- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल ४६:६सुमारे इ.स.पू. ५७४
अमावस्येच्या दिवशी त्याने एक गोर्हा, सहा कोकरे आणि एक एडका हे द्यावे, ते सर्व निर्दोष असावे.
- यहेज्केल ४६:७सुमारे इ.स.पू. ५७४
त्याने एका गोर्ह्यामागे एक एफाह व एका एडक्यामागे एक एफाह असे धान्यार्पण आणावे, आणि कोकर्याबरोबर आपल्या आवडीनुसार एक एफाह एक हीन तेलाबरोबर आणावे.
- यहेज्केल ४६:८सुमारे इ.स.पू. ५७४
जेव्हा राजपुत्र प्रवेश करतो, त्याने द्वाराच्या देवडीकडील मार्गाने जावे आणि त्याच मार्गाने त्याने परत यावे.
- यहेज्केल ४६:९सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘नेमलेल्या सणाच्या वेळी जेव्हा देशातील लोक याहवेहसमोर येतात, तेव्हा जो कोणी उपासना करण्यासाठी उत्तरेकडील द्वाराने आत येईल, त्याने दक्षिणेकडील द्वाराने बाहेर जावे; आणि जो कोणी दक्षिणेकडील द्वाराने आत येईल त्याने उत्तरेकडील द्वाराने बाहेर जावे. ज्या द्वाराने ते आत आले त्या द्वाराने कोणीही परत जाऊ नये, तर त्यांनी त्या समोरच्या द्वाराने जावे.
- यहेज्केल ४६:१०सुमारे इ.स.पू. ५७४
राजपुत्राने देखील त्यांच्यासोबतच असावे, म्हणजेच लोक जेव्हा आत जातील तेव्हा आत जावे आणि बाहेर जातील तेव्हा त्यानेही बाहेर जावे.
- यहेज्केल ४६:११सुमारे इ.स.पू. ५७४
मेजवान्या आणि नेमलेल्या सणांच्या वेळी, एका गोर्ह्यामागे एक एफाह, एका एडक्यामागे एक एफाह आणि कोकर्यांबरोबर त्याला आवडेल त्याप्रमाणे धान्य आणावे आणि एका एफाहमागे एक हीन तेल आणावे.
- यहेज्केल ४६:१२सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘जेव्हा राजपुत्र याहवेहला स्वैच्छिक अर्पण आणतो; ते होमार्पण असो वा शांत्यर्पण; त्याच्यासाठी पूर्वेकडील द्वार उघडावे. तो करतो त्याचप्रमाणे त्याचे होमार्पण किंवा शांत्यर्पण तो शब्बाथ दिवशी करेल. मग तो बाहेर जाईल आणि तो बाहेर गेल्यानंतर, द्वार बंद केले जाईल.
- यहेज्केल ४६:१३सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘तुम्ही दररोज एक वर्षाचे निर्दोष कोकरू होमार्पण म्हणून याहवेहला अर्पण करावे; तुम्ही ते दररोज सकाळी करावे.
- यहेज्केल ४६:१४सुमारे इ.स.पू. ५७४
तसेच त्याबरोबर रोज सकाळी एका एफाहचा सहावा भाग व पीठ भिजवण्यासाठी हिनाचा तिसरा भाग धान्यार्पण म्हणून आणावे. याहवेहसमोर हे धान्यार्पण सादर करण्याचा नियम सर्वकाळासाठी असावा.
- यहेज्केल ४६:१५सुमारे इ.स.पू. ५७४
याप्रमाणे दररोज सकाळी नियमित होमार्पणासाठी कोकरू आणि धान्यार्पण आणि तेल आणावे.
- यहेज्केल ४६:१६सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जर राजपुत्राने त्याच्या एका मुलासाठी आपल्या वतनातून काही भेट म्हणून दिली, ती त्याच्या वंशजांच्या मालकीची होईल; वारसानुसार ती त्यांची मालमत्ता होईल.
- यहेज्केल ४६:१७सुमारे इ.स.पू. ५७४
तथापि, जर त्याने आपल्या वतनातून त्याच्या एखाद्या चाकराला काही भेट म्हणून दिले, तो चाकर स्वतंत्र होण्याच्या वर्षापर्यंत ती भेट ठेवू शकतो; मग ती पुन्हा राजपुत्राची होईल. राजपुत्राचे वतन केवळ त्याच्या मुलांच्याच मालकीचे आहे; ते त्यांचेच आहे.
- यहेज्केल ४६:१८सुमारे इ.स.पू. ५७४
राजपुत्राने लोकांच्या वतनातून काही घेऊ नये, त्यांची मालमत्ता त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये. त्याने त्याच्या मुलांना त्यांचा वाटा स्वतःच्या मालमत्तेतून द्यावा, म्हणजे माझ्या लोकांतून कोणीही त्यांच्या मालमत्तेपासून वंचित केला जाणार नाही.’ ”
- यहेज्केल ४६:१९सुमारे इ.स.पू. ५७४
त्यानंतर त्या मनुष्याने मला बाजूच्या द्वाराच्या प्रवेशद्वाराने उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकांच्या पवित्र खोल्यांकडे आणले आणि पश्चिमेच्या शेवटाकडे असलेली एक जागा दाखविली.
- यहेज्केल ४६:२०सुमारे इ.स.पू. ५७४
तो मला म्हणाला, “हे ते ठिकाण आहे जिथे याजकांनी दोषार्पण व पापार्पण शिजवावे आणि धान्यार्पण भाजावे, यामुळे बाहेरील अंगणात आणणे व लोकांना शुद्ध करण्याचे टाळता येईल.”
- यहेज्केल ४६:२१सुमारे इ.स.पू. ५७४
नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याच्या चारही कोपऱ्यातून फिरविले आणि प्रत्येक कोपर्यात आणखी एक अंगण मी पाहिले.
- यहेज्केल ४६:२२सुमारे इ.स.पू. ५७४
बाहेरील अंगणाच्या चार कोपर्यात चाळीस हात लांब आणि तीस हात रुंद अंगणे मला दिसली; चार कोपर्यातील प्रत्येक अंगण एकाच मापाचे होते.
- यहेज्केल ४६:२३सुमारे इ.स.पू. ५७४
प्रत्येक अंगणाच्या आतील बाजूच्या कडेला दगडाची रांग होती, त्या काठांच्या खाली विस्तवासाठी चुली बांधलेल्या होत्या.
- यहेज्केल ४६:२४सुमारे इ.स.पू. ५७४
तो मला म्हणाला, “या स्वयंपाकाच्या खोल्या आहेत जिथे मंदिरात सेवा करीत असलेल्या याजकांनी लोकांसाठी करीत असलेली अर्पणे शिजवावी.”
- यहेज्केल ४७:१सुमारे इ.स.पू. ५७४
त्या मनुष्याने मला परत मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आणले आणि मी मंदिराच्या उंबरठ्याखालून पूर्वेकडे पाणी बाहेर येत असताना पाहिले (कारण मंदिराचे तोंड पूर्वेकडे होते). मंदिराच्या दक्षिणेकडून, वेदीच्या दक्षिणेकडून पाणी खाली येत होते.
- यहेज्केल ४७:२सुमारे इ.स.पू. ५७४
मग त्याने मला उत्तरेकडील द्वाराने बाहेर आणले, पूर्वेकडे तोंड असलेल्या बाहेरील द्वाराच्या सभोवार फिरविले, आणि पाण्याचे थेंब दक्षिणेच्या बाजूने पडत होते.
- यहेज्केल ४७:३सुमारे इ.स.पू. ५७४
तो मनुष्य आपल्या हातात मापनदोरी घेऊन पूर्वेच्या दिशेने गेला, त्याने एक हजार हात मापले आणि घोट्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले.
- यहेज्केल ४७:४सुमारे इ.स.पू. ५७४
त्याने आणखी हजार हात मापले आणि गुडघ्यापर्यंत खोल पाण्यातून मला नेले. त्याने आणखी हजार हात मापले आणि कंबरेपर्यंत खोल पाण्यातून मला नेले.
- यहेज्केल ४७:५सुमारे इ.स.पू. ५७४
त्याने आणखी हजार हात मापले, परंतु आता ती अशी नदी होती जी मी पार करू शकलो नाही, कारण पोहून जाता येईल इतके ते पाणी वाढले होते; अशी नदी जी कोणीही पार करू शकत नव्हते.
- यहेज्केल ४७:६सुमारे इ.स.पू. ५७४
त्याने मला विचारले, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय?” मग त्याने मला परत नदीच्या किनारी नेले.