मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शास्ते १८:१७सुमारे इ.स.पू. १४०६

    मग ते पाच पुरुष, जे तो देश हेरायला गेले होते, ते आत गेले आणि त्यांनी तेथील मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता घेतली, जेव्हा पुरोहित आणि सहाशे सैनिक बाहेर प्रवेशद्वाराजवळ उभे होते.

  2. शास्ते १८:१८सुमारे इ.स.पू. १४०६

    जेव्हा ते पाच पुरुष मीखाहच्या घरी गेले आणि त्यांनी मूर्ती, एफोद, आणि कुलदेवता उचलत असता, पुरोहित त्यांना म्हणाला, “तुम्ही हे काय करत आहे?”

  3. शास्ते १८:१९सुमारे इ.स.पू. १४०६

    त्यांनी त्याला उत्तर दिले, “शांत राहा! एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आमच्याबरोबर ये आणि आमचा पिता आणि पुरोहित हो. केवळ एका मनुष्याचा पुरोहित होऊन राहण्यापेक्षा, इस्राएलातील एक संपूर्ण गोत्र आणि वंशाचा पुरोहित होऊन राहणे अधिक चांगले नाही का?”

  4. शास्ते १८:२०सुमारे इ.स.पू. १४०६

    तेव्हा त्या पुरोहिताला अतिशय आनंद झाला. त्याने एफोद, कुलदेवता आणि मूर्ती घेतली आणि तो त्या लोकांबरोबर गेला.

  5. शास्ते १८:२१सुमारे इ.स.पू. १४०६

    मग ते फिरले आणि कूच करीत असताना ते आपली लहान मुले, गुरे आणि सामान अग्रभागी घेऊन चालले.

  6. शास्ते १८:२२सुमारे इ.स.पू. १४०६

    जेव्हा ते मीखाहच्या घरापासून काही दूर गेले असता, मीखाहचे शेजारी एकत्र आले आणि त्यांनी दानच्या लोकांना गाठले.

  7. शास्ते १८:२३सुमारे इ.स.पू. १४०६

    जेव्हा त्यांनी दानच्या लोकांना हाक मारली तेव्हा ते वळले आणि मीखाहला विचारले, “तुला काय झाले आहे की तू आपल्या लोकांना युद्ध करण्यास घेऊन आला आहेस?”

  8. शास्ते १८:२४सुमारे इ.स.पू. १४०६

    मीखाहने प्रत्युत्तर दिले, “जे दैवत मी तयार केले त्यांना आणि माझ्या पुरोहिताला तुम्ही घेऊन जात आहात आणि उलट तुम्हीच मला विचारता? मला काय हवे आहे. ‘आता माझ्याजवळ काहीही राहिलेले नाही?’ ”

  9. शास्ते १८:२५सुमारे इ.स.पू. १४०६

    त्यावर दानच्या लोकांनी उत्तर दिले, “आमच्यासोबत वाद घालू नकोस, नाहीतर काही माणसांना राग येईल आणि ते तुझ्यावर हल्ला करतील आणि तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना आपला जीव गमवावा लागेल.”

  10. शास्ते १८:२६सुमारे इ.स.पू. १४०६

    मग दानचे लोक आपल्या मार्गाने गेले आणि मीखाहने पाहिले ते लोक फार शक्तिशाली आहेत, तेव्हा तो माघारी फिरला आणि आपल्या घरी गेला.

  11. शास्ते १८:२७सुमारे इ.स.पू. १४०६

    मग मीखाहने जे बनविले होते आणि त्याच्या पुरोहितासह दानचे लोक लईश या शहरात येऊन दाखल झाले. तेथील लोक शांत आणि सुरक्षित होते. त्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यांचे शहर जाळून टाकले.

  12. शास्ते १८:२८सुमारे इ.स.पू. १४०६

    त्यांना वाचविणारा कोणी नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर राहत होते आणि त्यांचा इतर लोकांशी कसलाही व्यवहार नव्हता. हे शहर बेथ-रहोब शेजारी असलेल्या खोर्‍यात होते. मग दानच्या लोकांनी ते शहर पुन्हा बांधले आणि ते तिथे राहू लागले.

  13. शास्ते १८:२९सुमारे इ.स.पू. १४०६

    त्यांनी त्या शहरास आपला पूर्वज, इस्राएलचा एक पुत्र दान त्याचे नाव दिले—त्या शहराचे मूळ नाव लईश होते.

  14. शास्ते १८:३०सुमारे इ.स.पू. १४०६

    मग दानच्या लोकांनी आपणासाठी मूर्तीची स्थापना केली व गेर्षोमाचा पुत्र, मोशेचा नातू योनाथान आणि त्याच्या पुत्रास, त्या देशाचा त्याच्या शत्रूकडून पाडाव होईपर्यंत दानच्या गोत्राचे पुरोहित म्हणून नेमले.

  15. शास्ते १८:३१सुमारे इ.स.पू. १४०६

    अशा रीतीने जोपर्यंत परमेश्वराचे निवासस्थान शिलोह येथे होते, तोपर्यंत मीखाहने तयार केलेली मूर्तीची उपासना दानच्या लोकांकडून केली जात होती.

  16. शास्ते १९:१सुमारे इ.स.पू. १४०६

    त्या दिवसामध्ये इस्राएलावर कोणी राजा नव्हता. लेवी वंशातील कोण एक मनुष्य एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील दुर्गम भागात राहत होता. त्याने यहूदीयातील बेथलेहेम मधील एक स्त्री आपली उपपत्नी करून घेतली.

  17. शास्ते १९:२सुमारे इ.स.पू. १४०६

    परंतु ती उपपत्नी त्याच्यासोबत विश्वासू राहिली नाही. तिने त्याला सोडले आणि यहूदीयातील बेथलेहेमातील आपल्या पित्याच्या घरी परतली. तिथे चार महिने राहिल्यानंतर,

  18. शास्ते १९:३सुमारे इ.स.पू. १४०६

    तिचा पती तिला परत आणावे म्हणून तिच्याकडे गेला. त्याच्याबरोबर त्याने एक सेवक आणि दोन गाढवे घेतली. तिने त्याला पित्याच्या घरी नेले आणि जेव्हा तिच्या पित्याने त्याला पाहिले, तेव्हा त्याने त्याचे आनंदाने स्वागत केले.

  19. शास्ते १९:४सुमारे इ.स.पू. १४०६

    त्याच्या सासर्‍याने म्हणजे स्त्रीच्या पित्याने त्याला थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला; आणि म्हणून तो त्याच्यासोबत खातपीत आणि विश्राम करीत तिथे तीन दिवस राहिला.

  20. शास्ते १९:५सुमारे इ.स.पू. १४०६

    चौथ्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्या मनुष्याने निघण्याची तयारी केली, परंतु स्त्रीच्या पित्याने आपल्या जावयाला म्हटले, “काहीतरी खाऊन तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा; नंतर तुम्ही जाऊ शकता.”

  21. शास्ते १९:६सुमारे इ.स.पू. १४०६

    मग त्या दोघांनी एकत्र बसून खाणेपिणे केले. त्यानंतर स्त्रीचा पिता म्हणाला, “कृपया आजची रात्र थांबा आणि आनंद करा.”

  22. शास्ते १९:७सुमारे इ.स.पू. १४०६

    आणि जेव्हा तो पुरुष जाण्यास उठला तेव्हा त्याच्या सासर्‍याने त्याला आग्रह केला, म्हणून त्या रात्री तो तिथे राहिला.

  23. शास्ते १९:८सुमारे इ.स.पू. १४०६

    पाचव्या दिवसाच्या सकाळी, जेव्हा तो जाण्यास उठला, स्त्रीच्या पित्याने म्हटले, “तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा. मग दुपारपर्यंत थांबा!” मग ते दोघे एकत्र जेवले.

  24. शास्ते १९:९सुमारे इ.स.पू. १४०६

    मग जेव्हा तो पुरुष, त्याची उपपत्नी आणि त्याचा सेवक जाण्यास उठले, तेव्हा त्याचा सासरा, त्या स्त्रीचा पिता म्हणाला, “पाहा, आता तर संध्याकाळ झालीच आहे. रात्र इथेच घालवा. दिवस संपत आला आहे. थांबा आणि आनंद करा. उद्या सकाळी लवकर उठा आणि आपल्या घरासाठी मार्गस्थ व्हा.”

  25. शास्ते १९:१०सुमारे इ.स.पू. १४०६

    परंतु आणखी एक रात्र थांबण्यास तयार झाला नाही, तो पुरुष निघाला आणि आपली उपपत्नी व त्याचे खोगीर घातलेले दोन गाढव घेऊन यबूस (म्हणजे यरुशलेम आहे) येथे निघाले.