मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ३२:१३सुमारे इ.स.पू. ५८७

    पाण्याच्या प्रवाहांजवळ असणार्‍या तिच्या सर्व जनावरांचा मी नाश करेन. ती पुन्हा कोणत्याही मनुष्याच्या पायांनी तुडविली जाणार नाही ना पशूंच्या खुरांनी तिथे चिखल होणार.

  2. यहेज्केल ३२:१४सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा मी तिचे पाणी स्थिर करेन आणि तिचे प्रवाह तेलाप्रमाणे वाहतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  3. यहेज्केल ३२:१५सुमारे इ.स.पू. ५८७

    जेव्हा मी इजिप्त ओसाड करेन आणि देशात असलेले सर्वकाही काढून घेईन, जेव्हा तिथे वसत असलेल्या सर्वांचा मी नाश करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’

  4. यहेज्केल ३२:१६सुमारे इ.स.पू. ५८७

    “तिच्यासाठी जे विलापगीत ते गातील ते हेच. राष्ट्रांच्या कन्या हे गातील; इजिप्त व तिच्या सर्व सैन्यासाठी त्या हे गातील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  5. यहेज्केल ३२:१७सुमारे इ.स.पू. ५८७

    बाराव्या वर्षी, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  6. यहेज्केल ३२:१८सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, इजिप्तच्या सैन्यासाठी विलाप कर आणि तिला व शक्तिशाली राष्ट्रांच्या कन्यांना खाली गर्तेत जाणार्‍यांबरोबर पृथ्वीच्या खाली हवाली कर.

  7. यहेज्केल ३२:१९सुमारे इ.स.पू. ५८७

    त्यांना सांग, ‘इतरांपेक्षा तू अधिक कृपा पावलेली आहेस काय? तर खाली जा आणि बेसुंत्यांबरोबर जाऊन पड.’

  8. यहेज्केल ३२:२०सुमारे इ.स.पू. ५८७

    जे तलवारीने पडले त्यांच्याबरोबर ते पडतील. तलवार उगारलेली आहे; तिच्या सर्व समूहास ओढून न्या.

  9. यहेज्केल ३२:२१सुमारे इ.स.पू. ५८७

    मृतलोकातून इजिप्त व तिचे सहयोगी याबद्दल बलवान पुढारी म्हणतील, ‘ते खाली आले आणि तलवारीने पडलेल्या बेसुंतीबरोबर ते पडले आहेत.’

  10. यहेज्केल ३२:२२सुमारे इ.स.पू. ५८७

    “अश्शूर तिच्या संपूर्ण सैन्याबरोबर आहे; तिच्यातील वधलेले, जे तलवारीने पडले आहेत त्यांच्या कबरा तिच्याभोवती आहेत.

  11. यहेज्केल ३२:२३सुमारे इ.स.पू. ५८७

    त्यांच्या कबरा खोल गर्तेत आहेत आणि तिचे सैन्य तिच्याच कबरेभोवती पडलेले आहेत. जिवंताच्या भूमीवर ज्यांनी आतंक पसरविला होता त्यांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत.

  12. यहेज्केल ३२:२४सुमारे इ.स.पू. ५८७

    “एलाम तिथे आहे आणि तिच्याबरोबर तिचे मोठे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. त्या सर्वांचा वध झाला आहे, ते तलवारीने पडले आहेत. ज्या सर्वांनी जिवंताच्या भूमीवर आतंक पसरविला ते पृथ्वीच्या खाली बेसुंत्यांबरोबर अधोलोकात गेले आहेत. जे खाली गर्तेत गेले आहेत, त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत.

  13. यहेज्केल ३२:२५सुमारे इ.स.पू. ५८७

    वधलेल्यांबरोबर तिचा बिछाना केलेला आहे आणि तिचे सैन्य तिच्या कबरेभोवती आहेत. ज्यांना तलवारीने वधले आहे, ते सर्व बेसुंती आहेत, कारण जिवंतांच्या भूमीवर त्यांचा आतंक पसरला होता. जे खाली गर्तेत गेले आहेत त्यांच्याबरोबर ते लज्जित झाले आहेत; वधलेल्यांबरोबर त्यांना ठेवले आहे.

  14. यहेज्केल ३२:२६सुमारे इ.स.पू. ५८७

    “मेशेख व तूबाल तिथे आहेत आणि त्यांचे सैन्य त्यांच्याभोवती आहेत. जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला ते सर्व बेसुंती आहेत, म्हणून ते तलवारीने वधले आहेत.

  15. यहेज्केल ३२:२७सुमारे इ.स.पू. ५८७

    परंतु त्यांच्या आधी मेलेल्या दुष्ट पुरातन बेसुंती योद्ध्यांबरोबर ते निजलेले नाहीत, जे त्यांच्या युद्धाच्या शस्त्रांसह खाली अधोलोकात गेले; ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली व त्यांच्या ढाली त्यांच्या हाडांवर आहेत; या योद्ध्यांनी सुद्धा जिवंतांच्या भूमीवर आतंक पसरविला होता.

  16. यहेज्केल ३२:२८सुमारे इ.स.पू. ५८७

    “हे फारोह, तू सुद्धा मोडला जाशील व जे तलवारीने वधले आहे, त्या बेसुंत्यांबरोबर जाऊन पडशील.

  17. यहेज्केल ३२:२९सुमारे इ.स.पू. ५८७

    “एदोम, तिचे राजे व तिचे सर्व राजपुत्र तिथे आहेत, ते बलवान असूनही, जे तलवारीने वधले आहेत ते बेसुंती लोकांबरोबर व जे खाली गर्तेत जातात त्यांच्याबरोबर पडले आहेत.

  18. यहेज्केल ३२:३०सुमारे इ.स.पू. ५८७

    “उत्तरेकडील सर्व राजपुत्र आणि सर्व सीदोनी लोक तिथे आहेत; त्यांच्या बलाने जरी त्यांनी आतंक पसरविला तरीही ते वधलेल्यांबरोबर अप्रतिष्ठेने खाली गेले. जे तलवारीने वधले आहेत त्यांच्याबरोबर ते बेसुंती पडले आणि गर्तेत गेलेल्यांप्रमाणे ते लज्जित झाले आहेत.

  19. यहेज्केल ३२:३१सुमारे इ.स.पू. ५८७

    “फारोह व त्याचे सर्व सैन्य त्यांना पाहतील आणि तलवारीने वधलेल्या त्याच्या सर्व सैन्यांसाठी तो सांत्वन पावेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  20. यहेज्केल ३२:३२सुमारे इ.स.पू. ५८७

    जरी जिवंताच्या भूमीवर फारोहचे भय मी पसरविले होते, तरीही फारोह व त्याचे सर्व सैन्य जे लोक तलवारीने वधलेले, सुंता न झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”

  21. यहेज्केल ३३:१सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  22. यहेज्केल ३३:२सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, तुझ्या लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा मी एका देशावर तलवार आणतो, तेव्हा त्या देशाचे लोक त्यांच्या लोकांतील एकाची निवड करून त्याची पहारेकरी म्हणून नेमणूक करतात,

  23. यहेज्केल ३३:३सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि ती तलवार देशावर येत आहे असे पाहताच लोकांना सावध करण्यासाठी तो कर्णा वाजवितो,

  24. यहेज्केल ३३:४सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा जर कोणी कर्ण्याचा आवाज ऐकूनही इशार्‍याकडे लक्ष देत नाही आणि तलवार येऊन त्यांचा जीव घेते, तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल.

  25. यहेज्केल ३३:५सुमारे इ.स.पू. ५८७

    जरी त्यांनी कर्ण्यांचा आवाज ऐकला तरी इशार्‍याकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल. जर ते सावध झाले असते, तर त्यांनी स्वतःस वाचविले असते.