मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ३४:२३सुमारे इ.स.पू. ५८७

    मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल.

  2. यहेज्केल ३४:२४सुमारे इ.स.पू. ५८७

    मी याहवेह त्यांचा परमेश्वर होईन आणि माझा सेवक दावीद त्यांच्यात राजपुत्र असेल. मी याहवेह हे बोललो आहे.

  3. यहेज्केल ३४:२५सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन आणि क्रूर श्वापदांपासून देशाची सुटका करेन म्हणजे ते अरण्यात राहू शकतील आणि जंगलात सुरक्षित झोपतील.

  4. यहेज्केल ३४:२६सुमारे इ.स.पू. ५८७

    मी त्यांना आणि माझ्या डोंगराभोवती असलेल्या ठिकाणांना आशीर्वाद असे करेन. मी नेमलेल्या ऋतूत पाऊस पाडेन; आशीर्वादाची वृष्टी असेल.

  5. यहेज्केल ३४:२७सुमारे इ.स.पू. ५८७

    झाडे त्यांची फळे देतील आणि भूमी तिचे पीक उपजवेल; लोक त्यांच्या देशात सुरक्षित राहतील. जेव्हा मी त्यांच्या जोखडाची बंधने तोडेन आणि ज्यांनी त्यांना गुलाम करून घेतले, त्यांच्या हातून त्यांना सोडवेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  6. यहेज्केल ३४:२८सुमारे इ.स.पू. ५८७

    ते यापुढे राष्ट्रांची लूट होणार नाहीत व हिंस्र पशू त्यांना फाडून खाणार नाहीत. ते सुरक्षिततेत राहतील आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही.

  7. यहेज्केल ३४:२९सुमारे इ.स.पू. ५८७

    आपल्या पिकासाठी प्रसिद्ध असणारा देश मी त्यांना देईन आणि यापुढे ते देशात दुष्काळाने पीडित होणार नाहीत किंवा राष्ट्रांची थट्टा त्यांना सोसावी लागणार नाही.

  8. यहेज्केल ३४:३०सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे आणि ते इस्राएली माझे लोक आहेत, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  9. यहेज्केल ३४:३१सुमारे इ.स.पू. ५८७

    तुम्ही माझी मेंढरे आहात, तुम्ही मानव माझ्या कुरणातील मेंढरे आहात आणि मी तुमचा परमेश्वर आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  10. यहेज्केल ३५:१सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  11. यहेज्केल ३५:२सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, सेईर पर्वताकडे मुख करून त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर

  12. यहेज्केल ३५:३सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि मी तुझ्याविरुद्ध माझा हात उगारेन आणि तुला ओसाड करेन.

  13. यहेज्केल ३५:४सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुझी नगरे निष्फळ करेन आणि तू उजाड होशील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  14. यहेज्केल ३५:५सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘कारण तुझ्याठायी तू निरंतर वैर ठेवले आणि संकटाच्या काळी, जेव्हा त्यांच्या शिक्षाकाळ कळसाला जाऊन पोहोचला, तेव्हा तू इस्राएली लोकांवर तलवार चालविली,

  15. यहेज्केल ३५:६सुमारे इ.स.पू. ५८७

    म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, मी तुला रक्तपाताच्या स्वाधीन करेन आणि रक्तपात तुमचा पाठलाग करेल. कारण तू रक्तपाताचा द्वेष केला नाही, म्हणून रक्तपात तुझा पाठलाग करेल.

  16. यहेज्केल ३५:७सुमारे इ.स.पू. ५८७

    मी सेईर पर्वताला ओसाड करेन आणि जे त्यावरून येणे जाणे करतात त्यांचा मी नाश करेन.

  17. यहेज्केल ३५:८सुमारे इ.स.पू. ५८७

    वधलेल्यांनी मी तुमचे पर्वत भरून टाकीन; जे तलवारीने मारले जातील ते तुझ्या टेकड्यांवर आणि तुझ्या खोर्‍यात आणि तुझ्या ओहोळात पडतील.

  18. यहेज्केल ३५:९सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुला कायमचे ओसाड करेन; तुझ्या नगरांत पुन्हा कोणीही वसणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  19. यहेज्केल ३५:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘कारण मी याहवेह तिथे होतो तरीही तुम्ही म्हटले, “हे दोन देश व राष्ट्रे आमची होतील आणि आम्ही त्याचे वतन पावू,”

  20. यहेज्केल ३५:११सुमारे इ.स.पू. ५८७

    म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, त्यांच्याप्रीत्यर्थ तुम्ही जो राग व हेवा प्रकट केला त्यानुसार मी तुमच्याशी वागेन आणि जेव्हा मी तुमचा न्याय करेन, तेव्हा मी स्वतःला त्यांच्यामध्ये प्रकट करेन.

  21. यहेज्केल ३५:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा तुम्ही जाणाल मी याहवेहने त्या तिरस्करणीय गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुम्ही इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध उच्चारल्या. तुम्ही म्हटले, “ते उजाड पडले आहेत आणि आम्ही गिळून टाकावे म्हणून त्यांना आमच्या हाती दिले आहे.”

  22. यहेज्केल ३५:१३सुमारे इ.स.पू. ५८७

    तुम्ही माझ्याविरुद्ध फुशारकी मारली आणि संयम न ठेवता माझ्याविरुद्ध बोलला आणि ते मी ऐकले.

  23. यहेज्केल ३५:१४सुमारे इ.स.पू. ५८७

    सार्वभौम याहवेह असे म्हणतात: सर्व पृथ्वी हर्ष करीत असताना मी तुम्हाला उजाड करेन.

  24. यहेज्केल ३५:१५सुमारे इ.स.पू. ५८७

    कारण जेव्हा इस्राएलचे वतन उजाड पडत होते तेव्हा तू हर्ष केला, त्याचप्रमाणे मी तुला वागवेन. हे सेईर पर्वता तू व संपूर्ण एदोम उजाड पडेल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  25. यहेज्केल ३६:१सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांना भविष्यवाणी करून सांग, ‘इस्राएलच्या पर्वतांनो, याहवेहचे वचन ऐका.