- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल ४५:६सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘पवित्र प्रदेशाला लागून पाच हजार हात रुंदीचा आणि पंचवीस हजार हात लांबीचा जो भाग आहे तो तुम्ही शहराची मालमत्ता म्हणून द्यावी; ती सर्व इस्राएलच्या हक्काची असणार.
- यहेज्केल ४५:७सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘पवित्र प्रदेशाच्या भोवती व शहराची मालमत्ता याला लागून प्रत्येक बाजूची सीमा राजपुत्राची असेल. तिचा विस्तार पश्चिमेपासून पश्चिमेकडे आणि पूर्वेकडून पूर्वेकडे असून त्याची लांबी पश्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत एका गोत्राच्या भागाच्या समांतर अशी असेल.
- यहेज्केल ४५:८सुमारे इ.स.पू. ५७४
ही भूमी इस्राएलमध्ये राजपुत्राचे वतन असेल. आणि यापुढे माझे राजपुत्र माझ्या इस्राएली लोकांवर अत्याचार करणार नाहीत, तर इस्राएली लोकांना त्यांच्या गोत्रानुसार देशाचे वतन घेऊ देतील.
- यहेज्केल ४५:९सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, अहो इस्राएलाच्या राजपुत्रांनो, तुम्ही फार पुढे गेला आहात! तुमचा आतंक आणि अत्याचार टाकून द्या आणि जे नीतिपूर्ण व योग्य ते करा. माझ्या लोकांचे वतन काढून घेण्याचे थांबवा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल ४५:१०सुमारे इ.स.पू. ५७४
तुम्ही अचूक काटा, अचूक एफाह आणि अचूक बथ वापरावा.
- यहेज्केल ४५:११सुमारे इ.स.पू. ५७४
एफाह आणि बथ एकाच मापाचे असावे, म्हणजे बथमध्ये होमेरचा दहावा भाग व एफाहमध्ये होमेरचा दहावा भाग असावा; होमेर हे दोन्ही मापांसाठी एकच माप असावे.
- यहेज्केल ४५:१२सुमारे इ.स.पू. ५७४
शेकेलमध्ये वीस गेराह असावे. वीस शेकेल आणि पंचवीस शेकेल आणि पंधरा शेकेल हे एक मीना समान आहेत.
- यहेज्केल ४५:१३सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘तुम्ही अर्पण करावी ती विशेष भेट ही आहे: गव्हाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग आणि जवाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग.
- यहेज्केल ४५:१४सुमारे इ.स.पू. ५७४
बथने मापलेले जैतुनाच्या तेलाचा नेमलेला भाग, जो प्रत्येक कोर मधून एक बथचा दहावा भाग आहे (ज्यात दहा बथ किंवा एक होमेर मावते, कारण दहा बथ हे एका होमेरसमान आहेत).
- यहेज्केल ४५:१५सुमारे इ.स.पू. ५७४
इस्राएलमधील पुष्कळ पाणी असलेल्या कुरणातील कळपातून दोनशे मेंढरांमागे एक मेंढरू द्यावे. याचा उपयोग लोकांचे प्रायश्चित करावे म्हणून धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे यासाठी केला जावा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल ४५:१६सुमारे इ.स.पू. ५७४
देशातील सर्व लोकांनी ही विशेष अर्पणे इस्राएलच्या राजपुत्राला देणे आवश्यक आहे.
- यहेज्केल ४५:१७सुमारे इ.स.पू. ५७४
हे राजपुत्राचे कर्तव्य असावे की त्याने इस्राएलच्या सर्व नेमलेल्या सणांच्या वेळी; म्हणजेच अमावस्या आणि शब्बाथाच्या वेळी होमार्पणे, धान्यार्पणे आणि पेयार्पणे आणावी. त्याने पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करावे.
- यहेज्केल ४५:१८सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक निर्दोष गोर्हा घेऊन पवित्रस्थान शुद्ध करावे.
- यहेज्केल ४५:१९सुमारे इ.स.पू. ५७४
याजकाने पापार्पणातील काही रक्त घेऊन मंदिराच्या द्वार पट्टीवर, वेदीच्या वरील बैठकीच्या चार कोपर्यांना आणि आतील अंगणाच्या द्वार पाट्यांवर लावावे.
- यहेज्केल ४५:२०सुमारे इ.स.पू. ५७४
त्याचप्रमाणे सातव्या दिवशी तुम्ही तसेच करावे जर कोणी नकळत भोळेपणाने किंवा अज्ञानात पाप केले; तर मंदिरासाठी तुम्ही ते प्रायश्चित करावे.
- यहेज्केल ४५:२१सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडण सण पाळावा, तो सण सात दिवसांचा असावा, त्यात तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी.
- यहेज्केल ४५:२२सुमारे इ.स.पू. ५७४
त्या दिवशी राजपुत्राने स्वतःसाठी व देशातील सर्व लोकांच्या पापार्पणासाठी एक गोर्हा द्यावा.
- यहेज्केल ४५:२३सुमारे इ.स.पू. ५७४
सणाच्या सात दिवसाच्या दरम्यान दररोज त्याने सात निर्दोष गोर्हे व सात एडके होमार्पण म्हणून याहवेहसमोर आणावे, त्याचप्रमाणे पापार्पणासाठी एक बोकड आणावे.
- यहेज्केल ४५:२४सुमारे इ.स.पू. ५७४
धान्यार्पण म्हणून त्याने प्रत्येक गोर्ह्याबरोबर एक एफाह व एका मेंढ्याबरोबर एक एफाह द्यावा, त्याचबरोबर एका एफाहमागे एक हीन जैतुनाचे तेल आणावे.
- यहेज्केल ४५:२५सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘त्याचप्रमाणे सात दिवसांच्या सणाच्या दरम्यान, ज्याची सुरुवात सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी होते, त्याने पापार्पणे, होमार्पणे व धान्यार्पणे आणि तेल आणावे.
- यहेज्केल ४६:१सुमारे इ.स.पू. ५७४
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: आतील अंगणाचे पूर्वेकडील द्वार कार्याच्या सर्व सहा दिवसा दरम्यान बंद असावे, परंतु शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी ते उघडे असावे.
- यहेज्केल ४६:२सुमारे इ.स.पू. ५७४
राजपुत्राने बाहेरून द्वाराच्या देवडीकडून जाणार्या मार्गाने प्रवेश करावा आणि चौकीकडे उभे राहावे. याजकांनी राजपुत्राच्या होमार्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञ करावा. त्याने द्वाराच्या उंबरठ्यावर उपासना करीत नमन करावे आणि त्यानंतर बाहेर जावे, परंतु संध्याकाळपर्यंत द्वार बंद करू नये.
- यहेज्केल ४६:३सुमारे इ.स.पू. ५७४
शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी.
- यहेज्केल ४६:४सुमारे इ.स.पू. ५७४
शब्बाथ दिवशी राजपुत्र जे होमार्पण म्हणून याहवेहसाठी आणेल, ते सहा कोकरे आणि एक एडका असून ते सर्व निर्दोष असावे.
- यहेज्केल ४६:५सुमारे इ.स.पू. ५७४
एका एडक्यासह दिलेले अन्नार्पण एक एफाह असावे आणि कोकर्याबरोबरचे धान्य त्याच्या आवडीनुसार एका एफाहसाठी एक हीन जैतून तेलाबरोबर द्यावे.