मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 तीमथ्य ३:३सुमारे इ.स. ६६

    ममताहीन, क्षमा न करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न करणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे,

  2. 2 तीमथ्य ३:४सुमारे इ.स. ६६

    विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी, परमेश्वरावर प्रीती करण्याऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे होतील.

  3. 2 तीमथ्य ३:५सुमारे इ.स. ६६

    ते भक्तीचा देखावा करतील, परंतु त्याच्या सामर्थ्याला नाकारतील, अशा सर्व लोकांपासून दूर राहा.

  4. 2 तीमथ्य ३:६सुमारे इ.स. ६६

    ते अशा प्रकारचे लोक आहेत की ते घरांमध्ये शिरतात व पापांनी दबलेल्या, सर्वप्रकारच्या दुष्ट वासनांनी वेढलेल्या व सतत शिकत असूनही ज्यांना सत्य कधीही उमगले नाही, अशा स्त्रियांना वश करतील.

  5. 2 तीमथ्य ३:७सुमारे इ.स. ६६

    Ever learning, and never able to come to the knowledge of the truth.

  6. 2 तीमथ्य ३:८सुमारे इ.स. ६६

    यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धीचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत.

  7. 2 तीमथ्य ३:९सुमारे इ.स. ६६

    परंतु हे फार काळ चालणार नाही. कारण जसा त्यांचा मूर्खपणा उघड झाला होता, तसेच यांचाही मूर्खपणा प्रत्येकाला कळून येईल.

  8. 2 तीमथ्य ३:१०सुमारे इ.स. ६६

    परंतु माझी शिकवण, वागणूक, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर

  9. 2 तीमथ्य ३:११सुमारे इ.स. ६६

    आणि अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या शहरात आलेली संकटे आणि माझा झालेला छळ हे तुला पूर्ण माहीत आहे. परंतु या सर्वांतून प्रभूनेच मला सोडविले.

  10. 2 तीमथ्य ३:१२सुमारे इ.स. ६६

    खरे पाहिले तर ख्रिस्त येशूंमध्ये जे सुभक्तीने जीवन जगण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांचा छळ होईल.

  11. 2 तीमथ्य ३:१३सुमारे इ.स. ६६

    परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्‍यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील.

  12. 2 तीमथ्य ३:१४सुमारे इ.स. ६६

    परंतु तुझ्यासाठी, तू ज्यागोष्टी शिकलास, ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे, त्या धरून राहा; कारण त्या तू कोणापासून शिकलास तुला माहीत आहे.

  13. 2 तीमथ्य ३:१५सुमारे इ.स. ६६

    लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते.

  14. 2 तीमथ्य ३:१६सुमारे इ.स. ६६

    संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे.

  15. 2 तीमथ्य ३:१७सुमारे इ.स. ६६

    यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.

  16. 2 तीमथ्य ४:१सुमारे इ.स. ६६

    परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की:

  17. 2 तीमथ्य ४:२सुमारे इ.स. ६६

    तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.

  18. 2 तीमथ्य ४:३सुमारे इ.स. ६६

    कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील.

  19. 2 तीमथ्य ४:४सुमारे इ.स. ६६

    ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील.

  20. 2 तीमथ्य ४:५सुमारे इ.स. ६६

    परंतु या सर्व विषयांमध्ये सावध राहा; दुःख सहन कर; ईश्वरीय शुभवार्तेच्या प्रचारकाचे काम कर आणि आपली सेवा पूर्ण कर.

  21. 2 तीमथ्य ४:६सुमारे इ.स. ६६

    कारण मी आता पेयार्पणासारखा ओतला जात असून, माझी जाण्याची वेळ आली आहे.

  22. 2 तीमथ्य ४:७सुमारे इ.स. ६६

    मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.

  23. 2 तीमथ्य ४:८सुमारे इ.स. ६६

    पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल.

  24. 2 तीमथ्य ४:९सुमारे इ.स. ६६

    शक्य तितक्या लवकर माझ्याकडे येण्याचा प्रयत्न कर,

  25. 2 तीमथ्य ४:१०सुमारे इ.स. ६६

    कारण देमासाने जगावर प्रीती केल्याने, मला सोडून तो थेस्सलनीकास गेला आहे. क्रिसेन्स गलातीयास व तीत दालमतियास गेले आहेत.