मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ४०:३४सुमारे इ.स.पू. ५७४

    त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या.

  2. यहेज्केल ४०:३५सुमारे इ.स.पू. ५७४

    नंतर त्याने मला उत्तरेच्या द्वाराकडे आणले व त्याचे माप घेतले. इतरांप्रमाणेच त्याचेही माप भरले.

  3. यहेज्केल ४०:३६सुमारे इ.स.पू. ५७४

    त्याप्रमाणेच त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्या होत्या, आणि चहूकडून त्याला झरोके होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते.

  4. यहेज्केल ४०:३७सुमारे इ.स.पू. ५७४

    त्याच्या देवड्याचे तोंड बाहेरील अंगणाकडे होते; खजुरीच्या झाडांच्या कोरीवकामाने त्याचे स्तंभ सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्‍या होत्या.

  5. यहेज्केल ४०:३८सुमारे इ.स.पू. ५७४

    प्रत्येक आतील वेशीच्या देवडीकडे द्वार असलेली खोली होती, जिथे होमार्पणे धुतली जात असत.

  6. यहेज्केल ४०:३९सुमारे इ.स.पू. ५७४

    वेशीच्या देवडीमध्ये दोन्ही बाजूंना दोन मेज होते, ज्यावर होमार्पणे, पापार्पणे व दोषार्पणे वधली जात असत.

  7. यहेज्केल ४०:४०सुमारे इ.स.पू. ५७४

    वेशीच्या देवडीच्या बाहेरील भिंतीजवळ, उत्तरेच्या वेशीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन मेज होते आणि पायर्‍यांच्या दुसर्‍या बाजूने दोन मेज होते.

  8. यहेज्केल ४०:४१सुमारे इ.स.पू. ५७४

    म्हणजेच वेशीच्या एका बाजूला चार मेज होते आणि दुसर्‍या बाजूला चार; असे एकूण आठ मेज होते; ज्यावर अर्पणे कापली जात असत.

  9. यहेज्केल ४०:४२सुमारे इ.स.पू. ५७४

    होमार्पणासाठी कोरीव दगडाचे अजून चार मेज होते, जे प्रत्येकी दीड हात लांब, दीड हात रुंद आणि एक हात उंच होते. त्या मेजांवर होमार्पणांचा व इतर अर्पणांचा वध करण्यासाठी उपकरणे व पात्रे ठेवण्यात आली होती.

  10. यहेज्केल ४०:४३सुमारे इ.स.पू. ५७४

    भिंतीच्या चहूकडून प्रत्येकी चार बोटे असे दुहेरी टोके असलेले आकडे अडकविले होते. ते मेज अर्पणाच्या मांसासाठी होते.

  11. यहेज्केल ४०:४४सुमारे इ.स.पू. ५७४

    आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणाच्या आत दोन खोल्या होत्या. उत्तरेच्या द्वाराजवळ दक्षिणेकडे तोंड केलेली एक खोली तर दुसरी खोली दक्षिणेच्या द्वाराजवळ उत्तरेकडे तोंड केलेली होती.

  12. यहेज्केल ४०:४५सुमारे इ.स.पू. ५७४

    तो मनुष्य मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली खोली मंदिराचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे

  13. यहेज्केल ४०:४६सुमारे इ.स.पू. ५७४

    आणि उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे. हे सादोकचे पुत्र आहेत, केवळ तेच लेवी आहेत, जे याहवेहची सेवा करताना याहवेहसमोर येऊ शकतात.”

  14. यहेज्केल ४०:४७सुमारे इ.स.पू. ५७४

    मग त्याने अंगणाचे माप घेतले: ते चौरस असून दोन्ही बाजूंनी शंभर हात लांब व शंभर हात रुंद होते आणि वेदी मंदिरासमोर होती.

  15. यहेज्केल ४०:४८सुमारे इ.स.पू. ५७४

    त्याने मला मंदिराच्या देवडीजवळ आणले आणि देवडीच्या खांबांचे माप घेतले; ते दोन्ही बाजूंनी पाच हात होते. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात होती आणि त्याच्या भिंती दोन्ही बाजूंनी तीन हात रुंद होत्या.

  16. यहेज्केल ४०:४९सुमारे इ.स.पू. ५७४

    देवडी वीस हात रुंद होती, आणि मागून पुढून बारा हात होती. त्यावर जाण्यासाठी पुष्कळ पायर्‍या होत्या आणि खांबांच्या प्रत्येक बाजूला खांब होते.

  17. यहेज्केल ४१:१सुमारे इ.स.पू. ५७४

    नंतर त्या मनुष्याने मला मुख्य दिवाणखान्यात आणले आणि तेथील स्तंभ मापले; प्रत्येक बाजूंनी त्या खांबांची रुंदी सहा हात होती.

  18. यहेज्केल ४१:२सुमारे इ.स.पू. ५७४

    प्रवेशद्वार दहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने पाच हात होती. त्याने मुख्य दिवाणखाना देखील मापला; तो चाळीस हात लांब आणि वीस हात रुंद होता.

  19. यहेज्केल ४१:३सुमारे इ.स.पू. ५७४

    मग तो आतील पवित्रस्थानात गेला आणि प्रवेशद्वाराच्या खांबांचे माप घेतले; प्रत्येक खांब दोन हात रुंद होते. प्रवेशद्वार सहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने सात हात होती.

  20. यहेज्केल ४१:४सुमारे इ.स.पू. ५७४

    आणि त्याने आतील पवित्रस्थानाची लांबी मापली; ती वीस हात होती आणि मुख्य दिवाणखान्याच्या शेवटपर्यंत त्याची रुंदी वीस हात होती. तो मला म्हणाला, “हे परमपवित्रस्थान आहे.”

  21. यहेज्केल ४१:५सुमारे इ.स.पू. ५७४

    नंतर त्याने मंदिराच्या भिंतीचे माप घेतले; ती सहा हात जाड होती आणि मंदिराच्या सभोवती असलेल्या खोल्या प्रत्येकी चार हात रुंद होत्या.

  22. यहेज्केल ४१:६सुमारे इ.स.पू. ५७४

    बाजूला असलेल्या खोल्या एकावर एक अशा तीन मजल्यांवर होत्या, प्रत्येक मजल्यावर तीस खोल्या होत्या. बाजूला असलेल्या खोल्यांना आधार असावा म्हणून मंदिराच्या सभोवती असलेल्या भिंतींना फळ्या होत्या, ज्या मंदिराच्या भिंतीमधून टाकल्या गेल्या नव्हत्या.

  23. यहेज्केल ४१:७सुमारे इ.स.पू. ५७४

    मंदिराच्या बाजूस असलेल्या खोल्या प्रत्येक मजल्यावर रुंद होत गेल्या. मंदिराच्या सभोवती असलेली इमारत चढत्या रचनेत बांधली होती, म्हणजे प्रत्येक मजल्यावरील खोल्या त्याच्या खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा रुंद होत्या. सर्वात खालच्या मजल्यापासून मधल्या मजल्यालगत जाऊन, सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पायर्‍या होत्या.

  24. यहेज्केल ४१:८सुमारे इ.स.पू. ५७४

    मी पाहिले की मंदिराला सभोवार उंच केलेला एक आधार होता, जो बाजूच्या खोल्यांसाठी पाया होता. तो मापन-दंडाच्या लांबीचा म्हणजेच सहा हात लांब होता.

  25. यहेज्केल ४१:९सुमारे इ.स.पू. ५७४

    बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंत पाच हात जाड होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्या