मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ४४:१२सुमारे इ.स.पू. ५७४

    परंतु त्यांनी त्यांच्या मूर्तीसमोर लोकांची सेवा केली आणि इस्राएली लोकांना पाप करण्यास भाग पाडले, म्हणून मी उंचावलेल्या बाहूंनी शपथ घेतली आहे की त्यांनी त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  2. यहेज्केल ४४:१३सुमारे इ.स.पू. ५७४

    त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करण्यास जवळ येऊ नये किंवा माझ्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या किंवा परमपवित्र अर्पणांच्या जवळ येऊ नये; त्यांनी त्यांच्या अमंगळ कृत्यांची लाज भोगावी.

  3. यहेज्केल ४४:१४सुमारे इ.स.पू. ५७४

    मंदिराची राखण करण्यासाठी व तिथे जी सर्व कामे केली जातात त्यावर मी त्यांची नेमणूक करेन.

  4. यहेज्केल ४४:१५सुमारे इ.स.पू. ५७४

    “ ‘परंतु लेवी गोत्रातील याजक जे सादोकचे वंशज आहेत, इस्राएली लोक माझ्यापासून बहकून गेले होते, तेव्हा ज्यांनी माझ्या पवित्रस्थानाची राखण केली, ते माझ्यासमोर सेवा करण्यास जवळ येतील; चरबी व रक्ताची यज्ञे अर्पिण्यासाठी ते माझ्यासमोर उभे राहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  5. यहेज्केल ४४:१६सुमारे इ.स.पू. ५७४

    केवळ तेच माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करतील, केवळ तेच माझ्यासमोर सेवा करण्यास माझ्या मेजाजवळ येतील आणि पहारेकरी म्हणून माझी सेवा करतील.

  6. यहेज्केल ४४:१७सुमारे इ.स.पू. ५७४

    “ ‘ते जेव्हा आतील अंगणाच्या द्वारातून प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी तागाची वस्त्रे घालावी; आतील अंगणाच्या द्वारात किंवा मंदिरात सेवा करीत असताना त्यांनी कोणतेही लोकरीचे वस्त्र घालू नये.

  7. यहेज्केल ४४:१८सुमारे इ.स.पू. ५७४

    त्यांनी आपल्या डोक्यावर तागाचे फेटे आणि आपल्या कंबरेभोवती तागाची अंतर्वस्त्रे घालावी. त्यांना घाम येईल अशी वस्त्रे त्यांनी घालू नये.

  8. यहेज्केल ४४:१९सुमारे इ.स.पू. ५७४

    लोक आहेत तिथे बाहेरील अंगणात जेव्हा ते जातात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करीत होते ते काढून पवित्र खोलीत ते ठेवावे आणि दुसरे कपडे घालावे, म्हणजे त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करून लोकांनी पवित्र होऊ नये.

  9. यहेज्केल ४४:२०सुमारे इ.स.पू. ५७४

    “ ‘त्यांनी आपल्या डोक्यांचे मुंडण करू नये किंवा आपले केस लांब वाढू देऊ नये, परंतु त्यांनी आपल्या डोक्यावरील केस कापावे.

  10. यहेज्केल ४४:२१सुमारे इ.स.पू. ५७४

    आतील अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षारस पिऊ नये.

  11. यहेज्केल ४४:२२सुमारे इ.स.पू. ५७४

    त्यांनी विधवा किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी विवाह करू नये; केवळ इस्राएली गोत्रातील कुमारिकांशी किंवा याजकाच्या विधवेशी विवाह करावा.

  12. यहेज्केल ४४:२३सुमारे इ.स.पू. ५७४

    पवित्र व साधारण यातील फरक आणि शुद्ध व अशुद्ध यात कसा फरक करावा हे त्यांनी माझ्या लोकांना शिकवावे.

  13. यहेज्केल ४४:२४सुमारे इ.स.पू. ५७४

    “ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे.

  14. यहेज्केल ४४:२५सुमारे इ.स.पू. ५७४

    “ ‘मृत देहाकडे जाऊन याजकाने स्वतःस अशुद्ध करू नये; तरीही ती मृत व्यक्ती जर त्याचा पिता किंवा आई, मुलगा किंवा मुलगी, भाऊ किंवा अविवाहित बहीण असली, तर तो स्वतःस अशुद्ध करू शकतो.

  15. यहेज्केल ४४:२६सुमारे इ.स.पू. ५७४

    शुद्धीकरण झाल्यावर त्याने सात दिवस थांबावे.

  16. यहेज्केल ४४:२७सुमारे इ.स.पू. ५७४

    ज्या दिवशी पवित्रस्थानात सेवा करण्यास तो आतील अंगणात जातो, तेव्हा त्याने स्वतःसाठी पापार्पण करावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  17. यहेज्केल ४४:२८सुमारे इ.स.पू. ५७४

    “ ‘याजकांचे वतन केवळ मीच आहे. तुम्ही त्यांना इस्राएलमध्ये कोणताही वाटा देऊ नये; मीच त्यांचा वाटा आहे.

  18. यहेज्केल ४४:२९सुमारे इ.स.पू. ५७४

    अन्नार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे यातून ते खातील; आणि जे सर्वकाही इस्राएल लोक याहवेहस समर्पित करतात ते याजकांच्या मालकीचे होईल.

  19. यहेज्केल ४४:३०सुमारे इ.स.पू. ५७४

    प्रथमफळातील जे सर्वोत्तम आणि तुमच्या सर्व विशेष भेटी याजकांच्या होतील. तुमच्या भूमीतील प्रथम भाग याजकांना द्यावा म्हणजे तुमच्या घराण्यावर आशीर्वाद राहेल.

  20. यहेज्केल ४४:३१सुमारे इ.स.पू. ५७४

    मेलेला किंवा हिंस्र पशूने फाडलेला कोणताही मृत पक्षी किंवा पशू याजकांनी खाऊ नये.

  21. यहेज्केल ४५:१सुमारे इ.स.पू. ५७४

    “ ‘जेव्हा तुम्ही भूमीची वतन म्हणून वाटणी कराल, तेव्हा तुम्ही भूमीचा एक भाग याहवेहसाठी एक पवित्र प्रदेश म्हणून समर्पित करावा, तो पंचवीस हजार हात लांब आणि वीस हजार हात रुंद असावा; तो संपूर्ण भाग पवित्र असावा.

  22. यहेज्केल ४५:२सुमारे इ.स.पू. ५७४

    यामधून, पाचशे हात समचौरस पवित्रस्थानासाठी असावा, आणि त्याच्याभोवती पन्नास हात मोकळी जागा सोडावी.

  23. यहेज्केल ४५:३सुमारे इ.स.पू. ५७४

    या पवित्र प्रदेशात, पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असा भाग मोजून घे. त्यात पवित्रस्थान, परमपवित्रस्थान असेल.

  24. यहेज्केल ४५:४सुमारे इ.स.पू. ५७४

    याजक जे पवित्रस्थानात सेवा करतात आणि याहवेहसमोर सेवा करण्यास जे जवळ येतात त्या याजकांसाठी भूमीचा हा भाग पवित्र असेल. त्याचप्रमाणे हे ठिकाण त्यांच्या घरांसाठी आणि पवित्रस्थानासाठी पवित्र ठिकाण असे असावे.

  25. यहेज्केल ४५:५सुमारे इ.स.पू. ५७४

    पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असलेला हा भाग, जे लेवी लोक मंदिरात सेवा करतात त्यांच्यासाठी त्यांचे वतन म्हणून त्यांना राहण्यासाठी नगरे अशी असतील.