- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 30–62
The Early Church
Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.
या कालखंडातील वचने
- प्रेषित २१:१०सुमारे इ.स. ६०
आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला.
- प्रेषित २१:११सुमारे इ.स. ६०
आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ”
- प्रेषित २१:१२सुमारे इ.स. ६०
हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली.
- प्रेषित २१:१३सुमारे इ.स. ६०
पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.”
- प्रेषित २१:१४सुमारे इ.स. ६०
त्याचे मन वळत नाही हे पाहून आम्ही म्हणालो, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
- प्रेषित २१:१५सुमारे इ.स. ६०
यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो.
- प्रेषित २१:१६सुमारे इ.स. ६०
कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता.
- प्रेषित २१:१७सुमारे इ.स. ६०
आम्ही यरुशलेममध्ये आल्यावर विश्वासणार्यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले.
- प्रेषित २१:१८सुमारे इ.स. ६०
दुसर्या दिवशी पौल व आम्ही याकोबास भेटण्यास गेलो. तिथे सर्व वडीलजनही उपस्थिती होते.
- प्रेषित २१:१९सुमारे इ.स. ६०
क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला.
- प्रेषित २१:२०सुमारे इ.स. ६०
त्यांनी हे ऐकले व परमेश्वराची स्तुती केली. नंतर ते पौलाला म्हणाले: “हे पाहा बंधू, हजारो यहूद्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्वजण नियमशास्त्राच्या बाबतीत उत्साही आहेत.
- प्रेषित २१:२१सुमारे इ.स. ६०
तुझ्याविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की, तू गैरयहूदी लोकांमध्ये राहणार्या सर्व यहूदीयांस मोशेपासून फिरा आणि आपल्या मुलांची सुंता करू नका किंवा आपल्या रूढी व प्रथांप्रमाणे राहू नका असे शिकवितोस.
- प्रेषित २१:२२सुमारे इ.स. ६०
तर आम्ही आता काय करावे? कारण तू येथे आला आहेस हे ते खात्रीने ऐकतील,
- प्रेषित २१:२३सुमारे इ.स. ६०
तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत.
- प्रेषित २१:२४सुमारे इ.स. ६०
तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही.
- प्रेषित २१:२५सुमारे इ.स. ६०
गैरयहूदी विश्वासणार्यांबद्दल म्हणशील तर आम्ही आमचा निर्णय त्यांना लिहून कळविला आहे की त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्त सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून स्वतःला दूर ठेवावे.”
- प्रेषित २१:२६सुमारे इ.स. ६०
दुसर्या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला.
- प्रेषित २१:२७सुमारे इ.स. ६०
ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले,
- प्रेषित २१:२८सुमारे इ.स. ६०
ते मोठ्याने ओरडत म्हणाले, “अहो इस्राएल लोकहो, आमची मदत करा! हा मनुष्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या स्थळाबद्दल शिकवण देतो आणि याशिवाय या मनुष्याने गैरयहूदी लोकांना येथे आणून हे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.”
- प्रेषित २१:२९सुमारे इ.स. ६०
या आधी त्यांनी पौलाला इफिस येथील त्रोफिमबरोबर शहरात पाहिले होते आणि पौलाने त्याला मंदिरात आणले असावे असा त्यांचा समज झाला होता.
- प्रेषित २१:३०सुमारे इ.स. ६०
तेव्हा सर्व शहर खळबळून गेले आणि सर्व बाजूंनी लोक धावत आले. पौलाला जबरदस्तीने पकडून मंदिरातून ओढून काढण्यात आले आणि तत्काळ दरवाजे बंद करण्यात आले.
- प्रेषित २१:३१सुमारे इ.स. ६०
ते त्याला ठार करण्याच्या विचारात होते, एवढ्यात रोमी लष्करी ठाण्याच्या सेनापतीकडे बातमी गेली की सर्व यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे.
- प्रेषित २१:३२सुमारे इ.स. ६०
तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले.
- प्रेषित २१:३३सुमारे इ.स. ६०
सेनापतीने येऊन त्याला अटक केली आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधण्यात यावे अशी आज्ञा केली. नंतर त्याने तो कोण होता आणि त्याने काय केले होते याची चौकशी केली.
- प्रेषित २१:३४सुमारे इ.स. ६०
तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला.