- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 30–62
The Early Church
Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.
या कालखंडातील वचने
- प्रेषित १९:३९सुमारे इ.स. ५८
जर यापेक्षा इतर गोष्टी असतील तर, त्या न्यायसभेमध्ये मिटविता येतील.
- प्रेषित १९:४०सुमारे इ.स. ५८
वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.”
- प्रेषित १९:४१सुमारे इ.स. ५८
असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.
- प्रेषित २०:१सुमारे इ.स. ६०
जेव्हा गडबड शांत झाली, तेव्हा पौलाने शिष्यांना बोलाविले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर, त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियाला जाण्यास निघाला.
- प्रेषित २०:२सुमारे इ.स. ६०
त्या भागातून प्रवास करून त्याने लोकांना अनेक उत्तेजनपर शब्द सांगितले आणि शेवटी तो ग्रीसमध्ये आला,
- प्रेषित २०:३सुमारे इ.स. ६०
तिथे तो तीन महिने राहिला. पुढे सीरियाला जलमार्गाने जाण्याची तो तयारी करीत असताना, यहूदी कट कारस्थान करीत आहेत, हे त्याच्या नजरेस आले, तेव्हा मासेदोनियामधून जाण्याचे त्याने ठरविले.
- प्रेषित २०:४सुमारे इ.स. ६०
त्याच्याबरोबर बिरुया मध्ये राहणारा पुर्राचा पुत्र सोपत्र, थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस व तीमथ्य देखील, तसेच आशिया प्रांतातील तुखिक व त्रोफिम होते.
- प्रेषित २०:५सुमारे इ.स. ६०
ते पुढे जाऊन त्रोवास येथे आमची वाट पाहत होते.
- प्रेषित २०:६सुमारे इ.स. ६०
परंतु आम्ही बेखमीर भाकरीच्या सणानंतर फिलिप्पैहून तारवात बसून पाच दिवसानंतर त्रोवास येथे एकत्रित जमलो. तिथे आम्ही सात दिवसांचा मुक्काम केला.
- प्रेषित २०:७सुमारे इ.स. ६०
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला.
- प्रेषित २०:८सुमारे इ.स. ६०
वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमलो होतो, तिथे पुष्कळ दिव्यांचा प्रकाश होता.
- प्रेषित २०:९सुमारे इ.स. ६०
तेव्हा पौल बोलत राहिल्यामुळे युतुख नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता, त्याला गुंगी येऊन गाढ झोप लागली. तो गाढ झोपेत असताना, तिसर्या मजल्यावरून खाली जमिनीवर पडला आणि त्यास उचलले तेव्हा तो मरण पावला आहे असे दिसून आले.
- प्रेषित २०:१०सुमारे इ.स. ६०
तेव्हा पौल खाली गेला आणि त्या तरुणावर पाखर घालून आपल्या हाताने कवटाळले व म्हणाला, “भयभीत होऊ नका, तो जिवंत आहे!”
- प्रेषित २०:११सुमारे इ.स. ६०
मग तो पुन्हा वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने भाकर मोडून खाल्ली. पहाट होईपर्यंत बोलत राहिल्यावर तो रवाना झाला.
- प्रेषित २०:१२सुमारे इ.स. ६०
लोक त्या तरुणाला जिवंत घरी घेऊन आले म्हणून त्यांना अतिशय समाधान वाटले.
- प्रेषित २०:१३सुमारे इ.स. ६०
पौल अस्सोस नगराकडे पायी जाणार होता म्हणून त्याने असे ठरविले की, आम्ही तारवात बसून अस्सोसला पुढे जावे आणि तिथे पोहोचल्यावर त्याला तारवात घ्यावे.
- प्रेषित २०:१४सुमारे इ.स. ६०
त्याप्रमाणे तो अस्सोस या ठिकाणी आम्हाला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही पुढे मतुलेनास गेलो.
- प्रेषित २०:१५सुमारे इ.स. ६०
दुसर्या दिवशी तारवात बसून आम्ही खियोस बंदर पार केले. त्यानंतरच्या पुढील दिवशी सामोस बंदर पार केले, मग दुसर्या दिवशी मिलेतास आलो.
- प्रेषित २०:१६सुमारे इ.स. ६०
आशिया प्रांतामध्ये फार दिवस राहावे लागू नये म्हणून इफिस शहराच्या पुढे जाण्याचे पौलाने ठरविले होते, कारण शक्य झाल्यास पेन्टेकॉस्टच्या दिवसांच्या वेळी यरुशलेममध्ये पोहोचावे, या दृष्टीने तो घाई करीत होता.
- प्रेषित २०:१७सुमारे इ.स. ६०
मिलेताहून पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडीलजनांना निरोप पाठविला.
- प्रेषित २०:१८सुमारे इ.स. ६०
ते आल्यानंतर त्याने त्यांना म्हटले, “मी आशियात आल्यानंतर पहिल्या दिवसापासून पूर्णवेळ तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो व कसा राहिलो, याची तुम्हाला जाणीव आहे.
- प्रेषित २०:१९सुमारे इ.स. ६०
म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळीत आणि माझ्या यहूदीयांच्या कटांमुळे मजवर आलेली अतिशय कठीण परीक्षा व संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हाला माहीत आहे.
- प्रेषित २०:२०सुमारे इ.स. ६०
जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले.
- प्रेषित २०:२१सुमारे इ.स. ६०
त्यांनी पश्चात्ताप करून परमेश्वराकडे वळणे आवश्यक आहे आणि आपल्या प्रभू येशूंवर विश्वास ठेवावा याविषयी यहूदी व गैरयहूदी लोकांमध्ये मी घोषणा करीत आलो आहे.
- प्रेषित २०:२२सुमारे इ.स. ६०
“आणि आता, जसे आत्म्याद्वारे मला यरुशलेमकडे जाण्यास भाग पाडले जात आहे. तिथे माझ्याबाबतीत काय होणार आहे याची मला जाणीव नाही.