मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. फिलेमोन १:१८सुमारे इ.स. ६४

    जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड.

  2. फिलेमोन १:१९सुमारे इ.स. ६४

    हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही.

  3. फिलेमोन १:२०सुमारे इ.स. ६४

    बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर.

  4. फिलेमोन १:२१सुमारे इ.स. ६४

    तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे.

  5. फिलेमोन १:२२सुमारे इ.स. ६४

    आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.

  6. फिलेमोन १:२३सुमारे इ.स. ६४

    ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो.

  7. फिलेमोन १:२४सुमारे इ.स. ६४

    आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.

  8. फिलेमोन १:२५सुमारे इ.स. ६४

    आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासह असो.

  9. इब्री १:१सुमारे इ.स. ६४

    भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले.

  10. इब्री १:२सुमारे इ.स. ६४

    पण आता या शेवटच्या दिवसांमध्ये, ते त्यांच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलले आहेत व त्यांना सर्व गोष्टींचे वारस केले आहे आणि त्यांच्या द्वारेच जग निर्माण केले आहे.

  11. इब्री १:३सुमारे इ.स. ६४

    पुत्र परमेश्वराच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहूब प्रतिरूप आहेत. ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गामध्ये वैभवाच्या उजवीकडे बसले आहेत.

  12. इब्री १:४सुमारे इ.स. ६४

    अशा रीतीने ते देवदूतांपेक्षा अतिश्रेष्ठ झाले आणि जे नाव त्यांना बहाल केले ते देवदूतांच्या नावांहून अतिश्रेष्ठ आहे.

  13. इब्री १:५सुमारे इ.स. ६४

    कारण परमेश्वराने असे कोणत्या देवदूताला कधी म्हटले, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे”? आणि पुन्हा एकदा, “मी त्याचा पिता होईन, आणि तो माझा पुत्र होणार”?

  14. इब्री १:६सुमारे इ.स. ६४

    आणि त्याच्या ज्येष्ठ पुत्राला पृथ्वीवर आणतो आणि म्हणतो, “परमेश्वराचे सर्व दूत त्याची उपासना करोत.”

  15. इब्री १:७सुमारे इ.स. ६४

    परमेश्वर ते आपल्या दूतांविषयी बोलताना म्हणतात, “तो वायूला आपले दूत, व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.”

  16. इब्री १:८सुमारे इ.स. ६४

    पण आपल्या पुत्राविषयी ते म्हणतात, “हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील.

  17. इब्री १:९सुमारे इ.स. ६४

    नीतिमत्व तुम्हाला प्रिय असून दुष्टाईचा तुम्ही द्वेष केला आहे. म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, हर्षाच्या तेलाने तुझा अभिषेक करून तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उंच ठिकाणी स्थिर केले आहे.”

  18. इब्री १:१०सुमारे इ.स. ६४

    ते असेही म्हणाले, “हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.

  19. इब्री १:११सुमारे इ.स. ६४

    ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील.

  20. इब्री १:१२सुमारे इ.स. ६४

    तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार; आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील. परंतु तुम्ही निरंतर समान राहणार, आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.”

  21. इब्री १:१३सुमारे इ.स. ६४

    आणि परमेश्वराने आपल्या कोणत्या दूतांविषयी असे म्हटले, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा”?

  22. इब्री १:१४सुमारे इ.स. ६४

    कारण ज्यांना तारण मिळणार आहे, त्यांची सेवा करण्यासाठी सर्व देवदूत म्हणजे सेवा करणारे म्हणून पाठविलेले आत्मे नाहीत काय?

  23. इब्री २:१सुमारे इ.स. ६४

    आपण ऐकलेल्या गोष्टींकडे फार काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यामुळे बहकून जाऊ नये.

  24. इब्री २:२सुमारे इ.स. ६४

    कारण ज्याअर्थी देवदूतांद्वारे सांगितलेला संदेश स्थिर होता आणि प्रत्येक आज्ञेचे उल्लंघन व आज्ञाभंग करणार्‍यांना योग्य शिक्षा मिळाली.

  25. इब्री २:३सुमारे इ.स. ६४

    ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू?