मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ३१:६सुमारे इ.स.पू. ५८८

    आकाशातील सर्व पक्ष्यांनी त्याच्या फांद्यांमध्ये घरटी केली, जंगलातील प्राणी त्याच्या फांद्यांखाली आपल्या पिलांना जन्म देत असत; सर्व महान राष्ट्रे त्याच्या छायेत राहिली.

  2. यहेज्केल ३१:७सुमारे इ.स.पू. ५८८

    आपल्या पसरलेल्या फांद्या आणि वैभवाने तो सुंदर होता, कारण त्याची मुळे विपुल पाण्याकडे पोहोचली होती.

  3. यहेज्केल ३१:८सुमारे इ.स.पू. ५८८

    परमेश्वराच्या बागेतील देवदारू त्याच्याशी तुलना करू शकत नसे, गंधसरू त्याच्या फांद्यांची बरोबरी करू शकली नाही, ना अर्मोनवृक्षाची त्याच्या डहाळ्यांशी तुलना झाली; परमेश्वराच्या बागेतील कोणतेही वृक्ष त्याच्या सौंदर्याशी बरोबरी करू शकत नव्हते.

  4. यहेज्केल ३१:९सुमारे इ.स.पू. ५८८

    पुष्कळ फांद्यांनी मी त्याला सुंदर बनविले, परमेश्वराच्या बागेतील, एदेन बागेतील झाडे त्याचा हेवा करीत असत.

  5. यहेज्केल ३१:१०सुमारे इ.स.पू. ५८८

    “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह म्हणतात: मोठे देवदारू दाट झाडींच्या वर उंच झाले आणि त्याला त्याच्या उंचीचा गर्व झाला,

  6. यहेज्केल ३१:११सुमारे इ.स.पू. ५८८

    त्याच्या दुष्टतेनुसार त्याला वागवावे म्हणून मी त्याला राष्ट्रांच्या अधिपतींच्या हातात दिले. मी त्याला सोडून दिले आहे,

  7. यहेज्केल ३१:१२सुमारे इ.स.पू. ५८८

    आणि अधिक क्रूर विदेशी राष्ट्रांनी त्याचा छेद करून त्याला टाकून दिले. त्याच्या डहाळ्या डोंगरांवर व दर्‍यांमध्ये पडल्या; त्याच्या फांद्या देशाच्या सर्व झर्‍यांमध्ये तुटून पडल्या. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याच्या सावलीतून बाहेर निघाले आणि त्यांनी त्याला टाकून दिले.

  8. यहेज्केल ३१:१३सुमारे इ.स.पू. ५८८

    सर्व पक्षी पडलेल्या झाडावर वस्ती करू लागले आणि सर्व जंगली जनावरे त्याच्या फांद्यांमध्ये राहू लागले.

  9. यहेज्केल ३१:१४सुमारे इ.स.पू. ५८८

    म्हणून पाण्याजवळ असलेले कोणतेही झाड यापुढे दाट झाडींच्या वर गर्वाने उंच वाढणार नाही. भरपूर पाणी मिळालेल्या झाडांपैकी कोणतेही झाड तेवढ्या उंचीपर्यंत वाढणार नाही; ते मरणास नेमलेले आहेत, पृथ्वीच्या खाली, मेलेल्यांमध्ये, जे मृतलोकात उतरले आहेत त्या लोकांत त्यांची जागा आहे.

  10. यहेज्केल ३१:१५सुमारे इ.स.पू. ५८८

    “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी तो मृतलोकात आणला गेला, त्याच्यासाठी शोक करावा म्हणून खोल समुद्र मी झाकून टाकला; मी त्याचे प्रवाह थांबविले, आणि त्याचे विपुल पाणी मी रोखून ठेवले. त्याच्यामुळे मी लबानोनला दुःखित केले आणि रानातील प्रत्येक झाड वाळून गेले.

  11. यहेज्केल ३१:१६सुमारे इ.स.पू. ५८८

    गर्तेत जाणार्‍यांबरोबर त्याला मी अधोलोकात आणले, त्यात तो पडला तेव्हा त्याच्या आवाजाने राष्ट्रे थरथर कापले. तेव्हा एदेनातील सर्व झाडे, लबानोनातील सर्वोत्तम, पाण्याचा पुष्कळ पुरवठा असलेली झाडे, पृथ्वीच्या खाली सांत्वन पावले.

  12. यहेज्केल ३१:१७सुमारे इ.स.पू. ५८८

    मोठ्या देवदारूप्रमाणे ते सुद्धा मृतलोकात, राष्ट्रांच्या लोकांमध्ये त्याच्या सावलीखाली राहत होते त्या हत्यारबंदी लोकांबरोबर तलवारीने मारले गेले.

  13. यहेज्केल ३१:१८सुमारे इ.स.पू. ५८८

    “ ‘वैभव व ऐश्वर्यासंबंधात यापैकी एदेनातील कोणत्या झाडाची तुलना होऊ शकते? तरीही, तू सुद्धा एदेनातील झाडांबरोबर खाली पृथ्वीवर आणला जाशील; बेसुंती लोक, जे तलवारीने मारले गेले त्यांच्याबरोबर तू पडून राहशील. “ ‘हे फारोह व त्याच्या सैन्याबरोबर घडेल असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  14. यहेज्केल ३२:१सुमारे इ.स.पू. ५८७

    बाराव्या वर्षी, बाराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  15. यहेज्केल ३२:२सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहसाठी विलाप कर आणि त्याला सांग: “ ‘राष्ट्रांमध्ये तू सिंहासारखा आहेस; तू समुद्रातील श्वापदासारखा आहेस, तुझ्या झर्‍यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी घुसळले आणि झर्‍यात चिखल केलास.

  16. यहेज्केल ३२:३सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘लोकांच्या मोठ्या जमावाद्वारे माझे जाळे मी तुझ्यावर टाकेन, आणि ते तुला माझ्या जाळ्यात ओढून घेतील.

  17. यहेज्केल ३२:४सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुला जमिनीवर फेकून देईन आणि उघड्या मैदानात तुला टाकून देईन. आकाशातील सर्व पक्ष्यांना मी तुझ्यावर वसू देईन आणि जंगलातील सर्व प्राणी तुला लचके मारून खातील.

  18. यहेज्केल ३२:५सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुझे मांस डोंगरांवर पसरवीन आणि तुझ्या अवशेषाने खोरे भरेन.

  19. यहेज्केल ३२:६सुमारे इ.स.पू. ५८७

    तुझ्या वाहत्या रक्ताने अगदी डोंगरांपर्यंत मी देश भिजवेन आणि तुझ्या मांसाने ओहोळे भरतील.

  20. यहेज्केल ३२:७सुमारे इ.स.पू. ५८७

    जेव्हा मी तुझा नाश करेन, मी आकाशे झाकीन आणि त्यातील तारे अंधुक करेन; सूर्याला मी ढगांनी आच्छादेन आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही.

  21. यहेज्केल ३२:८सुमारे इ.स.पू. ५८७

    आकाशातील प्रत्येक चमकणारी ज्योत मी तुझ्यावर अंधार अशी करेन; मी तुझ्या देशावर अंधकार आणेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  22. यहेज्केल ३२:९सुमारे इ.स.पू. ५८७

    जेव्हा जे देश व जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत त्यात मी तुझा नाश करेन, तेव्हा मी पुष्कळ लोकांचे हृदय कष्टी करेन.

  23. यहेज्केल ३२:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    अनेक लोक तुझ्याकडे पाहून भयचकित होतील असे मी करेन, जेव्हा त्यांच्यासमोर मी माझी तलवार चालवेन तेव्हा त्यांचे राजे तुझ्यामुळे भयाने कापतील, तुझे पतन होईल त्या दिवशी सर्वजण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी भयभीत होतील.

  24. यहेज्केल ३२:११सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘बाबेलच्या राजाची तलवार तुझ्याविरुद्ध येईल.

  25. यहेज्केल ३२:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    राष्ट्रांतील जे सर्वात क्रूर अशा बलवान मनुष्यांच्या तलवारीने मी तुझे सैन्य पाडून टाकीन. इजिप्तचा अहंकार ते मोडून टाकतील, आणि तिच्या सर्व सैन्यांचा नाश होईल.