- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 605–538 BC
The Babylonian Exile
Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.
या कालखंडातील वचने
- यहेज्केल ३३:३१सुमारे इ.स.पू. ५८७
नियमाप्रमाणे येतात तसे माझे लोक तुझ्याकडे येतात आणि तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्यासमोर बसतात, परंतु ते त्याप्रमाणे अनुसरण करीत नाहीत. ते मुखाने प्रीतीविषयी बोलतात, परंतु त्यांची हृदये अन्यायाने लाभ मिळविण्यासाठी लोभी आहेत.
- यहेज्केल ३३:३२सुमारे इ.स.पू. ५८७
खरोखर, त्यांच्यासाठी तू केवळ मंजूळ आवाजात चांगले वाद्य वाजवित सुंदर प्रेमगीत गाणार्या एका मनुष्यासारखा आहेस, कारण ते तुझे वचन तर ऐकतात परंतु त्याचे अनुसरण करीत नाहीत.
- यहेज्केल ३३:३३सुमारे इ.स.पू. ५८७
“जेव्हा हे सर्वकाही घडेल; आणि ते खचितच घडेल; तेव्हा ते जाणतील की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.”
- यहेज्केल ३४:१सुमारे इ.स.पू. ५८७
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- यहेज्केल ३४:२सुमारे इ.स.पू. ५८७
“मानवपुत्रा, इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी कर; भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलच्या मेंढपाळांनो तुम्हास धिक्कार असो! तुम्ही केवळ स्वतःविषयी काळजी करता, मेंढपाळांनी आपल्या कळपाची काळजी घेऊ नये काय?
- यहेज्केल ३४:३सुमारे इ.स.पू. ५८७
तुम्ही दही खाता, उत्तम मेंढरे कापून तुम्ही आपल्यावर लोकर पांघरता, परंतु तुम्ही आपल्या कळपाची काळजी घेत नाही.
- यहेज्केल ३४:४सुमारे इ.स.पू. ५८७
तुम्ही अशक्तांस सशक्त केले नाही, ना रोग्याला आरोग्य दिले ना जखमेला पट्टी केली. भटकलेल्यास तुम्ही परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधून आणले नाही. तुम्ही त्यांच्यावर कठोर व क्रूरतेने राज्य केले.
- यहेज्केल ३४:५सुमारे इ.स.पू. ५८७
म्हणून मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची पांगापांग झाली आणि जेव्हा ते पांगले गेले तेव्हा हिंस्र पशूंसाठी भक्ष्य झाले.
- यहेज्केल ३४:६सुमारे इ.स.पू. ५८७
माझी मेंढरे सर्व डोंगरांवर व प्रत्येक उंच पर्वतांवर भटकली. संपूर्ण पृथ्वीभर ते पसरले आणि कोणी त्यांचा शोध केला नाही किंवा त्यांची नोंद घेतली नाही.
- यहेज्केल ३४:७सुमारे इ.स.पू. ५८७
“ ‘म्हणून, तुम्ही मेंढपाळांनो, याहवेहचे वचन ऐका:
- यहेज्केल ३४:८सुमारे इ.स.पू. ५८७
सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जीविताची शपथ, माझ्या कळपाला मेंढपाळ नाही आणि म्हणून त्यांची लूट झाली व हिंस्र श्वापदासाठी भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपाचा शोध केला नाही आणि कळपाची काळजी न घेता स्वतःचीच काळजी घेतली,
- यहेज्केल ३४:९सुमारे इ.स.पू. ५८७
म्हणून मेंढपाळांनो, तुम्ही याहवेहचे वचन ऐका:
- यहेज्केल ३४:१०सुमारे इ.स.पू. ५८७
सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी मेंढपाळांविरुद्ध आहे आणि माझ्या कळपाचा जाब त्यांच्यापासून घेईन. माझा कळप राखण्याचे काम मी त्यांच्यापासून काढून घेईन, म्हणजे मेंढपाळ पुन्हा स्वतःस पोसणार नाही. त्यांच्या तोंडातून मी माझ्या कळपाची सुटका करेन आणि यापुढे ते त्यांचा आहार होणार नाही.
- यहेज्केल ३४:११सुमारे इ.स.पू. ५८७
“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी स्वतः माझ्या मेंढरांचा शोध करेन आणि त्यांची काळजी घेईन.
- यहेज्केल ३४:१२सुमारे इ.स.पू. ५८७
मेंढपाळ जेव्हा आपल्या मेंढरांमध्ये राहून पांगलेल्या मेंढरांची काळजी घेतो, तसेच मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन. ढगाळ व अंधकाराच्या दिवसात ते पांगून गेले त्या सर्व ठिकाणातून मी त्यांना सोडवेन.
- यहेज्केल ३४:१३सुमारे इ.स.पू. ५८७
राष्ट्रांतून मी त्यांना आणेन आणि देशांमधून त्यांना एकवट करेन आणि मी त्यांना स्वदेशात आणेन. इस्राएलच्या डोंगरांवर, ओहोळात व देशाच्या सर्व वस्त्यांमध्ये मी त्यांना चारीन.
- यहेज्केल ३४:१४सुमारे इ.स.पू. ५८७
मी त्यांना उत्तम कुरणात पाळीन आणि इस्राएलच्या डोंगरांचे माथे त्यांची चरण्याची ठिकाणे होतील. तिथे ते चांगल्या कुरणात बसतील आणि तिथे इस्राएलच्या डोंगरांवर सर्वोत्तम कुरणात चरतील.
- यहेज्केल ३४:१५सुमारे इ.स.पू. ५८७
मी स्वतः माझ्या मेंढरांना पाळीन आणि त्यांना विसावा देईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- यहेज्केल ३४:१६सुमारे इ.स.पू. ५८७
जे हरवले आहेत त्यांचा शोध मी करेन आणि भटकून गेलेल्यांना मी परत आणेन. जखमी झालेल्यांची पट्टी करेन आणि दुबळ्यांना शक्ती देईन, परंतु पुष्ट व बलवानांना मी नष्ट करेन. मी कळपाला न्यायाने पाळीन.
- यहेज्केल ३४:१७सुमारे इ.स.पू. ५८७
“ ‘हे माझ्या कळपा, तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एक मेंढरू व दुसरे मेंढरू आणि एडके व बोकडे यामध्ये मी न्याय करेन.
- यहेज्केल ३४:१८सुमारे इ.स.पू. ५८७
चांगला चारा तुम्हाला खायला मिळाला ते तुम्हाला पुरेसे नाही काय? तुमचे बाकीचे कुरण तुम्ही तुमच्या पायाखाली तुडवावे काय? तुम्हाला पिण्यास स्वच्छ पाणी मिळाले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? बाकीचे पाणी तुम्ही तुमच्या पायांनी गढूळ करावे काय?
- यहेज्केल ३४:१९सुमारे इ.स.पू. ५८७
तुम्ही जे तुमच्या पायाखाली तुडविले ते माझ्या कळपाने खावे काय आणि जे तुमच्या पायांनी तुम्ही गढूळ केले ते पाणी त्यांनी प्यावे काय?
- यहेज्केल ३४:२०सुमारे इ.स.पू. ५८७
“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह त्यांना म्हणतात: मी स्वतः पुष्ट मेंढरे आणि दुबळी मेंढरे यांच्यात न्याय करेन.
- यहेज्केल ३४:२१सुमारे इ.स.पू. ५८७
अशक्त मेंढरांना तुम्ही तुमच्या बाजूंनी व खांद्यांनी धक्के दिले आणि त्यांना तुमच्या शिंगांनी ढकलत बाहेर हाकलून दिले,
- यहेज्केल ३४:२२सुमारे इ.स.पू. ५८७
म्हणून मी माझ्या कळपाला वाचवेन आणि त्यांची यापुढे लूट होणार नाही. मी एक मेंढरू व दुसऱ्या मेंढरांमध्ये न्याय करेन.