मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तीता ३:८सुमारे इ.स. ६५

    मी तुला सांगितलेल्या या सर्वगोष्टी सत्य आहेत आणि या गोष्टींवर विशेष भर देऊन तू त्या सांगाव्या अशी माझी इच्छा आहे, यासाठी की ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी सत्कार्य करण्याविषयी काळजी घ्यावी. या गोष्टी उत्कृष्ट असून प्रत्येकाला लाभदायक आहेत.

  2. तीता ३:९सुमारे इ.स. ६५

    परंतु नियमशास्त्राबद्दल मूर्खवाद, वंशावळ्या व वादविवाद आणि भांडणे टाळा, कारण हे निरर्थक आणि निरुपयोगी आहे.

  3. तीता ३:१०सुमारे इ.स. ६५

    तुमच्यामध्ये कोणी तट पाडत असेल, तर त्याला पहिला व दुसरा इशारा दिला जावा, नंतर त्याच्याशी संबंध ठेवू नये.

  4. तीता ३:११सुमारे इ.स. ६५

    असा मनुष्य बिघडलेला आहे आणि त्याने स्वतःला दोषी ठरविले असून तो पाप करतो, याची तू खात्री बाळग.

  5. तीता ३:१२सुमारे इ.स. ६५

    अर्तमाला किंवा तुखिकाला मी तुझ्याकडे पाठविल्यानंतर शक्य तितक्या लवकर तू मला निकोपोलीस येथे येऊन भेट, कारण मी हिवाळ्यात तिथेच राहण्याचा निश्चय केला आहे.

  6. तीता ३:१३सुमारे इ.स. ६५

    जेनस जो विधि-विशेषज्ञ व अपुल्लोस यांच्या प्रवासासाठी तुमच्याकडून शक्य होईल ती सर्व मदत करा आणि त्यांना लागणार्‍या गरजेच्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत याची काळजी घ्या.

  7. तीता ३:१४सुमारे इ.स. ६५

    कारण गरजवंतांना मदत करण्यास आपल्या लोकांनी शिकले पाहिजे, म्हणजे ते आपल्या दररोजच्या गरजा भागवू शकतील व निष्फळ जीवन जगणार नाही.

  8. तीता ३:१५सुमारे इ.स. ६५

    माझ्याबरोबर असलेला प्रत्येकजण तुला अभिवादन पाठवितो. जे विश्वासात आमच्यावर प्रेम करतात त्यांना सलाम सांगा. तुम्हा सर्वांवर कृपा असो.

  9. फिलेमोन १:१सुमारे इ.स. ६४

    ख्रिस्त येशूंचा बंदिवान पौल आणि आपला बंधू तीमथ्य,

  10. फिलेमोन १:२सुमारे इ.स. ६४

    आमची बहीण अप्फिया आणि आमचा सहसैनिक अर्खिप—आणि जी मंडळी तुमच्या घरात एकत्र भेटतात त्यांना:

  11. फिलेमोन १:३सुमारे इ.स. ६४

    परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.

  12. फिलेमोन १:४सुमारे इ.स. ६४

    मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो,

  13. फिलेमोन १:५सुमारे इ.स. ६४

    कारण त्यांच्या सर्व पवित्र लोकांवरील तुझी प्रीती आणि प्रभू येशूंवरील तुझा विश्वास याविषयी मी ऐकले आहे.

  14. फिलेमोन १:६सुमारे इ.स. ६४

    तुला ख्रिस्तात प्राप्त होणार्‍या सर्व चांगल्या गोष्टींचे सखोल ज्ञान होण्यासाठी तुझी आमच्याबरोबर विश्वासामध्ये असलेली भागीदारी कार्यरत व्हावी अशी मी प्रार्थना करतो.

  15. फिलेमोन १:७सुमारे इ.स. ६४

    तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे, कारण बंधू, तू प्रभूच्या लोकांची अंतःकरणे ताजीतवानी केली आहेस.

  16. फिलेमोन १:८सुमारे इ.स. ६४

    यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे,

  17. फिलेमोन १:९सुमारे इ.स. ६४

    तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो.

  18. फिलेमोन १:१०सुमारे इ.स. ६४

    माझी विनंती माझा पुत्र अनेसिम जो मी बंधनात असताना माझा आत्मिक पुत्र झाला त्याच्या संदर्भात आहे.

  19. फिलेमोन १:११सुमारे इ.स. ६४

    तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे.

  20. फिलेमोन १:१२सुमारे इ.स. ६४

    तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे.

  21. फिलेमोन १:१३सुमारे इ.स. ६४

    शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते.

  22. फिलेमोन १:१४सुमारे इ.स. ६४

    परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे.

  23. फिलेमोन १:१५सुमारे इ.स. ६४

    कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल, जेणेकरून तू त्याला सर्वकाळासाठी प्राप्त करून घ्यावे.

  24. फिलेमोन १:१६सुमारे इ.स. ६४

    परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.

  25. फिलेमोन १:१७सुमारे इ.स. ६४

    यास्तव जर तू मला भागीदार समजत असशील, तर जसे तू माझे स्वागत केले असते, तसेच त्याचे कर.