- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- इब्री ६:१२सुमारे इ.स. ६४
तुम्ही आळशी व्हावे अशी आमची इच्छा नाही, परंतु अशांचे अनुकरण करा की जे विश्वासाद्वारे आणि धीराच्या योगे प्रतिज्ञेचे वारस आहेत.
- इब्री ६:१३सुमारे इ.स. ६४
जेव्हा परमेश्वराने अब्राहामाला त्यांचे वचन दिले, तेव्हा त्यांना शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे ते स्वतःचीच शपथ वाहून,
- इब्री ६:१४सुमारे इ.स. ६४
म्हणाले, “मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि तुला अनेक वंशज देईन.”
- इब्री ६:१५सुमारे इ.स. ६४
मग अब्राहामाने धीराने वाट पाहिल्यानंतर त्याला अभिवचनाप्रमाणे प्राप्त झाले.
- इब्री ६:१६सुमारे इ.स. ६४
लोक आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्यांची शपथ वाहतात आणि जे काही म्हटले आहे शपथ त्याचे समर्थन करते आणि सर्व वादांचा शेवट करते.
- इब्री ६:१७सुमारे इ.स. ६४
कारण परमेश्वराने आपला कधीही न बदलणारा संकल्प त्यांच्या वारसांना स्पष्टपणे कळावा म्हणून स्वतःच्या शपथेने तो कायम केला.
- इब्री ६:१८सुमारे इ.स. ६४
परमेश्वराने हे यासाठी केले की ज्या दोन न बदलणार्या गोष्टी ज्याविषयी खोटे बोलणे परमेश्वराला अशक्य आहे व आम्ही स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा प्राप्त करण्याकरिता धावलो, त्या आम्हास मोठे उत्तेजन मिळावे.
- इब्री ६:१९सुमारे इ.स. ६४
आम्हाला ही आशा जिवासाठी नांगर असून स्थिर व अढळ आहे. ती पडद्याच्या मागे आतील मंदिरात प्रवेश करणारी आहे.
- इब्री ६:२०सुमारे इ.स. ६४
जिथे येशूंनी आपला अग्रदूत मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे, सदासर्वकाळचा महायाजक म्हणून आपल्यावतीने प्रवेश केला आहे.
- इब्री ७:१सुमारे इ.स. ६४
हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला.
- इब्री ७:२सुमारे इ.स. ६४
तेव्हा अब्राहामाने सर्वांचा दहावा भाग त्याला दिला. प्रथम मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ, “नीतिमत्वाचा राजा” असा आहे; आणि, “शालेमचा राजा” म्हणजे “शांतीचा राजा” असा आहे.
- इब्री ७:३सुमारे इ.स. ६४
त्याची आई किंवा वडील, वंशावळी, जीवनाचा उगम अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट याविषयी काही माहिती नाही, तरी परमेश्वराच्या पुत्रासमान तो युगानुयुग याजक राहतो.
- इब्री ७:४सुमारे इ.स. ६४
तर तो केवढा थोर आहे याचा विचार करा: कुलपिता अब्राहामाने लुटीचा दहावा हिस्सा त्याला दिला.
- इब्री ७:५सुमारे इ.स. ६४
लेवीच्या गोत्रातील, ज्यांना याजकपण प्राप्त होत असते त्यांना लोकांपासून, म्हणजे जे अब्राहामाच्या वंशजाचे आहेत अशा इस्राएली बांधवांपासून, नियमशास्त्राप्रमाणे दहावा भाग गोळा करता येतो.
- इब्री ७:६सुमारे इ.स. ६४
परंतु हा मनुष्य लेवी वंशातील नव्हता, त्याने अब्राहामापासून दशांश गोळा केला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला.
- इब्री ७:७सुमारे इ.स. ६४
हे निर्विवाद सत्य आहे की मोठ्यांकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो.
- इब्री ७:८सुमारे इ.स. ६४
या एका संदर्भात, याजक जे मर्त्य मानव आहेत, त्यांच्याद्वारे दशांश गोळा केल्या जातो, परंतु दुसर्या संदर्भात, तो जिवंत आहे असे त्याच्याविषयी जाहीर केले आहे.
- इब्री ७:९सुमारे इ.स. ६४
दशांश गोळा करणार्या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल.
- इब्री ७:१०सुमारे इ.स. ६४
कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला, तेव्हा लेवी पूर्वजाच्या शरीरात होता.
- इब्री ७:११सुमारे इ.स. ६४
जर लेवी याजकपणाच्या संबंधात लोकांना खरोखर नियमशास्त्र प्राप्त झाले होते व त्यामुळे पूर्णता प्राप्त झाली असती, याजकपण स्थिर करता आले असते तर दुसर्या याजकाची गरज का होती, की जो मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आणि अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे नसावा?
- इब्री ७:१२सुमारे इ.स. ६४
जेव्हा याजकपण बदलले, तेव्हा नियमात सुद्धा बदल होणे आवश्यक आहे.
- इब्री ७:१३सुमारे इ.स. ६४
कारण ज्याच्याबद्दल या गोष्टी सांगितल्या होत्या तो एका असामान्य, वेगळ्या वंशातील होता; त्या वंशातल्या कोणीही वेदीवर सेवा केली नव्हती.
- इब्री ७:१४सुमारे इ.स. ६४
हे स्पष्ट आहे की आपले प्रभू यहूदाहच्या वंशातून आले आणि याजकांबद्दल त्या वंशाविषयी मोशे काही म्हणाला नाही.
- इब्री ७:१५सुमारे इ.स. ६४
आणि जे काही आम्ही म्हटले ते अधिक स्पष्ट आहे की मलकीसदेकासारखा दुसरा याजक प्रकट होईल.
- इब्री ७:१६सुमारे इ.स. ६४
ते पूर्वजांच्या नियमानुसार नव्हे, तर ज्या जीवनाचा अंत होऊ शकत नाही अशा जीवनापासून वाहणार्या सामर्थ्याच्या आधारावर याजक झाले;