- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1380–1050 BC
The Judges & Ruth
Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.
या कालखंडातील वचने
- शास्ते १९:११सुमारे इ.स.पू. १४०६
जेव्हा ते यबूस जवळ होते आणि दिवस उतरला होता, तेव्हा तो सेवक आपल्या धन्यास म्हणाला, “चला आपण या यबूसी लोकांच्या शहरात थांबू आणि रात्र घालवू.”
- शास्ते १९:१२सुमारे इ.स.पू. १४०६
त्याच्या धनी म्हणाला, “नाही, आपण अशा कोणत्याही शहरात जाणार नाही जेथील लोक इस्राएली नाहीत. आपण गिबियाहपर्यंत जाऊ.”
- शास्ते १९:१३सुमारे इ.स.पू. १४०६
तो आणखी म्हणाला, “चला आपण गिबियाह किंवा रामाहपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि यापैकी एका ठिकाणी मुक्काम करू.”
- शास्ते १९:१४सुमारे इ.स.पू. १४०६
तेव्हा ते प्रवास करीत पुढे निघाले आणि सूर्य मावळत असता ते बिन्यामीनच्या गिबियाहजवळ पोहोचले.
- शास्ते १९:१५सुमारे इ.स.पू. १४०६
तिथे रात्र घालविण्यासाठी ते गिबियाहात थांबले. ते शहराच्या चौकात बसले, परंतु कोणीही त्यांना आपल्या घरी घेतले नाही.
- शास्ते १९:१६सुमारे इ.स.पू. १४०६
त्या संध्याकाळी एक म्हातारा आपले शेतातले काम आटोपून येत होता. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील गिबियाहचा (तिथे बिन्यामीन लोक राहत होते) रहिवासी होता.
- शास्ते १९:१७सुमारे इ.स.पू. १४०६
त्याने शहराच्या चौकात तळ दिलेल्या प्रवाशांना पाहिले, आणि विचारले, “तुम्ही कुठे जात आहात? तुम्ही कुठून आला?”
- शास्ते १९:१८सुमारे इ.स.पू. १४०६
त्याने उत्तर दिले. “यहूदीयातील बेथलेहेमातून एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशाच्या दूरच्या ठिकाणी जिथे राहतो तिथे जात आहोत. मी यहूदीयातील बेथलेहेम नगरात गेलो होतो आणि आता मी याहवेहच्या भवनात जात आहे. परंतु कोणीही मला रात्र घालविण्यासाठी आपल्या घरात घेतलेले नाही.
- शास्ते १९:१९सुमारे इ.स.पू. १४०६
आमच्याजवळ आमच्या गाढवांसाठी दाणा आणि वैरण आहे आणि आमच्या सेवकांसाठी भाकरी आणि द्राक्षारस भरपूर आहे—मी, तुमची सेविका आणि आमच्यासोबतचा तरुण. आम्हाला कशाचीही उणीव नाही.”
- शास्ते १९:२०सुमारे इ.स.पू. १४०६
“तुमचे कल्याण असो,” तो म्हातारा गृहस्थ म्हणाला. “तुम्हाला जे काही लागेल ते मला पुरवू द्या. फक्त रात्र चौकात घालवू नका.”
- शास्ते १९:२१सुमारे इ.स.पू. १४०६
तेव्हा त्याने त्यांना आपल्याबरोबर घरी नेले. ते विश्रांती घेत असताना आणि त्यांच्या गाढवांना वैरण दिली. त्यांनी आपले पाय धुतले, त्यांनी काही खाणेपिणे केले.
- शास्ते १९:२२सुमारे इ.स.पू. १४०६
ते आनंदात असताना, गावातील काही अधम लोकांचे टोळके घराभोवती जमा झाले आणि दार जोरजोराने ठोकून त्या म्हातार्या मनुष्यास जो घराचा स्वामी होता त्यास ओरडून म्हणू लागले, “जो पुरुष तुझ्या घरी आला आहे त्यास बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर शारीरिक संबंध करू.”
- शास्ते १९:२३सुमारे इ.स.पू. १४०६
तेव्हा घराचा स्वामी बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “नाही, माझ्या बंधुजनांनो, असले नीच कृत्य करू नका, कारण तो पुरुष माझा पाहुणा आहे, तुम्ही हे घृणास्पद कृत्य करू नका.
- शास्ते १९:२४सुमारे इ.स.पू. १४०६
पाहा, इथे माझी कुमारी कन्या आणि त्याची उपपत्नी आहे. मी त्या दोघींना तुमच्याकडे बाहेर आणतो आणि त्यांच्याशी तुम्हाला वाटेल ते करा, परंतु त्या पुरुषाशी असले घृणास्पद कृत्य करू नका.”
- शास्ते १९:२५सुमारे इ.स.पू. १४०६
परंतु ती माणसे त्याचे ऐकेनात. मग त्या पुरुषाने आपल्या उपपत्नीला घेतले आणि तिला त्यांच्याकडे बाहेर पाठविले, आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि रात्रभर तिच्याशी कुकर्म केले व पहाटेस त्यांनी तिला जाऊ दिले.
- शास्ते १९:२६सुमारे इ.स.पू. १४०६
पहाटेस ती स्त्री आपला स्वामी राहत असलेल्या घरी परतली आणि घराच्या दाराशी खाली पडली आणि उजाडेपर्यंत ती तशीच पडून राहिली.
- शास्ते १९:२७सुमारे इ.स.पू. १४०६
सकाळी जेव्हा तिचा स्वामी उठला व घराचे दार उघडले आणि आपल्या प्रवासाला निघण्यासाठी बाहेर आला, तेव्हा त्याने त्याच्या उपपत्नीला घराच्या दारासमोर खाली पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले.
- शास्ते १९:२८सुमारे इ.स.पू. १४०६
तो तिला म्हणाला, “चल ऊठ, आपण निघू या.” परंतु काहीही उत्तर आले नाही. नंतर त्या मनुष्याने तिला गाढवाच्या पाठीवर घातले व तो आपल्या घरी गेला.
- शास्ते १९:२९सुमारे इ.स.पू. १४०६
जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याने एक सुरी घेतली आणि त्याच्या उपपत्नीचे एकएक भाग कापून बारा भाग केले आणि इस्राएलांच्या सर्व प्रदेशात पाठवून दिले.
- शास्ते १९:३०सुमारे इ.स.पू. १४०६
ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी एक दुसर्यांना म्हटले, “इस्राएली लोक इजिप्तमधून आले, तेव्हापासून आजवर अशी घटना पाहिली नाही किंवा केली नाही. आपण काहीतरी केलेच पाहिजे! चला बोलू या!”
- शास्ते २०:१सुमारे इ.स.पू. १४०६
तेव्हा दानपासून ते बेअर-शेबापर्यंतचे आणि गिलआदाच्या प्रदेशातून सर्व इस्राएली एकत्र आले आणि मिस्पाह येथे याहवेहसमोर जमा झाले.
- शास्ते २०:२सुमारे इ.स.पू. १४०६
इस्राएलाच्या सर्व गोत्रप्रमुखांनी परमेश्वराच्या लोकांच्या सभेत आपले स्थान घेतले, जे तलवारीने सज्ज असलेले चार लाख लोक होते.
- शास्ते २०:३सुमारे इ.स.पू. १४०६
(बिन्यामीन लोकांनी ऐकले की इस्राएली लोक वर मिस्पाह येथे गेले आहेत.) जेव्हा इस्राएली लोकांनी म्हटले, “आम्हाला सांग हे दुष्कर्म कसे घडले.”
- शास्ते २०:४सुमारे इ.स.पू. १४०६
तेव्हा तो लेवी, ज्या स्त्रीची हत्या करण्यात आली होती तिचा पती म्हणाला, “मी आणि माझी उपपत्नी बिन्यामीनच्या गिबियाह येथे रात्र घालविण्यास आलो.
- शास्ते २०:५सुमारे इ.स.पू. १४०६
रात्रीच्या वेळेस गिबियाहतील लोक माझ्यामागे आले आणि घरास वेढा घातला व माझा घात करण्याचा त्यांचा बेत होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली.