मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ४१:१०सुमारे इ.स.पू. ५७४

    आणि याजकांच्या खोल्यामधील मोकळ्या जागेचे माप मंदिराच्या सभोवती वीस हात रुंद होते.

  2. यहेज्केल ४१:११सुमारे इ.स.पू. ५७४

    त्या मोकळ्या जागेकडून खोल्यांसाठी प्रवेशद्वार होते, एक उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे; आणि मोकळ्या जागेलगत सभोवार असलेला आधार पाच हात रुंद होता.

  3. यहेज्केल ४१:१२सुमारे इ.स.पू. ५७४

    मंदिराच्या अंगणासमोरील पश्चिमेकडील इमारत सत्तर हात रुंद होती. सभोवार त्या इमारतीची भिंत पाच हात जाड होती आणि त्याची लांबी नव्वद हात होती.

  4. यहेज्केल ४१:१३सुमारे इ.स.पू. ५७४

    त्यानंतर त्याने मंदिराचे माप घेतले; ते शंभर हात लांब होते आणि मंदिराचे अंगण व त्याच्या भिंतीसह इमारतीची लांबी देखील शंभर हात होती.

  5. यहेज्केल ४१:१४सुमारे इ.स.पू. ५७४

    मंदिराच्या समोरच्या बाजूसह, पूर्वेच्या बाजूने मंदिराची रुंदी शंभर हात होती.

  6. यहेज्केल ४१:१५सुमारे इ.स.पू. ५७४

    नंतर त्याने मंदिराच्या मागच्या बाजूच्या समोरच्या इमारतीची लांबी मापली, ती तिच्या दोन्ही बाजूंच्या सज्ज्यांसह शंभर हात होती. मुख्य दिवाणखाना, आतील पवित्रस्थान आणि अंगणासमोरील देवडी,

  7. यहेज्केल ४१:१६सुमारे इ.स.पू. ५७४

    त्याचप्रमाणे उंबरठे आणि अरुंद खिडक्या आणि त्या सभोवार असलेले तीनही सज्जे; उंबरठा व त्याच्या पलीकडील सर्वकाही लाकडाने आच्छादले होते—जमीन, खिडक्यापर्यंतच्या भिंती आणि खिडक्या झाकलेल्या होत्या.

  8. यहेज्केल ४१:१७सुमारे इ.स.पू. ५७४

    आतील पवित्रस्थानाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील वरचा भाग आणि आतील व बाहेरील पवित्रस्थानाच्या सभोवारच्या भिंतीवर टप्या टप्याने

  9. यहेज्केल ४१:१८सुमारे इ.स.पू. ५७४

    करूब व खजुरीची झाडे कोरली होती. एका खजुरीच्या झाडानंतर एक करूब कोरले होते. प्रत्येक करुबाला दोन मुखे होती:

  10. यहेज्केल ४१:१९सुमारे इ.स.पू. ५७४

    एका खजुरीच्या झाडाकडून मनुष्याचे मुख तर दुसर्‍या खजुरीच्या झाडाकडून सिंहाचे मुख, मंदिरात चोहीकडे ते कोरलेले होते.

  11. यहेज्केल ४१:२०सुमारे इ.स.पू. ५७४

    मुख्य दिवाणखान्याच्या भिंतींवर जमिनीपासून प्रवेशद्वाराच्या वरच्या भागापर्यंत करूब आणि खजुरीची झाडे कोरली होती.

  12. यहेज्केल ४१:२१सुमारे इ.स.पू. ५७४

    मुख्य दिवाणखान्याला चौरस द्वारपट्टी होती आणि ती परमपवित्रस्थानाच्या द्वारपट्टीसारखीच होती.

  13. यहेज्केल ४१:२२सुमारे इ.स.पू. ५७४

    तिथे एक लाकडी वेदी होती ती तीन हात उंच आणि दोन हात लांब होती, तिचे कोपरे, तिची बैठक आणि तिच्या बाजू लाकडाच्या होत्या. तो मनुष्य मला म्हणाला, “हा तोच मेज आहे जो याहवेहसमोर असतो.”

  14. यहेज्केल ४१:२३सुमारे इ.स.पू. ५७४

    मुख्य दिवाणखाना आणि परमपवित्रस्थानाला दुहेरी दरवाजे होते.

  15. यहेज्केल ४१:२४सुमारे इ.स.पू. ५७४

    प्रत्येक द्वाराला दोन झडपा होत्या; प्रत्येक द्वाराला बिजागरी लावलेल्या दोन झडपा होत्या.

  16. यहेज्केल ४१:२५सुमारे इ.स.पू. ५७४

    मुख्य दिवाणखान्याच्या द्वारावर त्यासारखीच करूब व खजुरीची झाडे कोरलेली होती आणि देवडीसमोर लाकडाच्या लोंबत्या तुळया होत्या.

  17. यहेज्केल ४१:२६सुमारे इ.स.पू. ५७४

    देवडीच्या बाजूच्या भिंतींवर अरुंद खिडक्या होत्या, ज्यावर प्रत्येक बाजूंनी खजुरीची झाडे कोरली होती. मंदिराच्या बाजूला असलेल्या खोल्यांमध्ये सुद्धा लोंबत्या तुळया होत्या.

  18. यहेज्केल ४२:१सुमारे इ.स.पू. ५७४

    मग त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरील अंगणात आणले आणि मंदिराच्या अंगणासमोर व उत्तरेच्या बाहेरील भिंतीच्या समोर असलेल्या खोल्यांमध्ये आणले.

  19. यहेज्केल ४२:२सुमारे इ.स.पू. ५७४

    या इमारतीचे द्वार जे उत्तरेकडे होते त्याची लांबी शंभर हात व रुंदी पन्नास हात होती.

  20. यहेज्केल ४२:३सुमारे इ.स.पू. ५७४

    आतील अंगणापासून बाहेरील अंगणाच्या पाऊलवाटेच्या समोरपर्यंत दोन्ही वीस हाताच्या खंडात होते, तीन मजल्यांवर समोरासमोर सज्जे होते.

  21. यहेज्केल ४२:४सुमारे इ.स.पू. ५७४

    खोल्यांच्या समोर आतील मार्ग होता जो दहा हात रुंद आणि शंभर हात लांब होता. त्याच्या उत्तरेच्या बाजूने दरवाजे होते.

  22. यहेज्केल ४२:५सुमारे इ.स.पू. ५७४

    तळ आणि मधल्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा वरील मजल्यावरील खोल्या अरुंद होत्या, कारण सज्ज्यांनी अधिक जागा घेतली होती.

  23. यहेज्केल ४२:६सुमारे इ.स.पू. ५७४

    जसे अंगणात होते तसे वरच्या मजल्याच्या खोल्यांना खांब नव्हते; म्हणून तळ आणि मधल्या मजल्यांपेक्षा त्या मजल्याची जागा कमी होती.

  24. यहेज्केल ४२:७सुमारे इ.स.पू. ५७४

    खोल्या आणि बाहेरील अंगणाला समांतर अशी बाहेरून एक भिंत होती; ती खोल्यांच्या समोर पन्नास हाताइतकी पुढे गेली होती.

  25. यहेज्केल ४२:८सुमारे इ.स.पू. ५७४

    बाहेरील अंगणाच्या बाजूला असलेल्या खोल्यांची रांग पन्नास हात लांब होती आणि पवित्रस्थानाच्या अगदी जवळ असलेल्या खोल्यांची रांग शंभर हात लांब होती.