मुख्य मजकुरावर जा

circa 1380–1050 BC

The Judges & Ruth

Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.

703 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शास्ते १६:११सुमारे इ.स.पू. ११२०

    तो म्हणाला, “ज्यांचा कधीही वापर केला नाही अशा अगदी नव्या कोर्‍या दोरांनी जर मला कोणी बांधून टाकले, तर मी इतर मनुष्यासारखा बलहीन होईन.”

  2. शास्ते १६:१२सुमारे इ.स.पू. ११२०

    तेव्हा दलीलाने नवीन दोर घेतले आणि त्यांनी त्याला बांधून टाकले. नंतर लोक खोलीत लपून बसलेले होते, ती त्याला म्हणाली, “शमशोन पलिष्टी लोक तुमच्यावर चालून आले आहेत!” परंतु शमशोनाने दंडाला बांधलेले दोर, सुताचा धागा तोडावा त्याप्रमाणे तोडून टाकले!

  3. शास्ते १६:१३सुमारे इ.स.पू. ११२०

    तेव्हा दलीलाने शमशोनास म्हटले, “आतापर्यंत तुम्ही मला मूर्ख बनविले आणि आणि मला खोटे सांगितले. मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.” तो तिला म्हणाला, “पाहा, माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या आणि त्या फणीने घट्ट केल्या तर मी इतर माणसांसारखा बलहीन होईन.” मग तो झोपला असताना, दलीलाने त्याच्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागात गुंफल्या

  4. शास्ते १६:१४सुमारे इ.स.पू. ११२०

    आणि ते फणीने घट्ट केल्या. परत ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला व त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.

  5. शास्ते १६:१५सुमारे इ.स.पू. ११२०

    नंतर ती त्याला म्हणाली, “जेव्हा तुमचे हृदय माझ्यावर नाही, तेव्हा तुम्हाला कसे म्हणता येईल, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो?’ ही तिसरी वेळ आहे जेव्हा तुम्ही मला मूर्ख बनविले आहे आणि तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य सांगितले नाही.”

  6. शास्ते १६:१६सुमारे इ.स.पू. ११२०

    दररोज बोलून बोलून तिने त्याला भांडावून सोडले; त्याला जीव नकोसा झाला.

  7. शास्ते १६:१७सुमारे इ.स.पू. ११२०

    म्हणून त्याने तिला सर्वकाही सांगितले, “माझ्या डोक्यावर कधीही वस्तरा वापरला नाही,” तो म्हणाला, “कारण मी माझ्या आईच्या उदरात होतो तेव्हापासून मी परमेश्वराला समर्पित एक नाजीर आहे. जर माझे केस कापले गेले, तर माझी शक्ती मला सोडून जाईल आणि मी दुसर्‍या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन बनेन.”

  8. शास्ते १६:१८सुमारे इ.स.पू. ११२०

    जेव्हा दलीलाने पाहिले की त्याने तिला सर्वकाही सांगितले आहे, तेव्हा तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांना निरोप पाठविला, “एकदा अजून या; त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांच्या हातात चांदी घेऊन परत आले.

  9. शास्ते १६:१९सुमारे इ.स.पू. ११२०

    त्याला आपल्या मांडीवर झोपविल्यानंतर, तिने कोणाला तरी बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करून घेतले आणि तिने त्याला वश करण्यास प्रारंभ केला आणि त्याचे सामर्थ्य त्याला सोडून गेले.

  10. शास्ते १६:२०सुमारे इ.स.पू. ११२०

    मग ती म्हणाली, “शमशोन, तुमच्यावर पलिष्टी चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याला वाटले, “मी पूर्वीप्रमाणेच बाहेर जाईन आणि झटका मारून स्वतःस मोकळे करेन.” परंतु याहवेहने त्याला सोडले आहे, हे त्याला कळले नाही.

  11. शास्ते १६:२१सुमारे इ.स.पू. ११२०

    तेव्हा पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडून टाकले. नंतर खाली गाझा येथे घेऊन गेले. त्याला कास्याच्या साखळ्यांनी जखडून कारागृहात त्याला धान्य दळावयाला लावले.

  12. शास्ते १६:२२सुमारे इ.स.पू. ११२०

    परंतु त्याच्या डोक्यावरील केस मुंडण झाल्यानंतर पुन्हा वाढू लागले.

  13. शास्ते १६:२३सुमारे इ.स.पू. ११२०

    आता पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांचे दैवत दागोनला यज्ञ अर्पण करून उत्सव करण्यास एकत्र आले आणि म्हणाले, “आमच्या दैवताने आमचा शत्रू शमशोनला आमच्या हाती दिले आहे.”

  14. शास्ते १६:२४सुमारे इ.स.पू. ११२०

    जेव्हा त्यांनी शमशोनला पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या दैवताची स्तुती करीत ते म्हणाले, “आमच्या दैवताने आमच्या शत्रूला आमच्या हाती दिले आहे, जो आमच्या देशाची गांजणूक करणारा व आमच्या लोकांतील अनेकांचा संहार करणारा होता.”

  15. शास्ते १६:२५सुमारे इ.स.पू. ११२०

    जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली. जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले,

  16. शास्ते १६:२६सुमारे इ.स.पू. ११२०

    तेव्हा ज्या सेवकाने त्याचा हात धरला होता त्यास शमशोन म्हणाला, “मला अशा ठिकाणी ठेव जेणेकरून ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मी चाचपडू शकेन, म्हणजे मी त्याचावर टेकेन.”

  17. शास्ते १६:२७सुमारे इ.स.पू. ११२०

    आता ते मंदिर पूर्णपणे पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते; पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तिथे होते आणि गच्चीवर सुमारे तीन हजार पुरुष आणि स्त्रिया शमशोन करीत असलेली करमणूक पाहत होते.

  18. शास्ते १६:२८सुमारे इ.स.पू. ११२०

    मग शमशोनाने याहवेहला प्रार्थना केली, अहो, सार्वभौम याहवेह माझी आठवण करा. परमेश्वरा कृपा करून आणखी एकदाच मला बळ द्या आणि म्हणजे या पलिष्ट्यांचा मी माझ्या दोन्ही डोळ्यांबद्दल सूड घेऊ शकेन.

  19. शास्ते १६:२९सुमारे इ.स.पू. ११२०

    मग ज्या मधल्या दोन खांबांवर मंदिर आधारलेले होते, त्यास शमशोनाने एका बाजूला त्याच्या उजव्या हाताने, आणि दुसर्‍या बाजूला डाव्या हाताने धरले,

  20. शास्ते १६:३०सुमारे इ.स.पू. ११२०

    शमशोन म्हणाला, “या पलिष्ट्यांबरोबर मलाही मृत्यू येवो!” नंतर त्याने आपल्या पूर्ण सामर्थ्याने ढकलले आणि ते मंदिर अधिकारी आणि सर्व लोकांवर कोसळले. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याने जेवढे लोक ठार केले त्यांची संख्या, त्याने आपल्या सर्व हयातीत मारलेल्या संख्येहून अधिक होती.

  21. शास्ते १६:३१सुमारे इ.स.पू. ११२०

    नंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी त्याचे भाऊबंद आणि पित्याच्या घरचे सर्व कुटुंब खाली आले. त्यांनी त्याला परत आणले व सोराह आणि एष्टाओल यांच्या दरम्यान त्याचा पिता मानोहाला मूठमाती दिली होती, तिथेच त्यालाही मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.

  22. शास्ते १७:१सुमारे इ.स.पू. १४१९

    एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाह नावाचा एक मनुष्य होता,

  23. शास्ते १७:२सुमारे इ.स.पू. १४१९

    तो आपल्या आईला म्हणाला, “तुझी अकराशे शेकेल चांदीची नाणी कोणीतरी चोरली असे तुला वाटत होते त्याबद्दल तू चोराला शाप देत होतीस ती चांदीची नाणी मीच चोरली होती.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, याहवेह तुला आशीर्वाद देवो!”

  24. शास्ते १७:३सुमारे इ.स.पू. १४१९

    जेव्हा त्याने ती अकराशे चांदीची नाणी त्याच्या आईला परत दिली, ती म्हणाली, “माझ्या मुलाने चांदीने मढविलेली प्रतिमा बनवण्यासाठी मी माझी चांदी याहवेहला समर्पित करते. मी ते तुला परत देईन.”

  25. शास्ते १७:४सुमारे इ.स.पू. १४१९

    जेव्हा त्याने चांदी त्याच्या आईला परत केली, तिने दोनशे शेकेल चांदी घेतली आणि रौप्यकाराला दिली, जो त्याद्वारे मूर्ती बनवित असे आणि ती मीखाहच्या घरात ठेवण्यात आली.