- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल ३९:१३सुमारे इ.स.पू. ५८७
देशातील सर्व लोक त्यांना पुरतील आणि मी माझे वैभव प्रकट करेन तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल ३९:१४सुमारे इ.स.पू. ५८७
देश सातत्याने शुद्ध करण्यासाठी लोकांना कामावर लावले जाईल. ते अजून इतर लोकांबरोबर देशभर पसरतील, जमिनीवर जे मृतदेह पडलेले असतील त्यांना ते पुरतील. “ ‘सात महिने संपल्यावर ते अजून बारीक शोध करतील.
- यहेज्केल ३९:१५सुमारे इ.स.पू. ५८७
जेव्हा ते देशभर फिरतील, तेव्हा ज्या कोणाला मानवी हाड सापडेल, तिथे ते चिन्ह करून ठेवतील आणि कबर खोदणारे त्यांना हामोन गोगच्या खोर्यात,
- यहेज्केल ३९:१६सुमारे इ.स.पू. ५८७
जे हामोनाह नगरात आहे तिथे पुरेपर्यंत असे होत जाईल. अशाप्रकारे ते देशाला शुद्ध करतील.’
- यहेज्केल ३९:१७सुमारे इ.स.पू. ५८७
“मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: प्रत्येक प्रकारच्या पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना बोलावून सांग: ‘एकवट व्हा आणि जो यज्ञ, एक मोठा यज्ञ मी इस्राएलच्या पर्वतांवर तयार करीत आहे त्यासाठी चहूकडून एकत्र या. तिथे तुम्ही मांस खाल व रक्त प्याल.
- यहेज्केल ३९:१८सुमारे इ.स.पू. ५८७
तुम्ही बलवान पुरुषांचे मांस खाल व पृथ्वीच्या राजपुत्रांचे रक्त प्याल, जणू ते बाशानातील पोसलेले सर्व प्राणी म्हणजेच मेंढे व कोकरे, बोकडे व वासरे आहेत.
- यहेज्केल ३९:१९सुमारे इ.स.पू. ५८७
जो यज्ञ मी तुम्हासाठी तयार करीत आहे, त्यात तृप्ती होईपर्यंत तुम्ही चरबी खाल व पिऊन मस्त होईपर्यंत रक्त प्याल.
- यहेज्केल ३९:२०सुमारे इ.स.पू. ५८७
माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, बलवान पुरुष आणि सर्वप्रकारच्या सैनिकांना खाऊन तुम्ही तृप्त व्हाल,’ असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल ३९:२१सुमारे इ.स.पू. ५८७
“राष्ट्रांमध्ये मी माझे वैभव प्रकट करेन आणि त्यांना मी केलेली शिक्षा आणि मी त्यांच्यावर उगारलेला हात, सर्व राष्ट्रे पाहतील.
- यहेज्केल ३९:२२सुमारे इ.स.पू. ५८७
त्या दिवसापासून पुढे इस्राएली लोक जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.
- यहेज्केल ३९:२३सुमारे इ.स.पू. ५८७
आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएली लोक त्यांच्या पापामुळे निर्वासित झाले, कारण ते माझ्याशी अविश्वासू होते. म्हणून त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले आणि त्यांना त्यांच्या वैर्यांच्या हाती सोपविले, आणि ते सर्व तलवारीने पडले.
- यहेज्केल ३९:२४सुमारे इ.स.पू. ५८७
त्यांच्या अशुद्धतेनुसार आणि पापांनुसार त्यांच्याशी व्यवहार केला आणि त्यांच्यापासून मी माझे मुख लपविले.
- यहेज्केल ३९:२५सुमारे इ.स.पू. ५८७
“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी याकोबाची संपत्ती परत करेन आणि इस्राएलच्या सर्व लोकांवर दया करेन आणि माझ्या पवित्र नावासाठी ईर्षा बाळगेन.
- यहेज्केल ३९:२६सुमारे इ.स.पू. ५८७
जेव्हा ते त्यांच्या देशात सुरक्षित राहतील आणि त्यांना घाबरविण्यास कोणीही नसेल, तेव्हा त्यांची लज्जा व मला दाखविलेले सर्व अविश्वासूपण ते विसरून जातील.
- यहेज्केल ३९:२७सुमारे इ.स.पू. ५८७
जेव्हा मी त्यांना राष्ट्रांतून परत आणेन आणि त्यांच्या शत्रूंच्या देशांमधून त्यांना एकत्र करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे अनेक राष्ट्रांच्या दृष्टीत मी पवित्र मानला जाईन.
- यहेज्केल ३९:२८सुमारे इ.स.पू. ५८७
तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे, कारण जरी राष्ट्रांमध्ये मी त्यांना निर्वासित असे पाठवले, तरी मी त्यांना त्यांच्या देशात एकत्र करेन, कोणीही मागे सोडला जाणार नाही.
- यहेज्केल ३९:२९सुमारे इ.स.पू. ५८७
यापुढे मी आपले मुख त्यांच्यापासून लपवणार नाही, कारण इस्राएली लोकांवर मी माझा आत्मा ओतेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
- यहेज्केल ४०:१सुमारे इ.स.पू. ५७४
आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, वर्षाच्या सुरुवातीला, महिन्याच्या दहाव्या दिवशी, शहराचे पतन झाल्यानंतर चौदाव्या वर्षी; त्याच दिवशी याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला तिथे नेले.
- यहेज्केल ४०:२सुमारे इ.स.पू. ५७४
परमेश्वराच्या दृष्टान्तांमध्ये याहवेहनी मला इस्राएल देशात नेले आणि एका अत्यंत उंच पर्वतावर ठेवले. त्याच्या दक्षिणेकडे काही इमारती होत्या, ज्या शहरासारख्या दिसत होत्या.
- यहेज्केल ४०:३सुमारे इ.स.पू. ५७४
याहवेहने मला तिथे नेले आणि मी एक मनुष्य पाहिला जो कास्यासारखा दिसत होता; तो तागाची एक दोरी व मापन-दंड हातात घेऊन वेशीवर उभा होता.
- यहेज्केल ४०:४सुमारे इ.स.पू. ५७४
तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.”
- यहेज्केल ४०:५सुमारे इ.स.पू. ५७४
मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती.
- यहेज्केल ४०:६सुमारे इ.स.पू. ५७४
मग तो पूर्वेकडील द्वाराकडे गेला. त्याने त्याच्या पायर्या चढून जाऊन द्वाराच्या उंबरठ्याचे माप घेतले; तो एक मापन-दंड होता.
- यहेज्केल ४०:७सुमारे इ.स.पू. ५७४
पहारेकर्यांची चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद होती, आणि दोन्ही चौक्यांमध्ये पाच हात अंतर होते. आणि मंदिरासमोर असलेल्या देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एका मापन-दंडा इतका होता.
- यहेज्केल ४०:८सुमारे इ.स.पू. ५७४
त्यानंतर त्याने मापन-दंडाने वेशीच्या देवडीचे माप घेतले;