मुख्य मजकुरावर जा

circa AD 30–62

The Early Church

Pentecost ignites a movement; Peter, Paul, and countless others carry the gospel from Jerusalem to the ends of the earth.

1,007 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. प्रेषित २२:२०सुमारे इ.स. ६०

    आणि तुझा रक्तसाक्षी स्तेफनाचे रक्त सांडत होते, तेव्हा मी त्याला मान्यता देत उभा होतो आणि जे धोंडमार करीत होते त्यांचे काढून ठेवलेले अंगरखे मी राखीत होतो.’

  2. प्रेषित २२:२१सुमारे इ.स. ६०

    “नंतर प्रभू मला म्हणाले, ‘जा; कारण मी तुला फार दूर गैरयहूदीयांकडे पाठविणार आहे.’ ”

  3. प्रेषित २२:२२सुमारे इ.स. ६०

    या वाक्यापर्यंत समुदायांनी पौलाचे ऐकले. नंतर त्यांनी त्यांचा आवाज वाढवला आणि ओरडून म्हणाले, “हा मनुष्य जमिनीला भार असा आहे! हा जगण्यास योग्य नाही!”

  4. प्रेषित २२:२३सुमारे इ.स. ६०

    ते ओरडत होते, आपले अंगरखे वर हवेत फेकीत होते व धूळ आकाशात उधळीत होते,

  5. प्रेषित २२:२४सुमारे इ.स. ६०

    तेव्हा सेनापतीने पौलाला आत बराकीत आणण्याची आज्ञा केली. लोक त्याच्यावर इतके का ओरडत आहेत, हे समजावे म्हणून त्याने फटके मारून त्याची चौकशी करण्यास सांगितले.

  6. प्रेषित २२:२५सुमारे इ.स. ६०

    जेव्हा ते पौलाला फटके मारण्यासाठी बांधत होते त्यावेळेस पौल तिथे उभा असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्या मनुष्यावर दोषारोप अजून सिद्ध झालेला नाही, अशा रोमी नागरिकाला फटके मारणे हे कायद्याने योग्य आहे का?”

  7. प्रेषित २२:२६सुमारे इ.स. ६०

    ते ऐकल्याबरोबर तो अधिकारी शताधिपती सेनापतीकडे गेला व म्हणाला, “आपण काय करत आहात? हा मनुष्य तर रोमी नागरिक आहे.”

  8. प्रेषित २२:२७सुमारे इ.स. ६०

    तेव्हा तो सेनापती पौलाकडे गेला आणि त्याने त्याला विचारले, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” त्याने उत्तर दिले. “होय, मी आहे.”

  9. प्रेषित २२:२८सुमारे इ.स. ६०

    त्यावर तो सेनापती बोलला, “मला नागरिकत्व मिळण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले.” “परंतु मी जन्मतःच रोमी नागरिक आहे,” पौलाने उत्तर दिले.

  10. प्रेषित २२:२९सुमारे इ.स. ६०

    यामुळे जे त्याला प्रश्न विचारून त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ निघून गेले. सेनापतीला जेव्हा समजले की, पौल एक रोमी नागरिक आहे आणि त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला साखळदंडानी बांधले गेले होते, तो फार घाबरून गेला.

  11. प्रेषित २२:३०सुमारे इ.स. ६०

    सेनापतीला हे शोधून काढायचे होते की, खरोखर कोणत्या कारणाने यहूदी लोक पौलाला आरोपी ठरवीत आहेत. म्हणून त्याने दुसर्‍या दिवशी पौलाला मुक्त केले आणि मुख्य याजक व सर्व न्यायसभेचे सभासद यांना एकत्र होण्याचा हुकूम केला. त्यांनी पौलाला न्यायसभेपुढे आणून उभे केले.

  12. प्रेषित २३:१सुमारे इ.स. ६०

    मग न्यायसभेकडे निरखून पाहत पौल म्हणाला, “माझ्या बंधूंनो, मी आजपर्यंत माझे परमेश्वरा संबंधीचे कर्तव्य पूर्ण सदसद्विवेकबुद्धीने करीत आलो आहे.”

  13. प्रेषित २३:२सुमारे इ.स. ६०

    यावेळी महायाजक हनन्याहने पौलाच्याजवळ असलेल्या लोकांना त्याच्या तोंडावर चापट मारण्याचा हुकूम केला.

  14. प्रेषित २३:३सुमारे इ.स. ६०

    तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!”

  15. प्रेषित २३:४सुमारे इ.स. ६०

    पौलाच्या शेजारी जे उभे होते ते त्याला म्हणाले, “तू परमेश्वराच्या महायाजकाचा अपमान करण्याचे धैर्य कसे केले!”

  16. प्रेषित २३:५सुमारे इ.स. ६०

    पौलाने उत्तर केले, “बंधूंनो, तो महायाजक आहे, हे मला माहीत नव्हते; असे लिहिले आहे: ‘तुमच्या लोकांच्या पुढार्‍यांपैकी कोणाला कधीही वाईट बोलू नकोस.’ ”

  17. प्रेषित २३:६सुमारे इ.स. ६०

    नंतर पौलाला, समजले की तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही सदूकी आहेत आणि इतर परूशी आहेत, तेव्हा पौल न्यायसभेच्या समोर म्हणाला, “बंधूंनो, माझे पूर्वज परूशी होते, त्यांच्याप्रमाणे मी परूशी आहे आणि माझी आशा व मृतांचे पुनरुत्थान यामुळे माझी चौकशी होत आहे.”

  18. प्रेषित २३:७सुमारे इ.स. ६०

    तो हे बोलला तेव्हा परूशी व सदूकी यांच्यात कलह होऊन सभेत फूट पडली.

  19. प्रेषित २३:८सुमारे इ.स. ६०

    कारण सदूकी लोक म्हणत की पुनरुत्थान नाही, देवदूत नाहीत आणि आत्मेही नाहीत, परंतु परूश्यांचा या सर्वांवर विश्वास होता.

  20. प्रेषित २३:९सुमारे इ.स. ६०

    तेव्हा मोठा गोंधळ सुरू झाला, काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते ते उठून उभे राहिले आणि जोरजोराने वादविवाद करू लागले. “आम्हाला या मनुष्यात काही अयोग्य असे आढळत नाही, ते म्हणाले, जर त्याच्याशी कदाचित एखादा आत्मा किंवा देवदूत बोलला असेल तर कसे समजावे?”

  21. प्रेषित २३:१०सुमारे इ.स. ६०

    वादाने उग्र स्वरूप धारण केले, सरतेशेवटी सेनापतीला भीती वाटली की ते पौलाचे फाडून तुकडे करतील. तेव्हा त्याने त्याच्या सैनिकांना हुकूम दिला की, त्यांनी खाली जाऊन त्याला त्यांच्यापासून जबरदस्तीने दूर करावे आणि पुन्हा बराकीत घेऊन यावे.

  22. प्रेषित २३:११सुमारे इ.स. ६०

    त्याच रात्री प्रभू पौलाजवळ उभा राहिले आणि त्याला म्हणाले, “धैर्य धर! येथे यरुशलेममध्ये तू माझ्याविषयी लोकांना जशी साक्ष दिलीस, तशीच साक्ष तुला रोममध्येही द्यावीच लागणार आहे.”

  23. प्रेषित २३:१२सुमारे इ.स. ६०

    मग दुसर्‍या दिवशी सकाळी काही यहूद्यांनी कट करून शपथ घेतली की पौलाचा वध करेपर्यंत ते अन्न व पाणी सेवन करणार नाहीत.

  24. प्रेषित २३:१३सुमारे इ.स. ६०

    चाळीस किंवा त्याहून अधिक यहूदी या कटकारस्थानामध्ये सामील झाले.

  25. प्रेषित २३:१४सुमारे इ.स. ६०

    नंतर ते महायाजक व वडीलजनांकडे गेले आणि म्हणाले, “पौलाचा वध करेपर्यंत आम्ही अन्न सेवन करणार नाही, अशी कडक शपथ आम्ही घेतली आहे.