मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये, ते ओसाड पडतील, आणि त्यांची शहरे उद्ध्वस्त झालेल्या शहरांमध्ये पडतील.

  2. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे, मी जेव्हा इजिप्तला आग लावेन, तेव्हा तिला मदत करणार्‍यांचाही चुरा होईल.

  3. “ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे.

  4. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हातून मी इजिप्तच्या टोळीचा अंत करेन.

  5. तो व त्याचे सैन्य; जे राष्ट्रांमध्ये सर्वाधिक क्रूर आहेत; त्यांना इजिप्तचा नाश करण्यास आणले जाईल. ते इजिप्तविरुद्ध त्यांची तलवार उपसतील आणि वधलेल्यांनी देश भरून टाकतील.

  6. नाईल नदीचे पाणी मी आटवून टाकेन आणि तो देश दुष्ट राष्ट्रांना विकून टाकेन; विदेशी लोकांच्या हातून मी तो देश व त्यातील सर्वकाही ओसाड करेन. मी याहवेह हे बोललो आहे.

  7. “ ‘सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘मी मूर्तींचा नाश करेन आणि मेम्फीस येथील प्रतिमांचा मी शेवट करेन. इजिप्तमध्ये यापुढे राजकुमार नसतील, आणि संपूर्ण देशभर मी भय पसरवेन.

  8. इजिप्तचा पथरोस मी उजाड करेन, सोअन नगराला आग लावेन आणि नओ नगराला दंड देईन.

  9. सीन जो इजिप्तचा बळकट दुर्ग, यावर मी माझा कोप ओतेन, आणि नओचे सैन्य नष्ट करेन.

  10. मी इजिप्तला आग लावेन; सीन वेदनांनी तळमळेल. नओ वादळात उडून जाईल; मेम्फीस सातत्याने कष्टात राहील.

  11. ओन व पी-बेसेथचे तरुण पुरुष तलवारीने पडतील, आणि शहरे बंदिवासात जातील.

  12. तहपनहेसमध्ये दिवसा काळोख होईल जेव्हा मी इजिप्तचे जू मोडून टाकीन; तेव्हा तिच्या अहंकाराच्या सामर्थ्याचा शेवट करेन. ती ढगांनी झाकली जाईल, आणि तिची गावे बंदिवासात जातील.

  13. याप्रकारे मी इजिप्तवर दंड आणेन आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”

  14. यहेज्केल ३०:२०सुमारे इ.स.पू. ५८८

    अकराव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  15. यहेज्केल ३०:२१सुमारे इ.स.पू. ५८८

    “मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह याचा हात मी मोडला आहे. तो बरा व्हावा म्हणून त्याला पट्टी बांधली नाही किंवा तलवार धरता येईल इतकी शक्ती मिळावी म्हणून दोरीतही ठेवला नाही.

  16. यहेज्केल ३०:२२सुमारे इ.स.पू. ५८८

    म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात, मी इजिप्तचा राजा फारोह याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे हात म्हणजे जो अभंग आहे व जो मोडलेला आहे असे दोन्ही हात मोडेन, म्हणजे त्याच्या हातून तलवार गळून पडेल.

  17. यहेज्केल ३०:२३सुमारे इ.स.पू. ५८८

    मी इजिप्तच्या लोकांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि इतर देशांमध्ये त्यांना विखरून टाकेन.

  18. यहेज्केल ३०:२४सुमारे इ.स.पू. ५८८

    मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन आणि माझी तलवार त्याच्या हाती देईन पण फारोहचे हात मोडेन आणि तो बाबेलच्या राजासमोर मरणपंथास टेकलेल्या घायाळ मनुष्याप्रमाणे कण्हेल.

  19. यहेज्केल ३०:२५सुमारे इ.स.पू. ५८८

    मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन, परंतु फारोहचे हात लुळे पडतील. जेव्हा मी बाबेलच्या राजाच्या हाती माझी तलवार देईन आणि जेव्हा तो ती इजिप्तविरुद्ध चालवील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  20. यहेज्केल ३०:२६सुमारे इ.स.पू. ५८८

    इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये पांगवेन आणि इतर देशांमध्ये त्यांना विखरेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”

  21. यहेज्केल ३१:१सुमारे इ.स.पू. ५८८

    अकराव्या वर्षी, तिसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  22. यहेज्केल ३१:२सुमारे इ.स.पू. ५८८

    “मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व लोकांना सांग: “ ‘वैभवाबाबतीत तुझ्याशी कोणाची तुलना होऊ शकते?

  23. यहेज्केल ३१:३सुमारे इ.स.पू. ५८८

    अश्शूरला पाहा, लबानोनमधील एक गंधसरू असलेला, ज्याच्या सुंदर फांद्या जंगलास झाकून देत असत; तो सर्वात उंच वाढून, त्याचा शेंडा दाट झाडींच्या वर जातो.

  24. यहेज्केल ३१:४सुमारे इ.स.पू. ५८८

    पाण्याने त्याला पोषण दिले, खोल झर्‍यांनी त्याला उंच वाढवले; त्याचे प्रवाह त्याच्या सभोवार वाहिले आणि त्याच्या धारा रानातील सर्व झाडांपर्यंत पाठविल्या.

  25. यहेज्केल ३१:५सुमारे इ.स.पू. ५८८

    म्हणून रानातील इतर सर्व झाडांपेक्षा; ते उंच वाढले. विपुल पाण्यामुळे त्याच्या डहाळ्या पसरल्या व त्याच्या फांद्या लांब वाढल्या.