मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ४२:९सुमारे इ.स.पू. ५७४

    बाहेरील अंगणातून तळ मजल्यावरील खोल्यांमध्ये जाण्यार्‍यांसाठी पूर्वेकडून प्रवेशद्वार होते.

  2. यहेज्केल ४२:१०सुमारे इ.स.पू. ५७४

    दक्षिणेच्या बाजूला बाहेरील अंगणाच्या भिंतीच्या लांबीलगत, मंदिराच्या अंगणाला जोडलेल्या आणि बाहेरील भिंतीसमोर खोल्या होत्या

  3. यहेज्केल ४२:११सुमारे इ.स.पू. ५७४

    ज्यांच्यासमोर एक पाऊलवाट होती. उत्तरेकडे असलेल्या खोल्यांप्रमाणेच या खोल्या होत्या; त्यांची लांबी व रुंदी सारखीच होती आणि बाहेर जाण्याचा मार्ग व त्याचा आकार उत्तरेला असलेल्या दरवाजा सारखाच होता.

  4. यहेज्केल ४२:१२सुमारे इ.स.पू. ५७४

    दक्षिणेकडील खोल्यांचाही दरवाजा होता. खोल्यांमध्ये जाण्यास मार्गाच्या सुरुवातीला एक दरवाजा होता, हा मार्ग पूर्वेच्या बाजूने वाढत जाऊन त्या भिंतीला समांतर होत्या.

  5. यहेज्केल ४२:१३सुमारे इ.स.पू. ५७४

    तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मंदिराच्या अंगणासमोर उत्तर व दक्षिणेच्या बाजूला असलेल्या खोल्या याजकांच्या खोल्या आहेत, तिथे जे याजक याहवेहसमोर जातात ते परमपवित्र अर्पणे; म्हणजेच धान्यार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे खातील; कारण ते ठिकाण पवित्र आहे.

  6. यहेज्केल ४२:१४सुमारे इ.स.पू. ५७४

    जेव्हा कधी याजक पवित्रस्थानात प्रवेश करतात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करतात ती पवित्रस्थानात ठेवल्याशिवाय त्यांनी बाहेरील अंगणात जाऊ नये, कारण ती पवित्र वस्त्रे आहेत. लोकांकडे जाण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी जाण्याअगोदर याजकांनी दुसरी वस्त्रे घालावी.”

  7. यहेज्केल ४२:१५सुमारे इ.स.पू. ५७४

    मंदिराच्या आतील भागात असलेल्या वस्तूंची मापे घेण्याचे संपविल्यावर, त्याने मला पूर्वेकडील द्वारातून बाहेर आणले आणि सभोवतालचा भाग मापला.

  8. यहेज्केल ४२:१६सुमारे इ.स.पू. ५७४

    मापन-दंडाने त्याने पूर्वेकडील भाग मापला; तो पाचशे हात होता.

  9. यहेज्केल ४२:१७सुमारे इ.स.पू. ५७४

    त्याने उत्तरेकडील भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात भरला.

  10. यहेज्केल ४२:१८सुमारे इ.स.पू. ५७४

    त्याने दक्षिणेचा भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात होता.

  11. यहेज्केल ४२:१९सुमारे इ.स.पू. ५७४

    मग त्याने वळून पश्चिमेचे माप घेतले; ते मापन-दंडाने पाचशे हात होते.

  12. यहेज्केल ४२:२०सुमारे इ.स.पू. ५७४

    याप्रकारे त्याने चारही बाजूंचे माप घेतले. त्याच्याभोवती एक भिंत होती, जी पाचशे हात लांब आणि पाचशे हात रुंद असून पवित्रस्थानाला सर्वसाधारण स्थानापासून वेगळी करीत होती.

  13. यहेज्केल ४३:१सुमारे इ.स.पू. ५७४

    त्यानंतर त्या मनुष्याने मला पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराकडे आणले

  14. यहेज्केल ४३:२सुमारे इ.स.पू. ५७४

    आणि मी इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव पूर्वेकडून येताना पाहिले. जोरदार पाण्याच्या गर्जनेप्रमाणे त्याचा आवाज होता आणि परमेश्वराच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशमय झाली.

  15. यहेज्केल ४३:३सुमारे इ.स.पू. ५७४

    जो दृष्टान्त मी पाहिला तो त्या दृष्टान्तासारखा होता जेव्हा तो शहरास नष्ट करण्यास आला होता आणि जो दृष्टान्त मी खेबर नदीकिनारी पाहिला होता त्यासारखा होता, तेव्हा मी उपडा पडलो.

  16. यहेज्केल ४३:४सुमारे इ.स.पू. ५७४

    पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वारातून याहवेहच्या वैभवाने मंदिरात प्रवेश केला.

  17. यहेज्केल ४३:५सुमारे इ.स.पू. ५७४

    तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात आणले आणि याहवेहच्या वैभवाने मंदिर भरले.

  18. यहेज्केल ४३:६सुमारे इ.स.पू. ५७४

    तो मनुष्य माझ्याशेजारी उभा असता, मंदिरातून कोणी माझ्याशी बोलत असल्याचे मी ऐकले.

  19. यहेज्केल ४३:७सुमारे इ.स.पू. ५७४

    परमेश्वराने मला म्हटले: “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थान, माझ्या तळपायाचे ठिकाण आहे. या ठिकाणी इस्राएली लोकांमध्ये मी सर्वकाळ राहीन. इस्राएली लोक; ते किंवा त्यांचे राजे यापुढे त्यांच्या वेश्यावृत्तीने आणि त्यांच्या राजांच्या अंत्यविधीच्या अर्पणांद्वारे माझे नाव पुन्हा कलंकित करणार नाहीत.

  20. यहेज्केल ४३:८सुमारे इ.स.पू. ५७४

    जेव्हा त्यांनी त्यांचे उंबरठे माझ्या उंबरठ्याशेजारी आणि त्यांच्या द्वाराच्या चौकटी माझ्या चौकटीशेजारी उभारल्या, माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती, त्यांच्या अमंगळ कृत्यांनी त्यांनी माझे पवित्र नाव कलंकित केले. म्हणून माझ्या रागाने मी त्यांचा नाश केला.

  21. यहेज्केल ४३:९सुमारे इ.स.पू. ५७४

    आता त्यांनी त्यांची वेश्यावृत्ती आणि त्यांच्या राजांसाठी अंत्यविधीची अर्पणे माझ्यापासून दूर करावी आणि मी सर्वकाळ त्यांच्यामध्ये राहीन.

  22. यहेज्केल ४३:१०सुमारे इ.स.पू. ५७४

    “मानवपुत्रा, इस्राएलाच्या लोकांना मंदिराविषयी स्पष्ट कर, म्हणजे ते त्यांच्या पापाविषयी लज्जित होतील. त्यांनी त्यांच्या परिपूर्णतेबद्दल विचार करावा,

  23. यहेज्केल ४३:११सुमारे इ.स.पू. ५७४

    आणि त्यांनी जे काही केले त्याबद्दल जर त्यांना लाज वाटली, तर त्यांना मंदिराच्या आराखड्याबद्दल; म्हणजेच त्याची रचना, बाहेर जाण्याचा व प्रवेश करण्याचा मार्ग; त्याचा संपूर्ण आराखडा आणि त्याचे सर्व विधी नियम याची माहिती दे. ते त्यांच्यासमोर लिही म्हणजे ते त्याच्या आराखड्याशी विश्वासू राहतील आणि त्याचे सर्व नियम पाळतील.

  24. यहेज्केल ४३:१२सुमारे इ.स.पू. ५७४

    “मंदिराचा हा नियम आहे: पर्वतांच्या माथ्याच्या सभोवतालचा सर्व भाग परमपवित्र असणार. मंदिराचा नियम असाच आहे.

  25. यहेज्केल ४३:१३सुमारे इ.स.पू. ५७४

    “वेदीच्या लांबीचे हाताने माप याप्रकारे आहेत, म्हणजेच एक हात आणि चार बोटे: त्याच्या तळभागाचे माप एक हात खोल आणि एक हात रुंद होती, त्याचा कड व काठ याचे माप एक वीत होते आणि ही वेदीची उंची होती: