- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल ४३:१४सुमारे इ.स.पू. ५७४
भूमीवरील तळभागापासून वेदीच्या सभोवतालच्या खालच्या बैठकीपर्यंतची उंची दोन हात आणि बैठक एक हात रुंद आहे. या खालच्या बैठकीपासून वरील बैठकीपर्यंत जे वेदीसभोवती जाते ती चार हात उंच आणि ती सुद्धा एक हात रुंद आहे.
- यहेज्केल ४३:१५सुमारे इ.स.पू. ५७४
त्याच्यावरती, वेदीचा अग्निकुंड चार हात उंच, आणि वेदीच्या अग्निकुंडाला जोडून चार शिंगे वर निघाली होती.
- यहेज्केल ४३:१६सुमारे इ.स.पू. ५७४
वेदीचा अग्निकुंड चौरस असून तो बारा हात लांब आणि बारा हात रुंद आहे.
- यहेज्केल ४३:१७सुमारे इ.स.पू. ५७४
वरील बैठक सुद्धा चौरस असून ती चौदा हात लांब आणि चौदा हात रुंद आहे. वेदीच्या चहूकडील तळभाग एक हात व त्याचा काठ अर्धा हात आहे. वेदीच्या पायर्या पूर्वेकडे आहेत.”
- यहेज्केल ४३:१८सुमारे इ.स.पू. ५७४
तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे:
- यहेज्केल ४३:१९सुमारे इ.स.पू. ५७४
सादोकच्या कुटुंबाच्या लेवी कुळातील याजकांना तुम्ही पापार्पणासाठी एक गोर्हा द्यावा. हे याजक माझी सेवा करण्यास माझ्यासमोर येतात, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल ४३:२०सुमारे इ.स.पू. ५७४
तू त्याचे काही रक्त घेऊन वेदीच्या चार शिंगांना आणि वरील बैठकीच्या चारही कोपर्यांना आणि काठाला सर्वत्र लावावे आणि याप्रकारे वेदीला शुद्ध करून त्यासाठी प्रायश्चित कर.
- यहेज्केल ४३:२१सुमारे इ.स.पू. ५७४
पापार्पणासाठी तू गोर्हा घ्यावा आणि पवित्रस्थानाबाहेर मंदिराच्या नेमलेल्या ठिकाणी तो जाळून टाकावा.
- यहेज्केल ४३:२२सुमारे इ.स.पू. ५७४
“दुसर्या दिवशी पापार्पणासाठी निर्दोष बोकड घ्यावा आणि वेदी शुद्ध करावी, ज्याप्रकारे गोर्ह्याद्वारे शुद्ध केली होती.
- यहेज्केल ४३:२३सुमारे इ.स.पू. ५७४
ती शुद्ध केल्यानंतर, एक गोर्हा व मेंढरातील एका मेंढ्याचे अर्पण करावे, ते दोन्ही निर्दोष असावेत.
- यहेज्केल ४३:२४सुमारे इ.स.पू. ५७४
त्यांना तू याहवेहसमोर अर्पण करावे आणि याजकांनी त्यांच्यावर मीठ टाकावे आणि होमार्पण म्हणून याहवेहसमोर अर्पण करावे.
- यहेज्केल ४३:२५सुमारे इ.स.पू. ५७४
“सात दिवस प्रतिदिनी तू एक बोकड पापार्पण म्हणून अर्पण करावा; एक गोर्हा व मेंढरातील एक मेंढा आणावा, ते दोन्ही निर्दोष असावेत.
- यहेज्केल ४३:२६सुमारे इ.स.पू. ५७४
सात दिवस त्यांनी वेदीसाठी प्रायश्चित करून ती शुद्ध करावी; याप्रकारे ते वेदीचे समर्पण करतील.
- यहेज्केल ४३:२७सुमारे इ.स.पू. ५७४
हे दिवस समाप्त झाल्यानंतर, आठव्या दिवसापासून पुढे, याजकांनी तुमची होमार्पणे व शांत्यर्पणे वेदीवर अर्पण करावी. तेव्हा मी तुमचा स्वीकार करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
- यहेज्केल ४४:१सुमारे इ.स.पू. ५७४
तेव्हा त्या मनुष्याने मला मंदिराच्या बाहेरील द्वाराकडे परत आणले, ज्याचे तोंड पूर्वेकडे होते आणि ते बंद होते.
- यहेज्केल ४४:२सुमारे इ.स.पू. ५७४
याहवेहने मला म्हटले, “हे द्वार बंदच असावे. ते उघडले जाऊ नये; त्यातून कोणीही प्रवेश करू नये. ते बंदच असावे कारण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने त्यातून प्रवेश केला.
- यहेज्केल ४४:३सुमारे इ.स.पू. ५७४
केवळ राजपुत्रच स्वतः द्वारात बसून याहवेहसमोर भोजन करू शकेल. त्याने देवडीच्या द्वारातून आत यावे आणि तिथूनच बाहेर जावे.”
- यहेज्केल ४४:४सुमारे इ.स.पू. ५७४
नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडील द्वारातून मंदिरासमोर आणले. तेव्हा मंदिर याहवेहच्या वैभवाने भरत असताना मी पाहिले आणि मी तिथे उपडा पडलो.
- यहेज्केल ४४:५सुमारे इ.स.पू. ५७४
याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा, जवळून ऐक आणि याहवेहच्या मंदिराविषयी जे सर्व नियम व सूचना मी तुला सांगतो त्या सर्वांकडे लक्ष दे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांकडे आणि पवित्रस्थानातून बाहेर जाण्याच्या मार्गांकडे लक्ष दे.
- यहेज्केल ४४:६सुमारे इ.स.पू. ५७४
बंडखोर इस्राएलास सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अहो इस्राएली लोकांनो तुम्ही जी अमंगळ कृत्ये केली ती पुरे!
- यहेज्केल ४४:७सुमारे इ.स.पू. ५७४
तुमच्या अमंगळ कृत्यांसह तुम्ही हृदयाने आणि शरीराने बेसुंती असे विदेशी लोक माझ्या पवित्रस्थानात आणले, अन्न, चरबी आणि रक्ताची अर्पणे करून तुम्ही माझे मंदिर भ्रष्ट केले आणि माझा करार मोडला.
- यहेज्केल ४४:८सुमारे इ.स.पू. ५७४
माझ्या पवित्र वस्तूंबाबत तुमची जबाबदारी पार पाडण्याऐवजी, तुम्ही माझ्या पवित्रस्थानाची कर्तव्ये इतरांना सोपविली.
- यहेज्केल ४४:९सुमारे इ.स.पू. ५७४
सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हृदयाने व शरीराने बेसुंती असे विदेशी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करणार नाहीत, जे विदेशी इस्राएलात राहतात त्यांनी सुद्धा येऊ नये.
- यहेज्केल ४४:१०सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘इस्राएली लोक बहकले तेव्हा जे लेवी माझ्यापासून भरकटले व दूर गेले आणि त्यांच्या मूर्तींच्या मागे गेले ते त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगतील.
- यहेज्केल ४४:११सुमारे इ.स.पू. ५७४
मंदिराच्या द्वारांवर पहारा करीत तिथे माझ्या पवित्रस्थानात सेवा करू शकतील; लोकांसाठी होमार्पण व यज्ञाचे पशू ते कापतील आणि लोकांपुढे उभे राहून त्यांची सेवा करतील.