मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ३६:२७सुमारे इ.स.पू. ५८७

    आणि मी माझा आत्मा तुमच्यामध्ये घालेन, तुम्ही माझे विधी आचारावे व माझे नियम काळजीपूर्वक पाळावे म्हणून मी तुम्हाला चालवेन.

  2. यहेज्केल ३६:२८सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा तुमच्या पूर्वजांना जो देश मी देऊ केला त्यात तुम्ही वस्ती कराल; तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा परमेश्वर होईन.

  3. यहेज्केल ३६:२९सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून मुक्त करेन. मी धान्यास आज्ञा देईन आणि ते अनेकपट करेन आणि तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही.

  4. यहेज्केल ३६:३०सुमारे इ.स.पू. ५८७

    तुमच्या झाडांची फळे व तुमच्या शेतातील पीक मी वाढवेन, यासाठी की तुम्ही दुष्काळामुळे राष्ट्रांमध्ये आणखी अपमान सहन करणार नाही.

  5. यहेज्केल ३६:३१सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा तुम्हाला तुमचे कुमार्ग आणि दुष्कृत्यांची आठवण होईल आणि तुमच्या पापांमुळे व अमंगळ कामांमुळे तुम्हाला तुमचीच किळस वाटेल.

  6. यहेज्केल ३६:३२सुमारे इ.स.पू. ५८७

    माझी इच्छा आहे तुम्ही हे जाणावे की हे मी तुमच्यासाठी करीत नाही, सार्वभौम याहवेह जाहीर करतात की अहो इस्राएली लोकांनो तुम्ही आपल्या वर्तनामुळे लाजिरवाणी व कलंकित असावे!

  7. यहेज्केल ३६:३३सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध करेन, मी तुमची नगरे पुनर्स्थापित करेन आणि उद्ध्वस्त झालेल्याची पुनर्बांधणी करेन.

  8. यहेज्केल ३६:३४सुमारे इ.स.पू. ५८७

    येजा करणार्‍यांच्या नजरेसमोर उजाडलेली भूमी वैराण पडण्याऐवजी तिची मशागत होईल.

  9. यहेज्केल ३६:३५सुमारे इ.स.पू. ५८७

    ते म्हणतील, “ही भूमी जी ओसाड पडली होती ती एदेन बागेसारखी झाली आहे; शहरे जी उद्ध्वस्त, उजाड व ओसाड पडली होती, ती आता तटबंदीची होऊन त्यात वस्ती झाली आहे.”

  10. यहेज्केल ३६:३६सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा तुमच्या सभोवती उरलेली राष्ट्रे जाणतील की मी याहवेहने उजाड झालेले पुन्हा बांधले आहे आणि ओसाड पडलेले होते त्याची पुन्हा लागवड केली आहे. मी याहवेह हे बोललो आहे, आणि ते मी करणारच.’

  11. यहेज्केल ३६:३७सुमारे इ.स.पू. ५८७

    “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एकदा पुन्हा मी इस्राएलची विनंती मान्य करेन आणि त्यांच्यासाठी हे करेन: त्यांचे लोक मी मेंढरांसारखे असंख्य करेन,

  12. यहेज्केल ३६:३८सुमारे इ.स.पू. ५८७

    तिच्या नेमलेल्या सणांच्या वेळी यरुशलेममध्ये अर्पणासाठी लागतील तेवढे असंख्य कळप मी करेन. म्हणजे पडीक असलेली शहरे लोकांच्या कळपांनी भरतील. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”

  13. यहेज्केल ३७:१सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला याहवेहच्या आत्म्याच्या द्वारे बाहेर आणले आणि खोर्‍याच्या मधोमध ठेवले; ते हाडांनी भरलेले होते.

  14. यहेज्केल ३७:२सुमारे इ.स.पू. ५८७

    त्याने मला त्यातून चहूकडून फिरविले आणि मी पाहिले की खोर्‍याच्या भूमीवर पुष्कळ हाडे होती, ती हाडे तर शुष्क होती.

  15. यहेज्केल ३७:३सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेहने मला विचारले, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय?” मी म्हणालो, “सार्वभौम याहवेह, ते तर केवळ तुम्हीच जाणता.”

  16. यहेज्केल ३७:४सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा याहवेहने मला म्हटले, “या हाडांना भविष्यवाणी करून त्यांना सांग, ‘शुष्क हाडांनो, याहवेहचे वचन ऐका!

  17. यहेज्केल ३७:५सुमारे इ.स.पू. ५८७

    या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल.

  18. यहेज्केल ३७:६सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुम्हावर स्नायू लावेन आणि तुम्हावर मांस चढवेन आणि तुम्हाला कातडीने आच्छादेन; मी तुम्हामध्ये श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  19. यहेज्केल ३७:७सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. आणि मी भविष्यवाणी करीत असता, मोठा आवाज, खडखडाट झाला, तेव्हा एक हाड दुसऱ्या हाडाशी, अशी हाडे एकत्र जडली.

  20. यहेज्केल ३७:८सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा मी पाहिले, स्नायू आणि मांस त्यांच्यावर आले आणि कातडीने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास नव्हता.

  21. यहेज्केल ३७:९सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा याहवेहने मला म्हटले, “श्वासाला भविष्य करून सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि त्याला सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे श्वासा, चारही बाजूंनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते जिवंत होतील.’ ”

  22. यहेज्केल ३७:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेहने मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली आणि श्वास त्यांच्यात आला; ते जिवंत झाले आणि एक मोठे सैन्य त्यांच्या पायांवर उभे राहिले.

  23. यहेज्केल ३७:११सुमारे इ.स.पू. ५८७

    तेव्हा याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे इस्राएली लोक आहेत. ते म्हणतात, ‘आमची हाडे शुष्क झाली आहेत आणि आमची आशा नाहीशी झाली आहे; आम्ही नाश पावलो आहोत.’

  24. यहेज्केल ३७:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    यास्तव भविष्यवाणी कर आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे; मी तुम्हाला इस्राएल देशात परत आणेन.

  25. यहेज्केल ३७:१३सुमारे इ.स.पू. ५८७

    जेव्हा मी तुमच्या कबरा उघडेन आणि त्यातून तुम्हाला बाहेर आणेन तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.