- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल ४७:७सुमारे इ.स.पू. ५७४
जेव्हा मी तिथे गेलो, तेव्हा नदीच्या दोन्ही बाजूंना मी पुष्कळ झाडे पाहिली.
- यहेज्केल ४७:८सुमारे इ.स.पू. ५७४
तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेच्या प्रदेशाकडे वाहत जाऊन खाली अराबाहमध्ये जाते, तिथे ते मृत समुद्रात जाऊन मिळते. जेव्हा ते समुद्रात जाते, तेव्हा खारट पाणी गोड होते.
- यहेज्केल ४७:९सुमारे इ.स.पू. ५७४
जिथे पाणी वाहील, तिथे जिवंत प्राण्यांचे थवे राहतील. तिथे पुष्कळ मासे असतील, कारण ते पाणी तिथे वाहत जाऊन खारट पाणी गोड करते; म्हणून जिथे नदी वाहते तिथे सर्वकाही जिवंत राहेल.
- यहेज्केल ४७:१०सुमारे इ.स.पू. ५७४
तिच्या किनारी मासेमारी करणारे उभे राहतील; एन-गेदीपासून एन-एग्लाइमपर्यंत जाळे पसरविण्यासाठी जागा असेल. भूमध्य समुद्रातील माशांप्रमाणे तिथे पुष्कळ प्रकारचे मासे असतील.
- यहेज्केल ४७:११सुमारे इ.स.पू. ५७४
परंतु पानथळ आणि दलदल शुद्ध होणार नाही; ते खारटच राहतील.
- यहेज्केल ४७:१२सुमारे इ.स.पू. ५७४
नदीच्या दोन्ही बाजूंना सर्वप्रकारच्या फळांची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, ना त्यांची फळे संपतील. प्रत्येक महिन्यात ते फळे देतील, कारण त्यांच्याकडे पवित्रस्थानातून पाणी वाहते. त्यांची फळे खाण्यासाठी व त्यांची पाने आरोग्यासाठी वापरली जातील.”
- यहेज्केल ४७:१३सुमारे इ.स.पू. ५७४
सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “देशाच्या या सीमा आहेत, जेव्हा इस्राएलच्या बारा गोत्रांना त्यांचे वतन म्हणून या देशाची तू विभागणी करशील, त्यात दोन भाग योसेफाचे असतील.
- यहेज्केल ४७:१४सुमारे इ.स.पू. ५७४
त्यांच्यात तो देश तू समानतेने वाटावा. कारण मी हात उंच करून शपथ घेतली होती की, मी हा देश तुमच्या पूर्वजांना देईन, हा देश तुमचे वतन होईल.
- यहेज्केल ४७:१५सुमारे इ.स.पू. ५७४
“देशाची सीमा ही असावी: “उत्तरेस ती भूमध्य समुद्राकडून हेथलोन मार्गापलिकडे लबो-हमाथ पासून जेदादपर्यंत असेल,
- यहेज्केल ४७:१६सुमारे इ.स.पू. ५७४
बेरोथाह व सिबराईमपासून (जी दिमिष्क व हमाथाच्या मध्ये आहे), हाजेर-हत्तीकोनपर्यंत, जे हवरानच्या सीमेवर आहे.
- यहेज्केल ४७:१७सुमारे इ.स.पू. ५७४
ही सीमा समुद्रापासून हाजार-एनानपर्यंत वाढेल, जी दिमिष्कच्या उत्तरेच्या सीमेपर्यंत असेल व उत्तरेस हमाथची सीमा आहे. ही उत्तरेची सीमा आहे.
- यहेज्केल ४७:१८सुमारे इ.स.पू. ५७४
पूर्वेकडील सीमा हवरान व दिमिष्कमधून जात, यार्देन नदीच्या बाजूने गिलआद व इस्राएल देशातून, मृत समुद्रापर्यंत जाईल आणि पुढे तामारपर्यंत. ही पूर्वेकडील सीमा.
- यहेज्केल ४७:१९सुमारे इ.स.पू. ५७४
दक्षिणेच्या बाजूने वतनसीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत असेल व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत. ही दक्षिणेकडील सीमा.
- यहेज्केल ४७:२०सुमारे इ.स.पू. ५७४
पश्चिमेच्या बाजूने भूमध्य समुद्रापासून लेबो हमाथाच्या समोरच्या भागापर्यंत. ही पश्चिमेकडील सीमा.
- यहेज्केल ४७:२१सुमारे इ.स.पू. ५७४
“इस्राएलच्या गोत्रानुसार हा देश तुम्ही आपसात वाटून घ्या.
- यहेज्केल ४७:२२सुमारे इ.स.पू. ५७४
तुम्ही तो तुमच्यासाठी व तुमच्यात राहणार्या विदेशी लोकांमध्ये व ज्यांना लेकरे आहेत, त्यांच्यासाठी वतन म्हणून वाटायचे आहे. तुम्ही त्यांना देशात जन्मलेल्या इस्राएली लोकांप्रमाणेच समजले पाहिजे; तुमच्याबरोबर त्यांनाही इस्राएलच्या गोत्रांमध्ये वतन वाटून द्यावे.
- यहेज्केल ४७:२३सुमारे इ.स.पू. ५७४
कोणत्याही गोत्रांमध्ये विदेशी राहत असेल, तिथे तू त्यांना त्यांचे वतन द्यावे,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल ४८:१सुमारे इ.स.पू. ५७४
“यादीत दिलेल्या गोत्रांची नावे ही: “उत्तरेकडील सीमेपासून दानला एक भाग असेल; तो हेथलोन मार्गापासून लेबो हमाथ, हाजार-एनानपर्यंत आणि हमाथ आणि हमाथनंतरची दिमिष्काची उत्तरेकडील सीमा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत.
- यहेज्केल ४८:२सुमारे इ.स.पू. ५७४
दानच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा आशेरचा एक भाग असेल.
- यहेज्केल ४८:३सुमारे इ.स.पू. ५७४
आशेरच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा नफतालीचा एक भाग असेल.
- यहेज्केल ४८:४सुमारे इ.स.पू. ५७४
नफतालीच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत मनश्शेहचा एक भाग असेल.
- यहेज्केल ४८:५सुमारे इ.स.पू. ५७४
मनश्शेहच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एफ्राईमचा एक भाग असेल.
- यहेज्केल ४८:६सुमारे इ.स.पू. ५७४
एफ्राईमच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रऊबेनचा एक भाग असेल.
- यहेज्केल ४८:७सुमारे इ.स.पू. ५७४
रऊबेनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत यहूदाहचा एक भाग असेल.
- यहेज्केल ४८:८सुमारे इ.स.पू. ५७४
“यहूदीयाच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भाग तू विशेष भेट म्हणून द्यावा. तो पंचवीस हजार हात रुंद, आणि त्याची लांबी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत इतर गोत्रांना दिलेल्या भागासमान असावी; त्याच्या मधोमध पवित्रस्थान असेल.