- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 30–62
The Early Church
Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.
या कालखंडातील वचने
- प्रेषित १९:१४सुमारे इ.स. ५८
स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते.
- प्रेषित १९:१५सुमारे इ.स. ५८
एके दिवशी त्या दुरात्म्याने त्यांना म्हटले, “येशू मला माहीत आहे आणि पौलही मला माहीत आहे, परंतु तुम्ही कोण आहात?”
- प्रेषित १९:१६सुमारे इ.स. ५८
मग ज्या मनुष्यास दुरात्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी मारली आणि त्याच्या शक्तीने त्या सर्वांना शरण आणले. त्यांना अशी मारपीट केली की ते उघडेनागडे व घायाळ होऊन त्या घरातून पळून गेले.
- प्रेषित १९:१७सुमारे इ.स. ५८
या घटनेची वार्ता लागलीच सर्व इफिसमध्ये राहणारे यहूदी व ग्रीक यांना कळली, तेव्हा त्या सर्वांमध्ये भीती निर्माण झाली आणि प्रभू येशूंचे नाव अत्यंत आदरणीय मानले गेले.
- प्रेषित १९:१८सुमारे इ.स. ५८
ज्या अनेकांनी विश्वास ठेवला होता ते आता पुढे आले आणि जे काही त्यांनी केले होते त्याची जाहीर कबुली दिली.
- प्रेषित १९:१९सुमारे इ.स. ५८
अनेक लोक जे जादूटोणा करीत होते, त्यांनी त्यांची पुस्तके एकत्रित आणली आणि ती सर्व लोकांसमोर जाळून टाकली. त्यांनी त्या पुस्तकांची किंमत मोजली, तेव्हा ती पन्नास हजार चांदीची नाणी एवढी झाली.
- प्रेषित १९:२०सुमारे इ.स. ५८
या रीतीने प्रभूचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले.
- प्रेषित १९:२१सुमारे इ.स. ५८
हे सर्व झाल्यानंतर, मासेदोनिया व अखया या प्रांतातून यरुशलेमला जावे, असे पौलाने आपल्या मनात ठरविले व म्हटले, “तिथे गेल्यानंतर, मी रोम या ठिकाणीही भेट दिली पाहिजे.”
- प्रेषित १९:२२सुमारे इ.स. ५८
त्याने आपले दोन मदतनीस, तीमथ्य व एरास्तला मासेदोनियास पुढे पाठविले आणि तो आणखी काही काळ आशिया प्रांतात राहिला.
- प्रेषित १९:२३सुमारे इ.स. ५८
त्याच सुमारास, या मार्गाविषयी फार मोठी खळबळ उडाली.
- प्रेषित १९:२४सुमारे इ.स. ५८
देमेत्रिय नावाच्या चांदीच्या कारागिराने अर्तमीस देवीचे चांदीचे देव्हारे तयार करून तेथील कारागिरांना पुष्कळ उद्योग मिळवून दिला होता.
- प्रेषित १९:२५सुमारे इ.स. ५८
एकदा त्याने या सारखाच व्यवसाय करणार्या कारागिरांनादेखील एकत्र बोलाविले आणि तो त्यांना म्हणाला: “माझ्या मित्रांनो, या धंद्यात आपल्याला चांगला फायदा होत आहे, हे आपल्याला माहीतच आहे.
- प्रेषित १९:२६सुमारे इ.स. ५८
तुम्ही पाहता व ऐकता की इफिसातच केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशातील बहुसंख्य लोकांची या पौलाने खात्री पटवली आहे व त्यांना चुकीची कल्पना करून दिली आहे. तो म्हणतो की मानवी हातांनी तयार केलेली दैवते मुळीच परमेश्वर नाहीत.
- प्रेषित १९:२७सुमारे इ.स. ५८
आता यामध्ये धोका हा आहे की, आपल्या धंद्याचे चांगले नाव नाहीसे होईल, इतकेच नव्हे तर महादेवी अर्तमीसच्या मंदिराची सुद्धा अपकीर्ती होईल आणि ही देवता, जिची उपासना सर्व आशियामध्ये व जगामध्ये केली जाते, तिचे दैवी वैभव लुटून नेले जाईल.”
- प्रेषित १९:२८सुमारे इ.स. ५८
त्यांनी हे ऐकले, तेव्हा ते क्रोधाविष्ट झाले व मोठमोठ्याने ओरडू लागले: “इफिसकरांची अर्तमीस थोर आहे!”
- प्रेषित १९:२९सुमारे इ.स. ५८
लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले.
- प्रेषित १९:३०सुमारे इ.स. ५८
समुदायापुढे स्वतः जावे, असे पौलाच्या मनात होते, परंतु शिष्य त्याला तसे करू देईनात.
- प्रेषित १९:३१सुमारे इ.स. ५८
त्या प्रांतातील काही अधिकारी, पौलाचे मित्र, यांनी देखील त्याला निरोप पाठविला व नाटकगृहात प्रवेश करू नये अशी त्याला विनंती केली.
- प्रेषित १९:३२सुमारे इ.स. ५८
सभेत गोंधळ माजलेला होता: कोणी काही, तर इतर दुसरेच काहीतरी म्हणत होते. खरे म्हणजे, बहुतेकांना आपण येथे कशासाठी आलो आहोत हे देखील माहीत नव्हते.
- प्रेषित १९:३३सुमारे इ.स. ५८
काही यहूद्यांनी आलेक्सांद्राला पुढे ढकलले, मग आलेक्सांद्राने लोकांपुढे बचावाचे भाषण करण्यासाठी, शांत व्हावे म्हणून हाताने खुणावले.
- प्रेषित १९:३४सुमारे इ.स. ५८
परंतु तो यहूदी आहे हे समजल्यावर, सुमारे दोन तास, “इफिसकरांची अर्तमीस थोर!” अशी आरोळी ते एका सुरात मारीत राहिले.
- प्रेषित १९:३५सुमारे इ.स. ५८
सरतेशेवटी नगर लेखनिकाने जमावाला शांत करून म्हटले: “इफिसच्या नागरिकांनो, स्वर्गातून खाली पडलेल्या त्या थोर अर्तमीसच्या मूर्तीचे व मंदिराचे संरक्षक इफिस शहर आहे, हे सर्व जगाला माहीत नाही का?
- प्रेषित १९:३६सुमारे इ.स. ५८
तरी, या गोष्टी निर्विवाद आहेत, म्हणून तुम्ही शांत राहा व उतावळेपणाने भलतेच काही करू नका.
- प्रेषित १९:३७सुमारे इ.स. ५८
तुम्ही या माणसांना येथे आणले आहे, त्यांनी मंदिरे लुटली नाहीत व आपल्या देवीची निंदाही केली नाही.
- प्रेषित १९:३८सुमारे इ.स. ५८
जर देमेत्रिय आणि त्याच्या बरोबरच्या कारागिरांना कोणाविरुद्ध काही तक्रार असेल तर न्यायालये उघडी आहेत आणि न्यायाधीशही आहेत. ते आरोप करू शकतात.