- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल ४०:९सुमारे इ.स.पू. ५७४
ते आठ हात होते आणि त्याचे खांब दोन हात होते. वेशीची देवडी मंदिरासमोर होती.
- यहेज्केल ४०:१०सुमारे इ.स.पू. ५७४
पूर्वेकडील द्वाराच्या आतून प्रत्येक बाजूला तीन चौक्या होत्या; त्या तीनही एकाच मापाच्या होत्या आणि प्रत्येक बाजूच्या भिंतींचे माप सुद्धा सारखेच होते.
- यहेज्केल ४०:११सुमारे इ.स.पू. ५७४
मग त्याने वेशीच्या प्रवेशद्वाराची रुंदी मापली; ती दहा हात होती आणि त्याची लांबी तेरा हात होती.
- यहेज्केल ४०:१२सुमारे इ.स.पू. ५७४
प्रत्येक चौकीच्या समोर एक हात उंच भिंत होती आणि चौक्या दोन्ही बाजूंनी सहा हात होत्या.
- यहेज्केल ४०:१३सुमारे इ.स.पू. ५७४
मग त्याने एका चौकीच्या भिंतीच्या मागच्या बाजूच्या वरपासून दुसर्या भिंतीच्या वरपर्यंतचे वेशीचे माप घेतले; त्यातील अंतर एका कठड्यापासून दुसर्यापर्यंत पंचवीस हात मापले.
- यहेज्केल ४०:१४सुमारे इ.स.पू. ५७४
त्याने वेशीच्या आतील बाजूने भिंतींचे सर्वबाजूंनी माप घेतले ते साठ हात होते. हे माप अंगणासमोरील देवडीपर्यंत होते.
- यहेज्केल ४०:१५सुमारे इ.स.पू. ५७४
वेशीच्या प्रवेशद्वारापासून तिच्या शेवटच्या देवडीपर्यंत तिचे माप पन्नास हात होते.
- यहेज्केल ४०:१६सुमारे इ.स.पू. ५७४
वेशीच्या आतील चौक्या आणि भिंतीच्या चहूबाजूंना झरोके असलेले कठडे होते, तसेच देवडींनाही आतील बाजूने झरोके होते. भिंती खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून सजविल्या होते.
- यहेज्केल ४०:१७सुमारे इ.स.पू. ५७४
मग त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले. तिथे अंगणाच्या सभोवती काही खोल्या व बांधलेली पाऊलवाट मी पाहिली; पाऊलवाटेच्या बाजूने तीस खोल्या होत्या.
- यहेज्केल ४०:१८सुमारे इ.स.पू. ५७४
त्या खोल्या वेशीच्या बाजूला लागूनच होत्या आणि जितकी त्यांची लांबी तितकीच त्यांची रुंदी होती; ही खालची पाऊलवाट होती.
- यहेज्केल ४०:१९सुमारे इ.स.पू. ५७४
मग त्याने खालच्या वेशीच्या आतील बाजूपासून आतील अंगणाच्या बाहेरच्या बाजूपर्यंतच्या अंतराचे माप घेतले; त्याचे माप पूर्वेकडून तसेच उत्तरेकडूनही शंभर हात होते.
- यहेज्केल ४०:२०सुमारे इ.स.पू. ५७४
मग त्याने बाहेरील अंगणाकडे जाणाऱ्या उत्तरेकडील द्वाराची लांबी व रुंदी मापली.
- यहेज्केल ४०:२१सुमारे इ.स.पू. ५७४
त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन चौक्या होत्या; त्याच्या भिंती आणि देवडीचेही तेच माप होते जे पहिल्या वेशीचे होते. ते पन्नास हात लांब आणि पंचवीस हात रुंद होते.
- यहेज्केल ४०:२२सुमारे इ.स.पू. ५७४
त्याचे झरोके, त्याची देवडी आणि त्याचे खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम केलेली सजावट यांचे माप पूर्वेकडील द्वाराच्या मापाइतकेच होते. त्यावर चढून जाण्यासाठी सात पायर्या होत्या आणि त्याची देवडी त्याच्यासमोर होती.
- यहेज्केल ४०:२३सुमारे इ.स.पू. ५७४
जसे पूर्वेच्या बाजूने होते तसेच आतील अंगणातही एक द्वार होते जे उत्तरेच्या बाजूने होते. त्याने एका द्वारापासून त्याच्या समोरील द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात मापले.
- यहेज्केल ४०:२४सुमारे इ.स.पू. ५७४
मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले आणि मी दक्षिणेच्या बाजूला द्वार पाहिले. त्याने त्याच्या खांबांचे व देवडीचे माप घेतले आणि इतर खांब व देवडींप्रमाणेच याचेही माप होते.
- यहेज्केल ४०:२५सुमारे इ.स.पू. ५७४
त्याच्या वेशी व देवडींना चहूकडून इतर वेशी व देवड्यांप्रमाणेच अरुंद झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
- यहेज्केल ४०:२६सुमारे इ.स.पू. ५७४
त्याच्यावर जाण्यासाठी सात पायर्या होत्या आणि त्याच्यासमोर देवडी होती; त्याच्या भिंतींच्या प्रत्येक बाजूला खजुरीच्या झाडाचे कोरीवकाम केलेली सजावट होती.
- यहेज्केल ४०:२७सुमारे इ.स.पू. ५७४
आतील अंगणात सुद्धा एक द्वार होते ज्याचे तोंड दक्षिणेच्या बाजूला होते, त्याने या द्वारापासून दक्षिणेच्या बाहेरच्या द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात होते.
- यहेज्केल ४०:२८सुमारे इ.स.पू. ५७४
त्यानंतर त्या मनुष्याने मला दक्षिणेकडील द्वारातून आतील अंगणात आणले आणि त्याने दक्षिणेकडील द्वार मापले; इतर द्वारांप्रमाणेच त्याचेही माप होते.
- यहेज्केल ४०:२९सुमारे इ.स.पू. ५७४
त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती.
- यहेज्केल ४०:३०सुमारे इ.स.पू. ५७४
(आतील अंगणाच्या चहूकडून वेशीच्या देवड्या पंचवीस हात रुंद आणि पाच हात खोल होत्या.)
- यहेज्केल ४०:३१सुमारे इ.स.पू. ५७४
त्याची देवडी बाहेरील अंगणासमोर होती; खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम करून त्याच्या खांबांना सजविले होते आणि त्यावर जाण्यास आठ पायर्या होत्या.
- यहेज्केल ४०:३२सुमारे इ.स.पू. ५७४
त्यानंतर त्याने मला पूर्वेच्या बाजूने आतील अंगणात आणले, आणि त्याने वेशीचे माप घेतले; इतर वेशींप्रमाणेच हिचेही माप भरले.
- यहेज्केल ४०:३३सुमारे इ.स.पू. ५७४
त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती.