मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित २३:१५सुमारे इ.स. ६०

    तर आता, त्याच्याविषयी आणखी काही विचारपूस बारकाईने करावयाची आहे, या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही व न्यायसभेने सेनापतीला सुचवावे. तो येथे येण्यापूर्वी त्याला ठार करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.”

  2. प्रेषित २३:१६सुमारे इ.स. ६०

    परंतु पौलाच्या बहिणीच्या मुलाला त्यांचा हा कट समजला, तेव्हा बराकीत जाऊन त्याने पौलाला तसे कळविले.

  3. प्रेषित २३:१७सुमारे इ.स. ६०

    तेव्हा पौलाने शताधिपतींपैकी एकाला बोलाविले व त्याला म्हणाला, “या तरुणाला सेनापतीकडे ने; या तरुणाला काहीतरी सांगावयाचे आहे.”

  4. प्रेषित २३:१८सुमारे इ.स. ६०

    म्हणून त्याला सेनापतीकडे नेले. शताधिपती म्हणाला, “बंदिवान पौलाने, या मुलाला आपणास काही महत्त्वाचे सांगावयाचे आहे म्हणून आपणाकडे आणावे, अशी विनंती केली.”

  5. प्रेषित २३:१९सुमारे इ.स. ६०

    तेव्हा सेनापतीने त्या तरुण मुलाचा हात धरून त्यास बाजूला नेऊन विचारले, “तुला मला काय सांगावयाचे आहे?”

  6. प्रेषित २३:२०सुमारे इ.स. ६०

    तो म्हणाला: “पौलाकडून आणखी अधिक माहिती हवी आहे असे निमित्त सांगून उद्या आपण त्याला न्यायसभेपुढे आणावे, अशी विनंती काही यहूदी आपल्याला करणार आहेत.

  7. प्रेषित २३:२१सुमारे इ.स. ६०

    परंतु आपण त्याकडे कृपया लक्ष देऊ नका, कारण चाळिसांहून अधिक जण त्याला ठार करण्यासाठी वाटेवर टपून बसलेली आहेत. त्याचा वध करेपर्यंत अन्न आणि पाणी सेवन करावयाचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला आहे व आपण त्यांची विनंती मान्य कराल, ही त्यांची आशा आहे.”

  8. प्रेषित २३:२२सुमारे इ.स. ६०

    तेव्हा सेनापतीने, “तू मला हे सांगितले आहेस हे कोणालाही कळू देऊ नकोस.” असा इशारा देऊन त्या तरुणाला पाठवून दिले.

  9. प्रेषित २३:२३सुमारे इ.स. ६०

    त्यानंतर त्याने आपल्या दोन शताधिपतींना बोलाविले व त्यांना हुकूम दिला, “आज रात्री नऊ वाजता कैसरीयास जाण्यासाठी दोनशे सैनिक, सत्तर घोडेस्वार आणि दोनशे भालेकरी तयार ठेव.

  10. प्रेषित २३:२४सुमारे इ.स. ६०

    पौलाला प्रवासासाठी घोडे द्या व त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे बंदोबस्ताने सुरक्षित न्या.”

  11. प्रेषित २३:२५सुमारे इ.स. ६०

    मग त्याने असे पत्र लिहिले:

  12. प्रेषित २३:२६सुमारे इ.स. ६०

    महाराज, राज्यपाल फेलिक्स यास: क्लौडियस लुसियाचा: सलाम.

  13. प्रेषित २३:२७सुमारे इ.स. ६०

    या मनुष्याला यहूदी लोकांनी पकडले होते व ते त्याला ठार मारणार होते, तेव्हा तो रोमी नागरिक आहे हे समजल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी मी सैनिक पाठविले.

  14. प्रेषित २३:२८सुमारे इ.स. ६०

    त्यांनी काय दोषारोप केला आहे हे समजून घ्यावयाचे होते म्हणून मी त्याला न्यायसभेपुढे आणले.

  15. प्रेषित २३:२९सुमारे इ.स. ६०

    मला लवकरच समजून आले की त्यांच्यातील वाद हा नियमांविषयी होता आणि त्याबद्दल त्याला तुरुंगवास अथवा मरणाची शिक्षा देता येणार नाही.

  16. प्रेषित २३:३०सुमारे इ.स. ६०

    परंतु या माणसाविरुद्ध कट रचण्यात येऊन तो अंमलात येण्याची शक्यता आहे असे मला समजले, तेव्हा त्याला ताबडतोब आपणाकडे पाठविले. त्याच्यावर आरोप करणार्‍यांनी ते तुमच्यासमोर मांडावेत असा मी त्यांना हुकूम केला.

  17. प्रेषित २३:३१सुमारे इ.स. ६०

    म्हणून सैनिकांनी, हुकुमाप्रमाणे पौलाला घेऊन त्याच रात्री अंतिपत्रिसापर्यंत पोहोचविले.

  18. प्रेषित २३:३२सुमारे इ.स. ६०

    दुसर्‍या दिवशी त्याच्याबरोबर पुढे जाण्यास घोडदळाला त्याच्याबरोबर ठेऊन ते आपल्या बराकीत परतले.

  19. प्रेषित २३:३३सुमारे इ.स. ६०

    ते घोडदळ कैसरीयास पोहोचले, तेव्हा त्यांनी ते पत्र राज्यपालांपुढे सादर केले आणि पौलाला त्याच्या स्वाधीन केले.

  20. प्रेषित २३:३४सुमारे इ.स. ६०

    राज्यपालांनी पत्र वाचले आणि तो कोणत्या प्रांताचा आहे, असे विचारले. तो किलिकियाचा आहे, असे त्यास समजल्यावर,

  21. प्रेषित २३:३५सुमारे इ.स. ६०

    राज्यपालांनी पौलाला सांगितले, “तुझ्यावर आरोप करणारे येथे आले की मी तुझे हे प्रकरण ऐकून घेईन.” नंतर राज्यपालांनी पौलाला हेरोदाच्या राजवाड्यातील पहार्‍यात ठेवण्याचा हुकूम दिला.

  22. प्रेषित २४:१सुमारे इ.स. ६०

    पाच दिवसानंतर महायाजक हनन्याह काही वडीलजनांसह तिर्तुल्लस नावाच्या वकीलास बरोबर घेऊन कैसरीयाला गेले आणि त्यांनी पौलाविरुद्ध केलेले त्यांचे आरोप राज्यपालापुढे सादर केले.

  23. प्रेषित २४:२सुमारे इ.स. ६०

    पौलाला आत बोलाविण्यात आले, तेव्हा तिर्तुल्लसाने त्याचे आरोपपत्र फेलिक्ससमोर सादर केले: “आपल्या कारकिर्दीत आम्हास: दीर्घकाल शांती लाभलेली आहे आणि तुमच्या दूरदृष्टीमुळे आमच्या देशात समाज सुधारणा झाल्या आहेत.

  24. प्रेषित २४:३सुमारे इ.स. ६०

    यामुळे आम्ही सर्वठिकाणी आणि प्रत्येक प्रकारे कृतज्ञतेने व मनापासून स्वागत करतो आणि श्रेष्ठ फेलिक्स आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत.

  25. प्रेषित २४:४सुमारे इ.स. ६०

    आपणास कंटाळा येणार नाही अशा रीतीने, मी माझे म्हणणे आपणापुढे मांडणार आहे, तेव्हा कृपा करून आपण माझे भाषण ऐकून घ्यावे, अशी आपणास विनंती आहे.