मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ३६:२सुमारे इ.स.पू. ५८७

    सार्वभौम याहवेह असे म्हणतात: शत्रूंनी तुम्हाला म्हटले, “अाहा! पुरातन शिखरे आमचे वतन झाले आहे.” ’

  2. यहेज्केल ३६:३सुमारे इ.स.पू. ५८७

    म्हणून भविष्यवाणी कर आणि सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही बाकीच्या राष्ट्रांचे वतन व्हावे व लोकांच्या द्वेष व निंदेचा विषय व्हावे म्हणून चहूकडून त्यांनी तुम्हाला उद्ध्वस्त करून तुम्हाला सर्व बाजूंनी ठेचले आहे,

  3. यहेज्केल ३६:४सुमारे इ.स.पू. ५८७

    यास्तव, इस्राएलच्या पर्वतांनो सार्वभौम याहवेहचे वचन ऐका: पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्‍यांना, ओसाड अवशेष व तुमच्या सभोवती असलेल्या बाकीच्या राष्ट्रांनी लुटून अपमानित केलेल्या उजाड नगरांना सार्वभौम याहवेह असे म्हणतात;

  4. यहेज्केल ३६:५सुमारे इ.स.पू. ५८७

    सार्वभौम याहवेह म्हणतात: माझ्या पेटलेल्या आवेशात बाकी राष्ट्रांच्या विरुद्ध, आणि एदोमविरुद्ध मी बोललो, कारण त्यांच्या हृदयातील उल्हास व द्वेषाने त्यांनी माझ्या देशातील कुरणे लुटावी म्हणून त्याला आपलेच वतन करून घेतले.’

  5. यहेज्केल ३६:६सुमारे इ.स.पू. ५८७

    म्हणून इस्राएल देशासंबंधी भविष्यवाणी कर आणि पर्वत व टेकड्यांना, ओहोळे व खोर्‍यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही राष्ट्रांचा अपमान सहन केला म्हणून मी माझ्या ईर्षेच्या क्रोधात बोलतो.

  6. यहेज्केल ३६:७सुमारे इ.स.पू. ५८७

    म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या उंचावलेल्या हाताने मी शपथ घेतो की, तुमच्या सभोवती असलेली राष्ट्रे देखील अपमान सहन करतील.

  7. यहेज्केल ३६:८सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘पण इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्हावर माझ्या इस्राएली लोकांसाठी फांद्या फुटून फळे येतील, म्हणजे माझे लोक लवकर घरी येतील.

  8. यहेज्केल ३६:९सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुझ्याविषयी विचार करतो आणि मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहीन; तुझ्यावर नांगरणी व पेरणी होईल,

  9. यहेज्केल ३६:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि तुझ्यात, होय, सर्व इस्राएलात पुष्कळ लोक वसतील असे मी करेन. नगरे वसतील आणि भग्नावशेष पुन्हा बांधले जातील.

  10. यहेज्केल ३६:११सुमारे इ.स.पू. ५८७

    तुमच्यात राहणार्‍या लोकांची व प्राण्यांची संख्या मी वाढवेन आणि ते फलद्रूप होतील व संख्येने वाढतील. पूर्वीप्रमाणे मी तुझ्यावर लोकांना वसवीन आणि पूर्वीपेक्षा तुझी अधिक समृद्धी करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  11. यहेज्केल ३६:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    लोकांनी, माझ्या इस्राएल लोकांनी तुम्हावर वस्ती करावी असे मी करेन. ते तुमचा ताबा घेतील आणि तुम्ही त्यांचे वतन व्हाल; तुम्ही पुन्हा त्यांना लेकरांपासून वंचित करणार नाही.

  12. यहेज्केल ३६:१३सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: कारण काहीजण तुम्हाला म्हणतात, “तुम्ही लोकांना गिळून टाकता आणि राष्ट्राला लेकरांपासून वंचित ठेवतात,”

  13. यहेज्केल ३६:१४सुमारे इ.स.पू. ५८७

    यामुळे यापुढे तुम्ही लोकांना गिळणार नाही, ना राष्ट्राला अपत्यहीन ठेवाल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  14. यहेज्केल ३६:१५सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुम्हाला पुन्हा राष्ट्रांचे टोमणे ऐकू देणार नाही आणि तुम्ही पुन्हा लोकांचा अपमान सहन करणार नाही किंवा तुमच्या राष्ट्राचे पतन होऊ देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  15. यहेज्केल ३६:१६सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेहचे वचन पुन्हा माझ्याकडे आले:

  16. यहेज्केल ३६:१७सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, इस्राएली लोक जेव्हा स्वदेशात राहत होते, तेव्हा त्यांनी तो त्यांच्या वर्तनाने व कृत्यांनी भ्रष्ट केला. त्यांची कृत्ये माझ्या दृष्टीत स्त्रियांच्या महिन्याच्या अशुद्धतेप्रमाणे होती.

  17. यहेज्केल ३६:१८सुमारे इ.स.पू. ५८७

    म्हणून मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतला कारण त्यांनी देशात रक्तपात केला आणि त्यांनी देशाला त्यांच्या मूर्तींनी विटाळले.

  18. यहेज्केल ३६:१९सुमारे इ.स.पू. ५८७

    म्हणून मी त्यांना राष्ट्रांमध्ये विखुरले आणि ते देशांमध्ये पांगले; मी त्यांचा त्यांच्या वर्तनानुसार आणि त्यांच्या कृत्यांनुसार न्याय केला.

  19. यहेज्केल ३६:२०सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि राष्ट्रांमध्ये ते जिथे कुठे गेले त्यांनी माझ्या पवित्र नावाला कलंक लावला, कारण त्यांच्याविषयी असे म्हटले गेले होते, ‘हे याहवेहचे लोक आहेत, तरीही याहवेहचा देश त्यांना सोडावा लागला.’

  20. यहेज्केल ३६:२१सुमारे इ.स.पू. ५८७

    माझ्या पवित्र नावाची मला काळजी होती, जे इस्राएली लोकांनी ते ज्या राष्ट्रांमध्ये गेले तिथे कलंकित केले होते.

  21. यहेज्केल ३६:२२सुमारे इ.स.पू. ५८७

    “म्हणून इस्राएली लोकांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांनो या गोष्टी मी तुमच्यासाठी नाही, तर जे नाव तुम्ही ज्या राष्ट्रांमध्ये गेला तिथे अपवित्र केले होते त्या माझ्या पवित्र नावासाठी करणार आहे.

  22. यहेज्केल ३६:२३सुमारे इ.स.पू. ५८७

    मी माझ्या महान नावाचे पावित्र्य दाखवेन, जे राष्ट्रांमध्ये अपवित्र केले गेले, ते नाव त्यांच्यामध्ये तुम्ही अपवित्र केले आहे. जेव्हा तुमच्याद्वारे त्यांच्या दृष्टीत माझे नाव पवित्र मानले जाईल, तेव्हा राष्ट्रे जाणतील की मीच याहवेह आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  23. यहेज्केल ३६:२४सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘कारण मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर काढेन; सर्व देशातून मी तुम्हाला एकवट करेन आणि तुम्हाला तुमच्या स्वदेशात आणेन.

  24. यहेज्केल ३६:२५सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडेन, आणि तुम्ही शुद्ध व्हाल; मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून आणि तुमच्या मूर्तींपासून शुद्ध करेन.

  25. यहेज्केल ३६:२६सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुम्हाला नवे हृदय देईन आणि तुमच्यात नवा आत्मा ओतेन; मी तुमच्यातून तुमचे पाषाणी हृदय काढून मांसमय हृदय तुम्हाला देईन.