- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1380–1050 BC
The Judges & Ruth
Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.
या कालखंडातील वचने
- शास्ते २०:६सुमारे इ.स.पू. १४०६
तेव्हा मी उपपत्नीला घेतले आणि तिच्या शरीराचे कापून बारा तुकडे केले व ते इस्राएलांच्या वारसांच्या सर्व प्रांतात पाठवून दिले, कारण इस्राएलात त्यांनी हे अपवित्र आणि घृणास्पद कृत्य केले.
- शास्ते २०:७सुमारे इ.स.पू. १४०६
तर आता इस्राएलांच्या सर्व लोकांनो, बोला आणि तुम्ही कोणता निर्णय घेतला ते मला सांगा.”
- शास्ते २०:८सुमारे इ.स.पू. १४०६
सर्व पुरुष एकत्र उठून एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही घरी परतणार नाही. नाही, आपल्यापैकी कोणीही त्याच्या घरी परतणार नाही.
- शास्ते २०:९सुमारे इ.स.पू. १४०६
पण आता आम्ही हे गिबियाहविषयी करणार: आपण चिठ्ठ्या टाकून त्याच्या क्रमानुसार त्यांच्या विरोधात जाऊ.
- शास्ते २०:१०सुमारे इ.स.पू. १४०६
आपण इस्राएलाच्या सर्व गोत्रांतून शंभरातून दहा आणि हजारातून शंभर आणि दहा हजारातून एक हजार पुरुष निवडू आणि हे सैन्याकरिता भोजनसामुग्री आणतील. जेव्हा ते सैन्य बिन्यामीनच्या गेबा येथे पोहोचेल, तेव्हा इस्राएलात त्यांनी केलेल्या भयंकर घृणास्पद कृत्याबद्दल शिक्षा करेल.”
- शास्ते २०:११सुमारे इ.स.पू. १४०६
अशा रीतीने सर्व इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी शहराविरुद्ध एकजूट केली.
- शास्ते २०:१२सुमारे इ.स.पू. १४०६
मग इस्राएली गोत्रांनी, सर्व बिन्यामीन गोत्राकडे दूत पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये ही भयंकर गोष्ट झाली आहे ती काय आहे?
- शास्ते २०:१३सुमारे इ.स.पू. १४०६
गिबियाह नगरातील या दुष्कर्म्यांना आमच्या स्वाधीन करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारू आणि इस्राएलातील दुष्टता काढून टाकू.” परंतु बिन्यामीन लोक आपल्या इस्राएली भाऊबंदाचे ऐकेनात.
- शास्ते २०:१४सुमारे इ.स.पू. १४०६
बिन्यामीन वंशज आपल्या नगरातून येऊन ते गिबियाह येथे इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र झाले.
- शास्ते २०:१५सुमारे इ.स.पू. १४०६
बिन्यामीन लोकांनी ताबडतोब आपआपल्या नगरांतून सव्वीस हजार तलवार चालविण्यास निपुण अशी माणसे आणि गिबियाह येथील स्थानिक सातशे कुशल तरुण जमविले.
- शास्ते २०:१६सुमारे इ.स.पू. १४०६
या सर्व सैनिकांमध्ये सातशे निवडक पुरुष डावखुरे होते. ते एवढे नेमबाज होते की त्यांच्या गोफणीचा नेम केसभरदेखील चुकत नसे.
- शास्ते २०:१७सुमारे इ.स.पू. १४०६
बिन्यामीन गोत्राला सोडून इस्राएलांच्या सेनेतील तलवार चालविण्यास निपुण पुरुषांची संख्या चार लाख होती, ते सर्व योद्धे होते.
- शास्ते २०:१८सुमारे इ.स.पू. १४०६
इस्राएली लोक वर बेथेल येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?” याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.”
- शास्ते २०:१९सुमारे इ.स.पू. १४०६
इस्राएली लोक दुसर्या दिवशी उठले आणि त्यांनी गिबियाहजवळ तळ दिला.
- शास्ते २०:२०सुमारे इ.स.पू. १४०६
मग इस्राएली लोक बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी गेले आणि त्यांनी गिबियाह येथे त्यांच्याविरुद्ध युद्धाची व्यूहरचना केली.
- शास्ते २०:२१सुमारे इ.स.पू. १४०६
बिन्यामीन लोक गिबियाहतून बाहेर आले आणि त्यांनी त्या दिवशी युद्धभूमीवर इस्राएली लोकांचे बावीस हजार पुरुष ठार केले.
- शास्ते २०:२२सुमारे इ.स.पू. १४०६
परंतु इस्राएली लोकांनी एकमेकांना प्रोत्साहन दिले आणि पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी मोर्चा दिला होता, दुसर्या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा मोर्चा दिला.
- शास्ते २०:२३सुमारे इ.स.पू. १४०६
इस्राएली लोक वर गेले आणि याहवेहपुढे संध्याकाळपर्यंत रडले आणि त्यांनी याहवेहला विचारले. ते म्हणाले, “आमचे बिन्यामीन भाऊबंद यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास आम्ही परत वर जावे का?” याहवेहने उत्तर दिले, “वर जाऊन हल्ला करा.”
- शास्ते २०:२४सुमारे इ.स.पू. १४०६
दुसर्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीन लोकांवर हल्ला केला.
- शास्ते २०:२५सुमारे इ.स.पू. १४०६
या वेळेस जेव्हा बिन्यामीन लोक त्यांच्या विरोध करण्यास गिबियाहतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी इस्राएली लोकांचे आणखी अठरा हजार पुरुष ठार केले, जे सर्व तलवारीने सशस्त्र होते.
- शास्ते २०:२६सुमारे इ.स.पू. १४०६
मग संपूर्ण इस्राएली लोक, संपूर्ण सेना वर बेथेल येथे गेली आणि तिथे ते याहवेहसमोर रडत बसले. त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि याहवेहला होमबली व शांत्यर्पणे अर्पिली.
- शास्ते २०:२७सुमारे इ.स.पू. १४०६
आणि इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले. (त्या समयी परमेश्वराचा कराराचा कोश तिथे होता,
- शास्ते २०:२८सुमारे इ.स.पू. १४०६
एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?” याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.”
- शास्ते २०:२९सुमारे इ.स.पू. १४०६
तेव्हा इस्राएलने गिबियाहच्या सभोवती दबा धरणारे बसविले.
- शास्ते २०:३०सुमारे इ.स.पू. १४०६
तिसर्या दिवशी इस्राएली लोकांनी बिन्यामीनच्या लोकांविरुद्ध युद्ध केले आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिबियाहजवळ व्यूहरचना केली.