- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- इब्री ३:११सुमारे इ.स. ६४
मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”
- इब्री ३:१२सुमारे इ.स. ६४
बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा.
- इब्री ३:१३सुमारे इ.स. ६४
अद्यापि “आज” म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही.
- इब्री ३:१४सुमारे इ.स. ६४
जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे.
- इब्री ३:१५सुमारे इ.स. ६४
ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल, तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली, तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
- इब्री ३:१६सुमारे इ.स. ६४
ज्यांनी वाणी ऐकली आणि नंतर बंड केले ते लोक कोण होते? मोशेने ज्यांना इजिप्तमधून बाहेर काढले, तेच हे लोक होते नाही का?
- इब्री ३:१७सुमारे इ.स. ६४
आणि चाळीस वर्षे ते कोणावर रागावले होते? तेच लोक होते ना ज्यांनी पाप केले आणि परिणामी त्यांचे शरीरे रानात विनाश पावली?
- इब्री ३:१८सुमारे इ.स. ६४
ते त्यांच्या विसाव्यात केव्हाही येणार नाहीत असे परमेश्वराने शपथ वाहून म्हटले, ते ज्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत, त्यांना नाही तर कोणाला बोलत होते?
- इब्री ३:१९सुमारे इ.स. ६४
आणि त्यांच्या अविश्वासूपणामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.
- इब्री ४:१सुमारे इ.स. ६४
यास्तव, ज्याअर्थी त्यांच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे अभिवचन अद्यापि कायम आहे, त्याअर्थी तुमच्यातील कोणीही उणा पडू नये म्हणून काळजी घ्या.
- इब्री ४:२सुमारे इ.स. ६४
कारण ही शुभवार्ता जशी त्यांना तशी आपल्यालाही सांगितली होती; पण जो संदेश त्यांनी ऐकला त्यामुळे त्यांचे काहीही भले झाले नाही, कारण ज्यांनी आज्ञापालन केले त्यांच्या विश्वासात ते सहभागी झाले नाहीत.
- इब्री ४:३सुमारे इ.स. ६४
ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच विसाव्यात जाता येते, जसे परमेश्वराने म्हटले, “मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.” जरी जगाच्या स्थापनेपासून परमेश्वर त्यांना स्वीकारावयास सिद्ध आहेत व त्यांची वाट पाहत आहेत.
- इब्री ४:४सुमारे इ.स. ६४
कारण सातव्या दिवसाबद्दल असे कुठेतरी लिहिले आहे, “परमेश्वराने सातव्या दिवशी त्यांच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”
- इब्री ४:५सुमारे इ.स. ६४
अजून वरील भागात परमेश्वर म्हणतात, “ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.”
- इब्री ४:६सुमारे इ.स. ६४
तरी, ते अभिवचन कायम असून काहीजण त्या विसाव्यात जातात, पण पहिल्यांदा ज्यांना शुभवार्ता ऐकण्याची संधी मिळाली तरी त्यांनी आज्ञा मोडल्यामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.
- इब्री ४:७सुमारे इ.स. ६४
परंतु विसाव्यात प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने दुसरी वेळ नेमली आहे आणि त्याला “आज” असे म्हटले. हे ते फार पूर्वी दावीदाच्या मुखाद्वारे बोलले होते, आधीच नमूद केलेल्या शब्दांत ते म्हणाले, “आज तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर किती बरे, आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
- इब्री ४:८सुमारे इ.स. ६४
जर यहोशुआने त्यांना विसावा दिला असता, तर परमेश्वराने यानंतर दुसर्या दिवसाविषयी बोलले नसते.
- इब्री ४:९सुमारे इ.स. ६४
तेव्हा परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.
- इब्री ४:१०सुमारे इ.स. ६४
जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे.
- इब्री ४:११सुमारे इ.स. ६४
यास्तव, त्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करू या. यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणामुळे कोणाचाही नाश होऊ नये.
- इब्री ४:१२सुमारे इ.स. ६४
कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.
- इब्री ४:१३सुमारे इ.स. ६४
संपूर्ण सृष्टीतील काहीही परमेश्वराच्या दृष्टीपासून लपलेले नाही. ज्यांना आपण हिशोब देणे आवश्यक आहे, त्यांच्या डोळ्यांपुढे सर्वकाही अनावृत व उघडे आहे.
- इब्री ४:१४सुमारे इ.स. ६४
यास्तव, स्वर्गमंडलातून पार गेलेले परमेश्वराचे पुत्र येशू महान महायाजक आपणास आहेत, म्हणून आम्ही विश्वासाचा पत्कर केलेला आहे तो दृढ धरून ठेऊ या.
- इब्री ४:१५सुमारे इ.स. ६४
ते असे महायाजक नाहीत जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु असे आहेत जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले.
- इब्री ४:१६सुमारे इ.स. ६४
तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य मिळण्यासाठी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ या.