मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 तीमथ्य ४:११सुमारे इ.स. ६६

    केवळ लूकच माझ्याबरोबर आहे. येताना मार्काला घेऊन ये, कारण माझ्या सेवेत तो उपयोगी आहे.

  2. 2 तीमथ्य ४:१२सुमारे इ.स. ६६

    मीच तुखिकास इफिसास पाठविले

  3. 2 तीमथ्य ४:१३सुमारे इ.स. ६६

    माझा अंगरखा जो त्रोवासात बंधू कार्पूसजवळ राहिला आहे, तो तू येतांना घेऊन ये, सोबत माझी पुस्तके व विशेषकरून चर्मपत्रेही आण.

  4. 2 तीमथ्य ४:१४सुमारे इ.स. ६६

    आलेक्सांद्र तांबटाने माझे फार वाईट केले. प्रभू त्याला त्याच्या कामाचे योग्य फळ देतील,

  5. 2 तीमथ्य ४:१५सुमारे इ.स. ६६

    परंतु तू पण त्याच्यापासून सावध राहा; कारण आम्ही जे बोललो, त्या सर्व बोलण्यास त्याने जोरदार विरोध केला.

  6. 2 तीमथ्य ४:१६सुमारे इ.स. ६६

    माझ्या पहिल्या सुनावणीच्या वेळी कोणीही माझ्याबरोबर नव्हते, प्रत्येकाने माझा त्याग केला; याचा दोष त्यांच्यावर येऊ नये.

  7. 2 तीमथ्य ४:१७सुमारे इ.स. ६६

    परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले.

  8. 2 तीमथ्य ४:१८सुमारे इ.स. ६६

    प्रभू सर्व वाईटापासून मला सोडवतील आणि मला त्यांच्या स्वर्गीय राज्यात सुरक्षित आणतील. परमेश्वराला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

  9. 2 तीमथ्य ४:१९सुमारे इ.स. ६६

    प्रिस्किल्ला, अक्विला आणि अनेसिफराच्या कुटुंबीयांनी माझा सलाम सांग.

  10. 2 तीमथ्य ४:२०सुमारे इ.स. ६६

    एरास्त करिंथमध्येच राहिला आणि त्रोफिम आजारी झाला. त्याला मिलेता येथेच ठेऊन मी आलो.

  11. 2 तीमथ्य ४:२१सुमारे इ.स. ६६

    हिवाळ्यापूर्वी इकडे येण्याचा प्रयत्न कर. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया आणि इतर सर्वजण तुला शुभेच्छा पाठवितात.

  12. 2 तीमथ्य ४:२२सुमारे इ.स. ६६

    प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हा सर्वांवर कृपा असो.

  13. तीता १:१सुमारे इ.स. ६५

    परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी आणि त्यांना भक्तीच्या मार्गावर नेणार्‍या सत्याच्या ज्ञानासाठी नेमलेला परमेश्वराचा दास व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याच्याकडून,

  14. तीता १:२सुमारे इ.स. ६५

    परमेश्वर जे कधीही खोटे बोलत नाहीत, त्यांनी सार्वकालिक जीवनाच्या आशेचे अभिवचन सुरवातीच्या काळाच्या आधीपासून दिले

  15. तीता १:३सुमारे इ.स. ६५

    आणि आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार प्रचाराद्वारे ते प्रकाशात आणले, जे आपल्या तारणार्‍या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपविण्यात आले.

  16. तीता १:४सुमारे इ.स. ६५

    आमच्यासारखाच विश्वासात असलेला माझा खरा पुत्र तीत याला:

  17. तीता १:५सुमारे इ.स. ६५

    मी तुला क्रेता बेटावर सोडले, जेणे करून तू तेथील उर्वरित कार्याची संपूर्ण व्यवस्था करावी आणि माझ्या आज्ञेनुसार प्रत्येक नगरात मंडळीचे वडील नेमावे.

  18. तीता १:६सुमारे इ.स. ६५

    जो निर्दोष आणि एकाच स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वासणारी असून त्यांच्यावर दुराचाराचा व ती अवज्ञा करणारी असल्याचा आरोप नसावा.

  19. तीता १:७सुमारे इ.स. ६५

    अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतीने धन मिळविणारे नसावेत.

  20. तीता १:८सुमारे इ.स. ६५

    ते पाहुणचार करण्याची आवड असणारे, चांगल्या गोष्टींवर प्रेम करणारे, इंद्रियदमन करणारे, सरळ, पवित्र आणि शिस्तबद्ध असावे.

  21. तीता १:९सुमारे इ.स. ६५

    त्याने शिकविल्याप्रमाणे विश्वासू संदेश दृढपणे धरून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या शिकवणीने इतरांना प्रोत्साहन देणारे आणि जे विरोध करतात त्यांचे खंडन करणारे असावे.

  22. तीता १:१०सुमारे इ.स. ६५

    कारण अनावर, व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यांच्यात विशेषकरून सुंता झालेल्या गटाचे आहेत.

  23. तीता १:११सुमारे इ.स. ६५

    त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; कारण अप्रामाणिक लाभासाठी जे शिकवू नये ते शिकवून ते संपूर्ण घराण्यांची उलथापालथ करीत आहेत.

  24. तीता १:१२सुमारे इ.स. ६५

    त्यांच्याच कोणाएका संदेष्ट्याने सांगितले आहे, “क्रेतीय लोक लबाड, दुष्ट पशू, आळशी खादाड आहेत.”

  25. तीता १:१३सुमारे इ.स. ६५

    हा संदेश अगदी खरा आहे. यास्तव त्यांना कडकपणे ताकीद दे, जेणेकरून ते विश्वासात दृढ होतील,