मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित १८:१७सुमारे इ.स. ५४

    त्यानंतर जमावाने सोस्थनेस या सभागृहाच्या पुढार्‍यास पकडले आणि न्यायालयासमोरच त्याला मार दिला; परंतु गल्लियोने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही.

  2. प्रेषित १८:१८सुमारे इ.स. ५४

    पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्‍या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विलाला बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता.

  3. प्रेषित १८:१९सुमारे इ.स. ५४

    इफिसमध्ये पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विलाला तिथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला.

  4. प्रेषित १८:२०सुमारे इ.स. ५४

    जेव्हा त्यांनी पौलाला विनंती केली की, त्याने त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवावा, परंतु पौलाने ते नाकारले.

  5. प्रेषित १८:२१सुमारे इ.स. ५४

    परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला.

  6. प्रेषित १८:२२सुमारे इ.स. ५४

    जेव्हा तो कैसरीया येथे पोहोचला, तेव्हा तिथून तो वर यरुशलेमकडे आला आणि तेथील मंडळीला अभिवादन करून तो अंत्युखियास गेला.

  7. प्रेषित १८:२३सुमारे इ.स. ५४

    अंत्युखियामध्ये थोडा काळ घालविल्यानंतर, तिथून पौल बाहेर पडला आणि गलातीया व फ्रुगिया या प्रांतामधून ठिकठिकाणी प्रवास करीत तेथील सर्व शिष्यांना त्याने प्रोत्साहित केले.

  8. प्रेषित १८:२४सुमारे इ.स. ५४

    त्याचवेळी आलेक्सांद्रियाचा रहिवासी, अपुल्लोस नावाचा यहूदी इफिस येथे आला होता. तो एक विद्वान मनुष्य होता आणि त्याला शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.

  9. प्रेषित १८:२५सुमारे इ.स. ५४

    प्रभूच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आलेले होते आणि तो आवेशाने बोलत होता, जरी त्याला फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याबद्दल माहिती होती, तरी येशूंबद्दल अचूक शिक्षण देत होता.

  10. प्रेषित १८:२६सुमारे इ.स. ५४

    तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.

  11. प्रेषित १८:२७सुमारे इ.स. ५४

    जेव्हा अपुल्लोसला अखया येथे जायचे होते, तेव्हा बंधू व भगिनींनी त्याला उत्तेजन दिले व अखया येथील शिष्यांनी त्याचे स्वागत करावे असे विनंती पत्र त्याच्या हाती देऊन त्याचा निरोप घेतला. जेव्हा तो तिथे आला, तेव्हा कृपेद्वारे ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना त्याची फार मोठी मदत झाली.

  12. प्रेषित १८:२८सुमारे इ.स. ५४

    कारण सार्वजनिक वाद करून त्याने अतिशय सशक्तपणे यहूदीयांच्या सर्व वादांचे खंडन केले आणि शास्त्राच्या आधाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, येशू हेच ख्रिस्त आहेत.

  13. प्रेषित १९:१सुमारे इ.स. ५८

    अपुल्लोस करिंथ येथे असताना, पौल अंतर्भागातून प्रवास करीत इफिस येथे आला. तिथे त्याला काही शिष्य आढळले.

  14. प्रेषित १९:२सुमारे इ.स. ५८

    त्याने त्यांना विचारले, “तुम्ही विश्वास ठेवला त्यावेळी, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी उत्तर दिले, “नाही, पवित्र आत्मा काय आहे हे आम्ही ऐकले देखील नाही.”

  15. प्रेषित १९:३सुमारे इ.स. ५८

    तेव्हा पौलाने त्यांना विचारले, “तर मग तुम्ही कोणता बाप्तिस्मा घेतला?” “योहानाचा बाप्तिस्मा,” ते उत्तरले.

  16. प्रेषित १९:४सुमारे इ.स. ५८

    मग पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा हा पश्चात्तापाचा बाप्तिस्मा होता. त्याने लोकांना जो त्याच्यामागून येणार होता त्या येशूंवर विश्वास ठेवण्यास सांगितले.”

  17. प्रेषित १९:५सुमारे इ.स. ५८

    हे ऐकल्यानंतर, त्यांचा प्रभू येशूंच्या नावात बाप्तिस्मा करण्यात आला.

  18. प्रेषित १९:६सुमारे इ.स. ५८

    मग पौलाने आपले हात त्यांच्यावर ठेवले, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले.

  19. प्रेषित १९:७सुमारे इ.स. ५८

    ते सर्व बारा पुरुष होते.

  20. प्रेषित १९:८सुमारे इ.स. ५८

    मग पौलाने सभागृहामध्ये प्रवेश केला आणि अतिशय धैर्याने परमेश्वराच्या राज्याविषयी संवाद करीत व प्रमाण पटवीत तीन महिने चर्चा करीत राहिला.

  21. प्रेषित १९:९सुमारे इ.स. ५८

    परंतु काहीजण हटवादी झाले; त्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले आणि जाहीरपणे द्वेषाच्या भावनेने त्या मार्गाविषयी विषयी बोलू लागले. तेव्हा पौल त्यांच्यामधून निघून गेला व शिष्यांना आपल्याबरोबर घेऊन त्याने तुरन्नाच्या व्याख्यानगृहात रोज संवाद केला.

  22. प्रेषित १९:१०सुमारे इ.स. ५८

    असे दोन वर्षे ते सातत्याने करीत राहिले. त्यामुळे आशिया प्रांतात राहणार्‍या सर्व यहूदी व गैरयहूदी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले.

  23. प्रेषित १९:११सुमारे इ.स. ५८

    परमेश्वराने पौलाद्वारे असाधारण अशी आश्चर्यकृत्ये केली,

  24. प्रेषित १९:१२सुमारे इ.स. ५८

    त्यामुळे असे झाले की, ज्या रुमालांना आणि अंगावरील वस्त्रांना पौलाचा फक्त स्पर्श झाला होता, ते रुमाल व वस्त्र आजार्‍यांकडे नेले आणि त्यांचे आजार बरे झाले आणि दुरात्मे त्यांना सोडून गेले.

  25. प्रेषित १९:१३सुमारे इ.स. ५८

    काही यहूदी प्रभू येशूंचे नाव घेऊन फिरत होते आणि ज्यांना दुरात्म्यांनी पछाडलेले होते त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. ते असे म्हणत होते, “ज्या येशूंच्या नावाची पौल घोषणा करीत आहे, त्या नावाने मी तुला आज्ञा करतो की याच्यामधून बाहेर नीघ.”