- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 30–62
The Early Church
Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.
या कालखंडातील वचने
- प्रेषित २१:३५सुमारे इ.स. ६०
पौल पायर्यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले.
- प्रेषित २१:३६सुमारे इ.स. ६०
त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!”
- प्रेषित २१:३७सुमारे इ.स. ६०
पौलाला सैनिक आता बराकीत नेणार, एवढ्यात तो सेनापतीला म्हणाला, “मी आपल्याबरोबर काही बोलू शकतो काय?” त्याने त्याला विचारले. “तुला ग्रीक भाषा येते काय?
- प्रेषित २१:३८सुमारे इ.स. ६०
ज्या इजिप्तच्या मनुष्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार दहशतवाद्यांस रानात नेले होते, तो तूच आहेस नाही का?”
- प्रेषित २१:३९सुमारे इ.स. ६०
पौलाने उत्तर दिले, “मी यहूदी आहे व किलिकियातील तार्सस शहराचा नागरिक असून, माझे शहर सर्वसामान्य नाही. कृपा करून या लोकांबरोबर मला बोलू द्यावे.”
- प्रेषित २१:४०सुमारे इ.स. ६०
सेनापतीची परवानगी मिळाल्यावर, पौल पायर्यांवर उभा राहिला आणि लोकांनी शांत राहवे, असे त्याने हाताने खुणावले. ते सर्व शांत झाल्यावर, तो इब्री भाषेत म्हणाला:
- प्रेषित २२:१सुमारे इ.स. ६०
“बंधूंनो व वडीलजनांनो, माझ्या बचावाचे भाषण ऐकून घ्या.”
- प्रेषित २२:२सुमारे इ.स. ६०
तो इब्री भाषेत बोलत आहे, हे ऐकून स्तब्धता अधिकच वाढली. तेव्हा पौल बोलू लागला:
- प्रेषित २२:३सुमारे इ.स. ६०
“मी एक यहूदी आहे आणि माझा जन्म किलिकियामधील तार्सस शहरात झाला, परंतु मी या शहरात वाढलो. माझे शिक्षण गमालियेलच्या मार्गदर्शनात झाले व आपल्या पूर्वजांच्या नियमशास्त्राचे सविस्तर प्रशिक्षण मला मिळाले. जसे तुम्ही आज परमेश्वराविषयी आवेशी आहात तसाच मीही होतो.
- प्रेषित २२:४सुमारे इ.स. ६०
ज्यांनी या मार्गाचे अनुसरण केले होते, त्यांना मरण येईपर्यंत मी त्यांचा छळ केला. स्त्री व पुरुष या दोघांनाही बांधून तुरुंगात टाकीत होतो.
- प्रेषित २२:५सुमारे इ.स. ६०
महायाजक व येथे असलेले सर्व सभासद, ते स्वतः याबाबतीत साक्ष देऊ शकतात की, मी त्यांच्याकडून दिमिष्क येथील सभेच्या सदस्यांना दाखविण्यासाठी तशी पत्रेसुद्धा मिळविली होती आणि या लोकांना बंदिवान करून यरुशलेम येथे आणून त्यांना शिक्षा केली जावी यासाठी तिथे गेलो.
- प्रेषित २२:६सुमारे इ.स. ६०
“दुपारच्या समयी मी दिमिष्कच्या जवळ आलो असताना, अकस्मात आकाशातून माझ्याभोवती प्रकाश चकाकताना पाहिला.
- प्रेषित २२:७सुमारे इ.स. ६०
मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’
- प्रेषित २२:८सुमारे इ.स. ६०
“ ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ मी विचारले. “प्रभूने मला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी नासरेथकर येशू आहे,’
- प्रेषित २२:९सुमारे इ.स. ६०
माझ्या सहकार्यांनी प्रकाश पाहिला, परंतु जे माझ्याशी बोलत होते त्यांची वाणी त्यांनी ओळखली नाही.
- प्रेषित २२:१०सुमारे इ.स. ६०
“मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे?’ “प्रभू म्हणाले, ‘आता उठून उभा राहा आणि दिमिष्कमध्ये जा, जे काही तुला करावयाचे आहे, ते तुला तिथे सांगण्यात येईल.’
- प्रेषित २२:११सुमारे इ.स. ६०
त्या प्रखर प्रकाशामुळे मी आंधळा झालो होतो, म्हणून माझ्या सोबत्यांनी मला हाताला धरून दिमिष्कला नेले.
- प्रेषित २२:१२सुमारे इ.स. ६०
“हनन्याह नावाचा मनुष्य मला भेटावयास आला. तो नियमशास्त्राचे अचूक पालन करणारा होता व सर्व यहूदी लोकांचे त्याच्याबद्दल फारच चांगले मत होते.
- प्रेषित २२:१३सुमारे इ.स. ६०
तो माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, ‘बंधू शौल, तुला दृष्टी प्राप्त होवो!’ आणि त्याच क्षणाला मी त्याला पाहू शकलो.
- प्रेषित २२:१४सुमारे इ.स. ६०
“नंतर त्याने मला असे सांगितले: ‘आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुझी निवड यासाठी केली आहे की, तू त्यांची इच्छा जाणून घ्यावीस आणि जे नीतिमान आहेत त्यांना पाहावेस व त्यांच्या तोंडचे शब्द ऐकावेस.
- प्रेषित २२:१५सुमारे इ.स. ६०
तू जे पाहिले व ऐकले आहेस त्याविषयी तू सर्व मनुष्यांना साक्षी होशील.
- प्रेषित २२:१६सुमारे इ.स. ६०
आणि आता विलंब कशासाठी? जा आणि बाप्तिस्मा घे आणि त्यांच्या नावाने धावा करून आपल्या पापांपासून शुद्ध हो.’
- प्रेषित २२:१७सुमारे इ.स. ६०
“यरुशलेमला परतल्यानंतर मी मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला तंद्री लागली,
- प्रेषित २२:१८सुमारे इ.स. ६०
आणि मी पाहिले की प्रभू माझ्याबरोबर बोलत आहेत. ते मला म्हणाले, ‘ताबडतोब यरुशलेम सोडून जा, कारण येथील लोक माझ्याबद्दल जी साक्ष तू देशील ती ते स्वीकारणार नाहीत.’
- प्रेषित २२:१९सुमारे इ.स. ६०
“मी उत्तर दिले, ‘प्रभू, या लोकांना माहीत आहे की, मी एका सभागृहातून दुसर्या सभागृहात जाऊन विश्वासणार्यांना मार देऊन तुरुंगात टाकीत होतो.