरज होती त्यांना स्वतःकडे बोलाविले आणि ते त्यांच्याकडे आले.

  8. मार्क ३:१४सुमारे इ.स. ३१

    तेव्हा त्यांनी बारा जणांची निवड केली, यासाठी की त्यांनी त्यांच्याबरोबर असावे आणि प्रचार करण्यासाठी बाहेर पाठविता यावे

  9. मार्क ३:१५सुमारे इ.स. ३१

    आणि त्यांना भुते काढण्याचा अधिकार द्यावा.

  10. मार्क ३:१६सुमारे इ.स. ३१

    त्यांनी नेमणूक केलेल्या बारा जणांची नावे अशी: शिमोन (याला त्यांनी पेत्र हे नाव दिले),

  11. मार्क ३:१७सुमारे इ.स. ३१

    जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान (त्यांना बोओनेग्रेस हे नाव दिले, याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होता),

  12. मार्क ३:१८सुमारे इ.स. ३१

    आंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, तद्दय, शिमोन कनानी

  13. मार्क ३:१९सुमारे इ.स. ३१

    आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने त्यांचा विश्वासघात केला.

  14. मार्क ३:२०सुमारे इ.स. ३१

    येशू एका घरात गेले आणि समुदायाने पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना भोजन करण्यासही वेळ मिळेना.

  15. मार्क ३:२१सुमारे इ.स. ३१

    येशूंच्या कुटुंबीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते त्यांना घेऊन जाण्यासाठी आले, कारण ते म्हणाले, “याला वेड लागले आहे.”

  16. मार्क ३:२२सुमारे इ.स. ३१

    आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्र शिक्षक म्हणाले, “तो बालजबूलाने पछाडलेला आहे! तो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.”

  17. मार्क ३:२३सुमारे इ.स. ३१

    येशूंनी त्यांना जवळ बोलाविले आणि त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलण्यास सुरुवात केली: “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल?

  18. मार्क ३:२४सुमारे इ.स. ३१

    जर एखाद्या राज्यात फूट पडली तर ते राज्य स्थिर राहू शकत नाही.

  19. मार्क ३:२५सुमारे इ.स. ३१

    जर एखाद्या घरात फूट पडलेली आहे, तर ते घर स्थिर राहू शकत नाही.

  20. मार्क ३:२६सुमारे इ.स. ३१

    सैतानच स्वतःविरुद्ध झाला आणि सैतानातच फूट पडली तर त्याचा टिकाव लागणार नाही; त्याचा शेवट झालाच आहे.

  21. मार्क ३:२७सुमारे इ.स. ३१

    खरोखर, एखाद्या बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बळकट मनुष्याला बांधले पाहिजे मगच त्याचे घर लुटता येईल.

  22. मार्क ३:२८सुमारे इ.स. ३१

    मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मनुष्याला सर्व पापांची व प्रत्येक दुर्भाषण केल्याची क्षमा होईल,

  23. मार्क ३:२९सुमारे इ.स. ३१

    परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही; ते सार्वकालिक पापाचे दोषी आहेत.”

  24. मार्क ३:३०सुमारे इ.स. ३१

    असे त्यांनी म्हटले कारण येशूंमध्ये, “अशुद्ध आत्मा आहे” असे ते म्हणत होते.

  25. मार्क ३:३१सुमारे इ.स. ३१

    इतक्यात येशूंची आई आणि भाऊ येऊन बाहेर उभे राहिले आणि एकाला त्यांना बोलविण्यास पाठविले.