मुख्य मजकुरावर जा

circa 605–538 BC

The Babylonian Exile

Jerusalem falls and the temple burns; Ezekiel and Daniel minister among the exiles as Lamentations mourns the city's ruin.

1,784 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यहेज्केल ३८:११सुमारे इ.स.पू. ५८७

    तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात.

  2. यहेज्केल ३८:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    मी त्यांना लुटेन व लुबाडून घेईन आणि माझा हात पुन्हा स्थायिक झालेल्या ओसाडीवर व राष्ट्रांतून एकत्र केलेले लोक, देशाच्या मधोमध राहणारी उत्तम गुरे आणि संपत्ती यावर पडेल.”

  3. यहेज्केल ३८:१३सुमारे इ.स.पू. ५८७

    शबा, ददानचे लोक आणि तार्शीशचे व्यापारी व त्यांची सर्व गावे तुला म्हणतील, “तू लुटायला आला आहे काय? लूट घेण्यास, सोने व चांदी वाहून नेण्यास, गुरे व संपत्ती घेऊन नेण्यास व पुष्कळ लूट ताब्यात घेण्यासाठी तुझे पुष्कळ लोक तू एकत्र केले काय?” ’

  4. यहेज्केल ३८:१४सुमारे इ.स.पू. ५८७

    “यास्तव, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि गोगला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: त्या दिवशी, जेव्हा माझे इस्राएली लोक सुरक्षिततेत राहात आहेत, त्यांची नोंद तू घेणार नाही काय?

  5. यहेज्केल ३८:१५सुमारे इ.स.पू. ५८७

    उत्तरेकडील तुझ्या स्थानातून तू येशील, तू आणि तुझ्याबरोबर पुष्कळ राष्ट्रे, त्यातील प्रत्येक घोड्यावर स्वार असलेले, मोठे दळ, मोठे सैन्य असेल.

  6. यहेज्केल ३८:१६सुमारे इ.स.पू. ५८७

    मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्‍या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.

  7. यहेज्केल ३८:१७सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तूच तो आहे, ज्याबद्दल मी पुरातन काळी माझ्या सेवकांद्वारे व इस्राएलच्या संदेष्ट्यांद्वारे बोललो होतो. त्यावेळी त्यांनी पुष्कळ वर्षे भविष्यवाणी केली की मी तुला त्यांच्याविरुद्ध आणेन.

  8. यहेज्केल ३८:१८सुमारे इ.स.पू. ५८७

    त्या दिवशी असे होईल: जेव्हा गोग इस्राएल देशावर हल्ला करेल, तेव्हा माझा तापलेला क्रोध भडकेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  9. यहेज्केल ३८:१९सुमारे इ.स.पू. ५८७

    माझी ईर्षा व पेटलेल्या संतापाने मी जाहीर करतो की, त्यावेळी इस्राएल देशात मोठा भूकंप येईल.

  10. यहेज्केल ३८:२०सुमारे इ.स.पू. ५८७

    समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, रानातील पशू, भूमीवर सरपटणारा प्रत्येक प्राणी आणि पृथ्वीच्या पाठीवरील सर्व लोक माझ्या समक्षतेत थरथर कापतील. पर्वत कोसळतील, कडे खचतील आणि प्रत्येक भिंत जमिनीवर पडेल.

  11. यहेज्केल ३८:२१सुमारे इ.स.पू. ५८७

    मी गोगविरुद्ध माझ्या सर्व पर्वतांवर तलवार बोलवेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. प्रत्येकाची तलवार आपआपल्या भावाविरुद्ध चालेल.

  12. यहेज्केल ३८:२२सुमारे इ.स.पू. ५८७

    मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन.

  13. यहेज्केल ३८:२३सुमारे इ.स.पू. ५८७

    अशाप्रकारे मी माझी महानता व पवित्रता दाखवेन, आणि अनेक राष्ट्रांदेखत मी स्वतःस प्रकट करेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’

  14. यहेज्केल ३९:१सुमारे इ.स.पू. ५८७

    “मानवपुत्रा, गोगविरुद्ध भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मेशेख आणि तूबालच्या मुख्य राजपुत्रा रोष, मी तुझ्याविरुद्ध आहे.

  15. यहेज्केल ३९:२सुमारे इ.स.पू. ५८७

    मी तुला उपडे पाडून तुला ओढत नेईन. मी तुला दूर उत्तरेकडून आणेन आणि इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध पाठवेन.

  16. यहेज्केल ३९:३सुमारे इ.स.पू. ५८७

    मग मी तुझ्या डाव्या हातातला धनुष्य मारीन आणि तुझ्या उजव्या हातातील बाण खाली पाडीन.

  17. यहेज्केल ३९:४सुमारे इ.स.पू. ५८७

    तू इस्राएलच्या पर्वतांवर पडशील, तू व तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे सुद्धा पडतील. मी तुम्हाला सर्वप्रकारच्या मांसाहारी हिंस्र पक्ष्यांना व हिंस्र पशूंना भक्ष म्हणून देईन.

  18. यहेज्केल ३९:५सुमारे इ.स.पू. ५८७

    तू मोकळ्या रानात पडशील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  19. यहेज्केल ३९:६सुमारे इ.स.पू. ५८७

    मी मागोगवर आणि समुद्रकिनार्‍यावर सुरक्षितपणे राहणार्‍या लोकांवर अग्नी पाठवेन आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  20. यहेज्केल ३९:७सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘माझ्या इस्राएली लोकांमध्ये मी माझे पवित्र नाव प्रकट करेन. यापुढे मी माझ्या पवित्र नावाला कलंकित होऊ देणार नाही आणि राष्ट्रे जाणतील की इस्राएलातील पवित्र मीच याहवेह आहे.

  21. यहेज्केल ३९:८सुमारे इ.स.पू. ५८७

    हे येत आहे! हे खचितच घडेल, हा तोच दिवस आहे ज्याबद्दल मी बोललो होतो, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  22. यहेज्केल ३९:९सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘तेव्हा जे इस्राएलच्या नगरात राहतात ते बाहेर जातील आणि इंधन म्हणून आपली हत्यारे; म्हणजेच लहान व मोठ्या ढाली, धनुष्य व बाण, युद्धाच्या बरच्या व भाले जाळतील. ते सात वर्षे इंधनासाठी त्यांचा उपयोग करतील.

  23. यहेज्केल ३९:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    रानातून लाकडे गोळा करण्याची किंवा जंगलातील झाडे तोडण्याची त्यांना गरज नसणार, कारण ते हत्यारांचा उपयोग इंधन म्हणून करतील आणि ज्यांनी त्यांची लूट घेतली त्यांना ते लुटतील आणि ज्यांनी त्यांना लुबाडले, त्यांना ते लुबाडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  24. यहेज्केल ३९:११सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘त्या दिवशी मी गोगला इस्राएलमध्ये मृतकांना पुरण्याचे एक ठिकाण देईन, जे समुद्राच्या पूर्वेकडे प्रवास करणार्‍यांच्या खोर्‍यामध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांची वाट अडविली जाईल, कारण गोग आणि त्याचे सर्व सैन्य तिथे पुरले जातील. म्हणून त्याला हामोन-गोगचे खोरे म्हटले जाईल.

  25. यहेज्केल ३९:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    “ ‘देश शुद्ध करण्यासाठी इस्राएली लोक त्या मृतकांना सात महिने पूरत राहतील.