मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ३३:६सुमारे इ.स.पू. ५८७

    परंतु तलवार येत आहे असे पाहूनही इशारा देण्यासाठी पहारेकरी कर्णा वाजवित नाही आणि तलवार येऊन त्यातील एकाचा जीव घेते, तर त्यांच्या पापामुळे त्या व्यक्तीचा जीव गेला तरी त्यांच्या रक्ताचा जाब मी त्या पहारेकर्‍याकडून घेईन.’

  2. यहेज्केल ३३:७सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.

  3. यहेज्केल ३३:८सुमारे इ.स.पू. ५८७

    जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘अरे दुष्टा, तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू सांगत नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.

  4. यहेज्केल ३३:९सुमारे इ.स.पू. ५८७

    परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या मार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील, परंतु तू स्वतः वाचशील.

  5. यहेज्केल ३३:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही असे म्हणता: “आमचे अपराध व पापे आम्हावर भारी आहेत आणि त्यामुळे आम्ही नाश पावत आहोत. मग आम्ही कसे जगू शकतो?” ’

  6. यहेज्केल ३३:११सुमारे इ.स.पू. ५८७

    त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’

  7. यहेज्केल ३३:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    “म्हणून, हे मानवपुत्रा, तुझ्या लोकांना सांग, ‘एखाद्या नीतिमान व्यक्तीने जर आज्ञाभंग केला, तर त्या व्यक्तीची पूर्वीची नीतिमत्ता मोजण्यात येणार नाही. आणि एखादा दुष्ट पश्चात्ताप करतो, त्या व्यक्तीची पूर्वीची दुष्टता त्याच्यावर दंड आणणार नाही. नीतिमान व्यक्ती जो पाप करतो, तो जरी पूर्वी नीतिमान असला तरी त्याला जगू दिले जाणार नाही.’

  8. यहेज्केल ३३:१३सुमारे इ.स.पू. ५८७

    जर मी एका नीतिमान व्यक्तीला म्हटले की ते अवश्य जगतील, परंतु त्यांच्या नीतिमत्तेवर भरवसा करून त्यांनी दुष्टाई केली, त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाही; जी दुष्टाई त्यांनी केली, त्यामुळे ते मरतील.

  9. यहेज्केल ३३:१४सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि मी जर एखाद्या दुष्ट मनुष्याला म्हटले, ‘तू खचित मरशील,’ परंतु ते त्यांच्या पापापासून वळले आणि जे न्याय्य व योग्य ते केले;

  10. यहेज्केल ३३:१५सुमारे इ.स.पू. ५८७

    गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत.

  11. यहेज्केल ३३:१६सुमारे इ.स.पू. ५८७

    पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्यांच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जे न्याययुक्त व योग्य ते त्यांनी केले आहे; त्यामुळे ते खचितच जगतील.

  12. यहेज्केल ३३:१७सुमारे इ.स.पू. ५८७

    “तरी तुझे लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु त्यांचेच मार्ग न्याययुक्त नाहीत.

  13. यहेज्केल ३३:१८सुमारे इ.स.पू. ५८७

    जर नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि जे वाईट ते करतात, तर त्यामुळे ते मरतील.

  14. यहेज्केल ३३:१९सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि जर दुष्ट व्यक्ती त्यांच्या दुष्टाईपासून वळतील आणि जे न्याययुक्त व योग्य ते करतील, तर त्यामुळे ते जगतील.

  15. यहेज्केल ३३:२०सुमारे इ.स.पू. ५८७

    तरीही तुम्ही इस्राएली लोक म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु तुम्हा सर्वांच्या मार्गांनुसार मी तुमचा न्याय करेन.”

  16. यहेज्केल ३३:२१सुमारे इ.स.पू. ५८७

    बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, एक मनुष्य जो यरुशलेमहून निसटून आला होता, तो माझ्याकडे येऊन म्हणाला, “शहर पडले आहे!”

  17. यहेज्केल ३३:२२सुमारे इ.स.पू. ५८७

    तो मनुष्य आला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, याहवेहचा हात माझ्यावर होता आणि याहवेहने सकाळी तो मनुष्य माझ्याकडे येण्यापूर्वी माझे तोंड उघडले. म्हणून माझे तोंड उघडलेले होते आणि मी आणखी शांत नव्हतो.

  18. यहेज्केल ३३:२३सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  19. यहेज्केल ३३:२४सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, इस्राएलात ओसाडीमध्ये राहत असलेले लोक म्हणतात, ‘अब्राहाम केवळ एक मनुष्य होता, तरीही त्याला देश वतन मिळाला. परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत; खचितच हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला आहे.’

  20. यहेज्केल ३३:२५सुमारे इ.स.पू. ५८७

    म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मांसात रक्त असताच तुम्ही ते खाता आणि रक्तपात करत तुमच्या मूर्तींकडे बघता, तर मग तुम्ही या देशाचे वतन मिळविणार काय?

  21. यहेज्केल ३३:२६सुमारे इ.स.पू. ५८७

    तुम्ही तुमच्या तलवारीवर भिस्त ठेवता, तुम्ही अमंगळ कृत्ये करता, तुम्हातील प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करतो. तरी तुम्हाला देशाचे वतन मिळावे काय?’

  22. यहेज्केल ३३:२७सुमारे इ.स.पू. ५८७

    “त्यांना असे सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जीविताची शपथ, जे ओसाडीमध्ये उरलेले आहेत ते तलवारीने पडतील, जे शहराच्या बाहेर आहेत त्यांना जंगली जनावरांनी खावे म्हणून मी देऊन टाकेन, आणि जे गडात व गुहेत आहेत ते मरीने मरतील.

  23. यहेज्केल ३३:२८सुमारे इ.स.पू. ५८७

    मी या देशास वैराण करेन आणि तिच्या अहंकारी बळाचा शेवट होईल आणि इस्राएलचे डोंगर ओसाड पडतील व त्यातून कोणी पार जाणार नाही.

  24. यहेज्केल ३३:२९सुमारे इ.स.पू. ५८७

    त्यांनी केलेल्या अमंगळ कृत्यांमुळे जेव्हा मी हा देश ओसाड करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’

  25. यहेज्केल ३३:३०सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, तुझ्याविषयी म्हटले तर, तुझे लोक भिंतींजवळ व घरांच्या दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत व एकमेकांना म्हणत आहेत, ‘या आणि याहवेहकडून आलेला संदेश ऐका.’