- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1380–1050 BC
The Judges & Ruth
Israel cycles through rebellion, oppression, and rescue under charismatic leaders—culminating in Ruth's faithful love story.
या कालखंडातील वचने
- शास्ते १५:६सुमारे इ.स.पू. ११४१
तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” त्यांना सांगण्यात आले, “हे तिम्नाहचा जावई शमशोनाने केले, कारण त्याची पत्नी त्याच्या सोबत्याला देण्यात आली आहे.” तेव्हा पलिष्टी लोक आले व त्यांनी तिला व तिच्या पित्याला जाळून टाकले.
- शास्ते १५:७सुमारे इ.स.पू. ११४१
शमशोन त्यांना म्हणाला, “आता तुम्ही याप्रकारे वागला आहात म्हणून, मी अशी शपथ घेतो की तुमच्यावर सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही.”
- शास्ते १५:८सुमारे इ.स.पू. ११४१
तेव्हा अतिशय क्रूरतेने त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी अनेकांना ठार केले. त्यानंतर तो खाली गेला आणि एटाम खडकातील गुहेत राहू लागला.
- शास्ते १५:९सुमारे इ.स.पू. ११४१
इकडे पलिष्टी लोक वर गेले आणि त्यांनी यहूदीयात तळ ठोकला व लेहीवर हल्ला केला.
- शास्ते १५:१०सुमारे इ.स.पू. ११४१
तेव्हा यहूदीयाच्या लोकांनी विचारले, “तुम्ही आमच्यासोबत युद्ध करण्यास का आलात?” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही शमशोनाला कैदी करून घेऊन जाण्यास आलो आहोत, कारण जसे त्याने आमचे केले तसे आम्ही त्याचे करणार आहोत.”
- शास्ते १५:११सुमारे इ.स.पू. ११४१
तेव्हा यहूदाहचे तीन हजार लोक खाली एटाम खडकातील गुहेकडे गेले आणि ते शमशोनाला म्हणाले, “पलिष्टी लोक आपल्यावर राज्य करतात हे तुला माहीत नाही काय? तू आमच्यासोबत हे काय केले?” त्याने उत्तर दिले, “ज्याप्रकारे त्यांनी माझ्याशी वर्तन केले तसेच मीही त्यांच्याशी केले.”
- शास्ते १५:१२सुमारे इ.स.पू. ११४१
ते त्याला म्हणाले, “आम्ही तुला बांधण्यासाठी आणि तुला पलिष्टी लोकांच्या हवाली करण्यासाठी आलो आहोत.” शमशोन म्हणाला, “तुम्ही मला ठार मारणार नाही, अशी शपथ माझ्याजवळ घ्या.”
- शास्ते १५:१३सुमारे इ.स.पू. ११४१
“आम्ही सहमत आहोत,” त्यांनी उत्तर दिले. “आम्ही फक्त तुला बांधणार आणि तुला त्यांच्या हवाली करणार. आम्ही तुला मारणार नाही.” तेव्हा त्यांनी त्याला दोन नव्या दोरांनी बांधले आणि खडकाच्या कपारीतून बाहेर आणून वर नेले.
- शास्ते १५:१४सुमारे इ.स.पू. ११४१
जेव्हा तो लेहीला पोहोचला, तेव्हा पलिष्टी लोक ओरडत पुढे आले. याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर उतरला. ज्या दोरांनी त्याच्या दंडांना बांधले होते ते दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि त्याच्या हातांवरून गळून पडले.
- शास्ते १५:१५सुमारे इ.स.पू. ११४१
मग तिथे त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले, त्याने ते उचलले आणि एक हजार पलिष्ट्यांस ठार केले.
- शास्ते १५:१६सुमारे इ.स.पू. ११४१
मग शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने मी राशींवर राशी पाडल्या. केवळ गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे वधली.”
- शास्ते १५:१७सुमारे इ.स.पू. ११४१
आपले बोलणे संपविल्यावर त्याने आपल्या हातातील ते जाभाड फेकून दिले; आणि त्या ठिकाणाचे नाव त्याने रामाथ-लेही असे ठेवले.
- शास्ते १५:१८सुमारे इ.स.पू. ११४१
त्याला अतिशय तहान लागली होती, तेव्हा त्याने याहवेहचा धावा केला, “तुम्ही आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे. आता मी तहानेने मरावे काय आणि बेसुंती लोकांच्या हाती पडावे काय?”
- शास्ते १५:१९सुमारे इ.स.पू. ११४१
तेव्हा परमेश्वराने लेहीतील खोलगट जागा दुभंगली आणि त्यातून पाणी बाहेर आले. जेव्हा शमशोन ते पाणी प्याला, तेव्हा त्याची शक्ती परत आली आणि तो ताजातवाना झाला. मग त्याने त्या ठिकाणाचे नाव एन-हक्कोरे असे ठेवले. आज देखील तो झरा लेही येथे आढळतो.
- शास्ते १५:२०सुमारे इ.स.पू. ११४१
पलिष्टी लोकांच्या काळात शमशोनाने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले.
- शास्ते १६:१सुमारे इ.स.पू. ११२०
एके दिवशी शमशोन गाझा येथे गेला, जिथे त्याने एका वेश्येला पाहिले. तिच्यासोबत रात्र घालविण्यास तो आत गेला.
- शास्ते १६:२सुमारे इ.स.पू. ११२०
गाझा येथील लोकांना सांगण्यात आले, “शमशोन येथे आला आहे!” म्हणून त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि त्याची वाट पाहत शहराच्या वेशीत रात्रभर दबा धरून बसले. त्यांनी रात्रभर कोणतीही हालचाल केली नाही, ते म्हणाले, “पहाटेस आपण त्याला ठार मारू.”
- शास्ते १६:३सुमारे इ.स.पू. ११२०
परंतु मध्यरात्री पर्यंत शमशोन तिथे झोपला. मग तो उठला आणि त्याने शहराच्या वेशीची दारे, दोन्ही खांब व अडसरासह जमिनीतून उखडून काढली व आपल्या खांद्यांवर ठेवून हेब्रोनासमोरील डोंगरमाथ्यावर नेली.
- शास्ते १६:४सुमारे इ.स.पू. ११२०
काही काळानंतर सोरेक खोर्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले.
- शास्ते १६:५सुमारे इ.स.पू. ११२०
पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे गेले व म्हणाले, “काहीतरी युक्ती कर आणि त्याच्या बळाचे रहस्य काय आहे आणि त्याच्यावर प्रबल होऊन, त्याला बांधून आपल्याला वश कसे करावे हे विचार. आम्ही प्रत्येकजण तुला चांदीची अकराशे शेकेल देऊ.”
- शास्ते १६:६सुमारे इ.स.पू. ११२०
दलीला शमशोनास म्हणाली, “मला सांगा, तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य काय आहे आणि तुम्हाला कशाने बांधावे आणि तुम्ही शक्तिहीन व्हाल.”
- शास्ते १६:७सुमारे इ.स.पू. ११२०
शमशोनाने तिला उत्तर दिले, “जर मला कोणी धनुष्याच्या न सुकलेल्या ताज्या सात दोर्यांनी बांधले, तर मी दुसर्या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन होईन.”
- शास्ते १६:८सुमारे इ.स.पू. ११२०
तेव्हा पलिष्टी अधिकार्यांनी तिला धनुष्याच्या न सुकलेल्या सात ताज्या दोर्या आणून दिल्या आणि तिने त्याला बांधून टाकले.
- शास्ते १६:९सुमारे इ.स.पू. ११२०
काही लोक खोलीत लपून होते, तिने त्याला म्हटले, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आलेले आहेत!” परंतु अग्नीजवळ जाताच सुताचा धागा जसा सहज तुटून जातो त्याप्रमाणे शमशोनाने त्या धनुष्याच्या दोर्या तोडून टाकल्या जणू आणि त्याच्या बळाचे रहस्य उघडकीस आले नाही.
- शास्ते १६:१०सुमारे इ.स.पू. ११२०
त्यानंतर दलीला शमशोनास म्हणाली, “तुम्ही मला मूर्ख बनविले आहे; तुम्ही मला खोटे सांगितले. तर आता, मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.”