मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ३७:१४सुमारे इ.स.पू. ५८७

    मी माझा आत्मा तुमच्यात घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल आणि मी तुम्हाला तुमच्या देशात स्थायिक करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह जे बोललो आहे, तेच मी केले आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

  2. यहेज्केल ३७:१५सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  3. यहेज्केल ३७:१६सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, लाकडाची एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘यहूदाह व त्याच्या सोबतीच्या इस्राएली लोकांचे.’ मग लाकडाची आणखी एक काठी घे आणि त्यावर लिही, ‘योसेफ (म्हणजेच एफ्राईम) आणि त्याच्या सोबतीच्या सर्व इस्राएली लोकांचे.’

  4. यहेज्केल ३७:१७सुमारे इ.स.पू. ५८७

    या दोन काठ्यांना जोडून ती एक काठी दिसेल अशी ती तुझ्या हातात धर.

  5. यहेज्केल ३७:१८सुमारे इ.स.पू. ५८७

    “जेव्हा तुझे लोक तुला विचारतील, ‘याचा अर्थ काय आहे हे तू आम्हाला सांगणार नाही काय?’

  6. यहेज्केल ३७:१९सुमारे इ.स.पू. ५८७

    त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: योसेफाची काठी; जी एफ्राईमच्या हातात आहे तिला व इस्राएलचे जे लोक त्याचे सोबती आहेत, त्यांना मी घेऊन यहूदीयाच्या काठीशी जोडीन. मी त्यांना लाकडाची एक काठी करेन आणि ते माझ्या हातात एक होतील.’

  7. यहेज्केल ३७:२०सुमारे इ.स.पू. ५८७

    ज्या काठ्यांवर तू लिहिले त्या काठ्या त्यांच्या नजरेसमोर धर

  8. यहेज्केल ३७:२१सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोक ज्या राष्ट्रांमध्ये गेले आहेत, तिथून मी त्यांना बाहेर काढेन. चहूकडून मी त्यांना एकवटेन आणि त्यांना स्वदेशात आणेन.

  9. यहेज्केल ३७:२२सुमारे इ.स.पू. ५८७

    मी त्यांना या देशात, इस्राएलच्या पर्वतांवर एक राष्ट्र असे करेन. त्या सर्वांवर एक राजा असणार आणि ते यापुढे दोन राष्ट्र नसतील किंवा ते दोन राज्यांमध्ये विभागले जाणार नाहीत.

  10. यहेज्केल ३७:२३सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि ते पुन्हा त्यांच्या मूर्तींनी व अमंगळ प्रतिमांनी किंवा त्यांच्या पातकांनी यापुढे स्वतःला भ्रष्ट करणार नाहीत, कारण त्यांच्या सर्व पापमय घसरणीपासून मी त्यांना वाचवेन आणि मी त्यांना शुद्ध करेन. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.

  11. यहेज्केल ३७:२४सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘माझा सेवक दावीद, त्यांच्यावर राजा होईल, आणि त्या सर्वांना एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमांचे अनुसरण करतील आणि माझे विधी काळजीपूर्वक पाळतील.

  12. यहेज्केल ३७:२५सुमारे इ.स.पू. ५८७

    माझा सेवक याकोबाला मी दिलेल्या देशात, जिथे तुमचे पूर्वज राहिले तिथे ते राहतील. ते व त्यांची लेकरे आणि त्यांच्या लेकरांची लेकरे सर्वकाळ तिथे राहतील आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा राजपुत्र असेल.

  13. यहेज्केल ३७:२६सुमारे इ.स.पू. ५८७

    मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन; तो सर्वकाळचा करार असेल. मी त्यांना स्थापित करेन आणि त्यांची संख्या बहुगुणित करेन, आणि मी माझे पवित्रस्थान सर्वकाळासाठी त्यांच्यात ठेवेन.

  14. यहेज्केल ३७:२७सुमारे इ.स.पू. ५८७

    माझे निवासस्थान त्यांच्याबरोबर राहील; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.

  15. यहेज्केल ३७:२८सुमारे इ.स.पू. ५८७

    जेव्हा माझे पवित्रस्थान सदासर्वकाळ त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सर्व राष्ट्रे जाणतील की मी याहवेह इस्राएलला पवित्र करतो.’ ”

  16. यहेज्केल ३८:१सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  17. यहेज्केल ३८:२सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, मागोग देशाचा रोष, जो मेशेख व तूबाल यांचा राजपुत्र आहे त्याच्याकडे आपले मुख कर व त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर

  18. यहेज्केल ३८:३सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख व तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष, मी तुझ्याविरुद्ध आहे.

  19. यहेज्केल ३८:४सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुला उपडे पाडेन, तुझ्या जाभाडात गळ अडकवेन आणि तुझे घोडे व संपूर्ण हत्यारबंद असलेले घोडेस्वार आणि मोठ्या व लहान ढाली घेतलेल्या लोकांचा मोठा समूह, सर्व धनुर्धारी यासर्वांसह मी तुला बाहेर काढेन.

  20. यहेज्केल ३८:५सुमारे इ.स.पू. ५८७

    पर्शिया, कूश आणि पूट हे सर्व त्यांच्या ढाली व शिरटोप यासह त्यांच्याबरोबर असतील.

  21. यहेज्केल ३८:६सुमारे इ.स.पू. ५८७

    गोमेर आपल्या सर्व सैन्यासह आणि उत्तरेकडील बेथ-तोगर्माह आपल्या पूर्ण सैन्यासह—अनेक राष्ट्रे तुझ्याबरोबर बाहेर निघतील.

  22. यहेज्केल ३८:७सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘तू व तुझ्याकडे एकत्र झालेला समूह सिद्ध व्हा; तयार राहा आणि त्यांचा नायक हो.

  23. यहेज्केल ३८:८सुमारे इ.स.पू. ५८७

    पुष्कळ दिवस गेल्यानंतर तुला बोलाविण्यात येईल. येत्या काळात जो देश युद्धातून परत आलेला आहे, ज्याचे लोक पुष्कळ राष्ट्रांतून इस्राएलच्या पर्वतांकडे एकत्र केले आहेत. जो पुष्कळ काळ ओसाड पडला होता. त्यांना राष्ट्रांतून बाहेर आणले गेले आणि जे आता सुरक्षिततेत राहतात, तू त्या देशावर आक्रमण करशील.

  24. यहेज्केल ३८:९सुमारे इ.स.पू. ५८७

    तू आणि तुझे सर्व सैन्य व तुझ्याबरोबर अनेक राष्ट्रे वादळाप्रमाणे पुढे जातील; तुम्ही मेघांप्रमाणे देश झाकून टाकाल.

  25. यहेज्केल ३८:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तुमच्या मनात विचार येतील आणि तुम्ही वाईट युक्ती योजाल.